fish of rupees 1000 crore not sales due to corona and export stop in ratnagiri 
लाइफस्टाइल

मासे 'या' पद्धतीने करा साफ; येणार नाही दुर्गंधी

माशांना येणारी दुर्गंधी 'या' पद्धतीने करा दूर

शर्वरी जोशी

नॉनव्हेज खाणाऱ्या अनेकांची पहिली पसंती सी-फूडला म्हणजेच माशांना असते. परंतु, हे मासे घरी करायचे म्हटलं की त्यांच्यातून येणारी दुर्गंधी घरातील प्रत्येकालाच असहाय्य करते. बऱ्याचदा या वासामुळे काही जणांना मळमळदेखील होते. त्यातच जर घरी अचानकपणे पाहुणे आले तर या वासाने सगळेच त्रस्त होतात. म्हणूनच,माशांमधील येणारी दुर्गंधी कशाप्रकारे दूर करता येईल ते पाहुयात. (ways to tackle fish smells when cooking)

१. पंखा चालू करा -

कोणत्याही प्रकारचे मासे स्वच्छ करण्यापूर्वी घरातील पंखे चालू ठेवा. ज्यामुळे मासे साफ करायला घेतल्यावर त्यांच्यातून येणारी दुर्गंधी पंख्याच्या वाऱ्यामुळे घरातून बाहेर जाण्यास मदत होईल.

२. रुम फ्रेशनर किंवा सुगंधी मेणबत्ती -

मासे स्वच्छ करुन झाल्यावर स्वयंपाक घरात वा अन्य खोल्यांमध्ये रुम फ्रेशनर मारा किंवा सुगंधीत मेणबत्त्या लावा. यात खासकरुन लेमन, पेपरमिंट सेंट या मेणबत्त्यांचा समावेश करावा.

३. दारं-खिडक्या उघडा -

मासे स्वच्छ करताना कधीही स्वयंपाक घराच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात. ज्यामुळे माशांची दुर्गंधी बाहेर जाते. तसंच त्यावर सतत घोंगावणाऱ्या माशाही घरात येत नाहीत.

४. भांडी स्वच्छ करा -

अनेक स्त्रियांना मासे स्वच्छ केल्यानंतर वापरलेली भांडी तशीच पाण्यातून काढून ठेऊन द्यायची सवय असते. मात्र, मासे स्वच्छ केल्यानंतर भांडी घासून वाळून जागेवर ठेवावीत.

५. प्लास्टिक पिशवीतून बाहेर काढा -

मासे बराच वेळ प्लास्टिकच्या पिशवीत ठेवल्यामुळे त्यांच्यातील पाणी पिशवीत जमा होतं. ज्यामुळे त्या पाण्याला दुर्गंधी येऊ लागते. त्यामुळे मासे आणल्यावर ताबडतोब पिशवीतून बाहेर काढावेत.

६. फ्रिजरमध्ये ठेवा -

मासे आणल्यानंतर कधीही ते फ्रिजरमध्येच ठेवावेत. ज्यामुळे त्याचा वास येत नाही. तसंच ते ताजेदेखील राहतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित तू थोडक्यात वाचलास.. वाकून नमस्कार करणाऱ्या रोहित पवारांना अजित दादांचा मिश्किल टोला

दाऊदने मला जीवे मारण्याची धमकी दिली, म्हणून...; Lalit Modi यांचा धक्कादायक खुलासा; म्हणाले, शाहरुख खान...

TRAI New Rules : मोठी बातमी! 1 डिसेंबरपासून OTP बंद होणार? ग्राहकांचा फायदा की नुकसान, नेमकं प्रकरण वाचा

Share Market Opening: शेअर बाजारात मोठी वाढ; निफ्टी 24,200च्या पार, सेन्सेक्स 1300 अंकांनी वर, कोणते शेअर चमकले?

Latest Maharashtra News Updates : नाना पटोले यांनी दिला काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT