Summer Cloths : असह्य होणारी उष्णता आणि सतत येणाऱ्या घामामुळे उन्हाळ्यात अंगावरील कपड्यांकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. रोजचे व्यवहार सुसह्य करणारे आणि त्याचबरोबर आकर्षक दिसणाऱ्या पेहरावांबद्दल तज्ज्ञांनी दिलेल्या या टिप्स
उन्हाळ्यात घाम जास्त येतो, त्यामुळे या काळात सुती कपडे वापरावे
शक्यतो सिंथेटिक कपड्यांचा वापर टाळावा
गडद रंगांचे (काळे, लाल) कपडे टाळावेत, कारण हे रंग सूर्यकिरणांना शोषून घेतात
पांढरा, पिवळा, आकाशी अशा फिकट रंगांच्या कपड्यांना प्राधान्य द्यावे
फिटिंगचे कपडे टाळत ढगळे किंवा सैल कपडे वापरावेत
लांब बाह्यांचे कपडे वापरल्याने सूर्यकिरणांपासून हातांचे रक्षण होते
फॅशन स्टाइलिस्ट चैताली कुलकर्णी यांनी सांगितले की, ''उन्हाळ्यात जॅकेट किंवा टाईट कपडे घातल्याने काही लोकांना घामामुळे त्वचेची आग अशा विविध समस्या उद्भवतात. या काळात कोणते कपडे घालावेत याबाबत बऱ्याच लोकांकडून दुर्लक्ष केले जाते. जीन्स हा आपल्या रोजच्या वापरातील एक प्रकार आहे. त्यात तरुणाई स्कीनी जिन्सला अधिक प्राधान्य देते. पण एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे ती म्हणजे, उन्हाळ्यात जीन्स किंवा इतर फिटिंगचे कपडे घालू नयेत. शक्यतो सैल आणि पेस्टल कलरचे कपडे वापरावेत. त्याचबरोबर जास्त दाग-दागिने, ॲक्सेसरीज टाळाव्यात.''
काय आहेत पर्याय ?
बाह्या नसलेले किंवा सैल बाह्यांचे टॉप
पूर्णपणे स्ट्रॅपलेस जाण्याची गरज नाही, परंतु स्लीव्हलेस कॅमिस आणि ऑफ-शोल्डर किंवा पफ-स्लीव्ह ब्लाऊज ही ट्रेंडी
शॉर्ट-स्लीव्ह बटण-अप हा आणखी एक चांगला पर्याय
नेहमी वापरणाऱ्या काळ्या लेगिंग टाळा
सुती शर्ट किंवा शॉर्ट्स वापरा
स्कीनी जीन्स नव्हे तर बॅगी पॅन्ट वापरा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.