oxygen cylender esakal
लाइफस्टाइल

हवेतील ऑक्सिजन व मेडिकल ऑक्सिजनमध्ये नेमका फरक काय?

हवेतल्या ऑक्सिजनपेक्षा मेडिकल ऑक्सिजन आहे वेगळा; पण कसा?

शर्वरी जोशी

कोरोना विषाणूमुळे ओढावलेल्या संकटामुळे सध्याची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. अनेकांना कोरोनाची लागण झाल्यामुळे हा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रशासन व वैद्यकीय कर्मचारी युद्ध पातळीवर काम करत आहेत. यामध्येच सध्या अनेक रुग्णालयांमध्ये कोरोनावरील औषधांसोबतच ऑक्सिजन सिलेंडर, बेडची कमतरता जाणवू लागली आहे. विशेष म्हणजे ऑक्सिजनची निर्माण होणारी कमतरता लक्षात घेता आता केंद्र सरकारने ५० हजार मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजन आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर मेडिकल ऑक्सिजन म्हणजे नेमकं काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

जगण्यासाठी ऑक्सिजन हा अत्यंत गरजेचा आहे. आपल्या अवतीभोवतीदेखील ऑक्सिजन आहे. त्यामुळेच आपण श्वास घेऊ शकतो. मात्र, एखादा रुग्ण आजारी असेल तर त्याला स्वतंत्र मेडिकल ऑक्सिजन का दिला जातो? किंवा हवेत ऑक्सिजन असतांनादेखील रुग्णांना स्वतंत्र ऑक्सिजनची गरज का लागते असे अनेक प्रश्न नागरिकांना सध्या सतावू लागले आहेत. त्यामुळेच आज मेडिकल ऑक्सिजन म्हणजे काय ते जाणून घेऊयात.

मेडिकल ऑक्सिजन म्हणजे नेमकं काय?

अति अत्यावश्यक औषधांमध्ये मेडिकल ऑक्सिजनचा समावेश करण्यात आला आहे. २०१५ मध्ये कायदेशीररित्या त्याला तशी परवानगीदेखील देण्यात आली आहे. तसंच हेल्थकेअरमधील तीन टप्प्यांसाठी हा गरजेचा असल्याचं म्हटलं आहे. यात प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी असे तीन टप्पे करण्यात आले असून डब्ल्युएचओ त्याला अत्यावश्यक औषध म्हणून मान्यता दिली आहे. मेडिकल ऑक्सिजनमध्ये ९८ टक्के शुद्ध ऑक्सिजन असतं. यात धूळ, अन्य वायू किंवा कोणतेही अशुद्ध घटक नसतात.

हवेतील ऑक्सिजन व मेडिकल ऑक्सिजनमध्ये फरक काय?

आपल्या अवतीभोवती असलेल्या हवेत केवळ २१ टक्के ऑक्सिजन असतो. तसंच त्यात अन्य धुलीकण मिसळलेले असतात. त्यामुळे रुग्णाला ऑक्सिजनची गरज लागल्यास हवेतील सर्वसामान्य ऑक्सिजन त्याला देता येत नाही. तर, मेडिकल ऑक्सिजनसाठी स्वतंत्र प्लांट उभारण्यात आले आहेत. तेथे लिक्विड ऑक्सिजन तयार केला जातो. जो शुद्ध असतो.

मेडिकल ऑक्सिजन कसा तयार केला जातो?

मेडिकल ऑक्सिजन तयार करण्याच्या बॉयलिंग पॉइंट पद्धत वापरली जाते. पाणी ० अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत थंड करुन त्याला गोठवल्यानंतर त्याला १०० डिग्री अंश सेल्सिअसपर्यंत गरम उकळल्यानंतर ज्या पद्धतीने वाफ म्हणजे गॅस तयार होतो. तसाच काहीसा मेडिकल गॅस तयार केला जातो. ऑक्सिजन १८३ डिग्री अंश सेल्सिअसपर्यंत तापवून त्याचं रुपांतर गॅसमध्ये होतं. म्हणजे थोडक्यात, पाणी गरम होण्यासाटी १०० डिग्री सेल्सिअसचं तापमान लागत असेल. तर, ऑक्सिजनसाठी १८३ डिग्री अंश सेल्सिअस तापमानाची गरज लागते.

मेडिकल ऑक्सिजन तयार करण्याची योग्य पद्धत

हवेतील शुद्ध ऑक्सिजन वेगळा करुन मेडिकल ऑक्सिजन तयार केला जातो. आपल्या आसपासच्या हवेत ७८ टक्के नायट्रोजन,२१ टक्के ऑक्सिजन आणि बाकी १ टक्का आर्गन,हिलिअम, नियॉन, क्रेप्टॉन,जीनॉनयासारखे अन्य वायू असतात. या सगळ्या वायूंचं तापमानाचं अंश वेगवेगळं आहे. मात्र, प्रत्येकाचं कमी आहे.

हवेला गोठवून तिचं तापमान १०८ अंशी डिग्रीपर्यंत नेलं तर तिचं रुपांतर जीनॉन गॅस लिक्विडमध्ये होतं. या पद्धतीने आपण हवेतून हा गॅस वेगळा करु शकतो. त्याच पद्धतीने -१५३.२ डिग्रीवर क्रेप्टॉन, -१८३ ऑक्सिजन आणि अन्य वायू क्रमाक्रमाने वेगळे केले जातात. त्यानंतर त्याचं द्रव्य रुपात साठवण केली जाते. हवेतून गॅसला स्वतंत्र करण्याच्या या प्रक्रियेला क्रायोजेनिक टेक्निक फॉर सेपरेशन ऑफ एअर असं म्हटलं जातं. याच पद्धतीने तयार करण्यात आलेला द्रव्य रुपातील ऑक्सिजन हा ९९.५ टक्के शुद्ध असतो. विशेष म्हणजे गॅसचा बॉयलिंग पॉइंट वाढवा यासाठी ही प्रक्रिया प्रचंड दाबावर केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT