Wedding Fashion for Men’s esakal
लाइफस्टाइल

Wedding Fashion for Men’s : लग्नात मुले ही स्टाईल करू शकतात आईचा शालू, Wedding Look ला द्या इमोशनल टच

तुम्ही लग्नात आईच्या साडीची फॅशन केलीत तर प्रत्येक व्यक्ती तुमचं कौतुकच करेल

सकाळ डिजिटल टीम

 Wedding Fashion for Men’s :

परवाच एका मित्राच्या लग्नाला गेले होते. लग्न तसं बड्या घरचं होतं त्यामुळे ट्रेंडी डेकोरेशन, जेवणाचे मेन्यू, पाहुणे मंडळी, वर-वधूची एन्ट्री या सगळ्यात कशाचीही कमी नव्हती. लग्न अगदी थाटामाटात पार पडलं. आम्ही सगळे मित्र जेव्हा त्याला भेटायला स्टेजवर गेलो तेव्हा आम्हाला बघून तो थोडा इमोशनल झाला.

कारणही तसंच होतं, ६ महिन्यापूर्वीच त्याच्या आईचे निधन झाले होते. आई गेल्यानंतर जेव्हा जेव्हा तो ग्रूपमध्ये आला तेव्हा तेव्हा तो आईच्या आठवणीत आमच्याकडे रडला होता. (Wedding Fashion for Men’s)

मुलगा असो वा मुलगी आईबद्दल मनातला हळवा कप्पा नेहमीच ओला असतो. मुलगी सासरी जाते तेव्हा ती आई-बाबांना सोडून जाणार म्हणून रडते. पण मुलगा रडतो तो आईपासून पोरके झाल्यावरच. पाहुणेही लेकाच्या लग्नात आई वरमाई म्हणून मिरवली असती म्हणत तिची आठवण काढतात.

तेव्हा आयुष्यातील हा सोहळा पहायला आई हवी होती असं नकळत त्या बोहल्यावर चढलेल्या वराला वाटून जातं. खरंच आई ही खूप हळवी बाजू आहे प्रत्येकाच्या जीवनातली.  (Wedding Fashion)

त्यामुळेच तुम्ही आईच्या आठवणी लग्नादिवशीही जपणार असाल तर तुम्हाला आम्ही काही टिप्स देऊ शकतो. लग्नात मुली आईची साडी पुन्हा नेसतात. किंवा तिच्या साडीचा ड्रेस शिवतात जेणेकरून आई सोबत असल्यासारखे वाटते. याबद्दलच आपण अधिक जाणून घेणार आहोत.

शालूचा कुर्ता

लग्नाच्या ड्रेसला आईच्या साडीचा हळवा टच देण्यासाठी तुम्ही लग्नात घालणार असलेला कुर्ता आईच्या सर्वात आवडत्या साडीचा शिवून घेऊ शकता. सध्या पैठणी कुर्त्यांचा ट्रेंड आहेच.तसेच, शालू असेल तर भरजरी शालूवर कोणत्याही प्लेन रंगाची धोती, किंवा पायजमा शोभून दिसतो.

धोती

तुम्हाला कुर्ता नवरीच्या साडीला मॅचिंग करायचा असेल तर तुम्ही तो नक्कीच घालू शकता. पण, त्यावर धोती तुम्ही आईच्या एखाद्या ऑफव्हाईट साडीची शिवून घ्या. सध्या भरजरी कापडावर प्लेन धोती जास्त खुलून दिसते. अनेक मराठी कलाकारांनीही हा ट्रेंड फॉलो केला आहे. (Paithani Saree)

जॅकेट

लग्नातला कुर्ता, धोती फायनल झाली असेल तर आईच्या शालूचे तुम्ही जॅकेट शिवू शकता. सध्या व्हाईट कुर्ता पायजमावर पैठणी कापडाचे जॅकेट घातले जाते. तुम्हीही लग्नाचा ड्रेस फायनल करताना ऑफव्हाईट रंगाचे कपडे घेऊन त्यावर शालूचे जॅकेट घालू शकता.

फेटा

नवरदेवाचा खरा रूबाब हा फेट्यातच असतो. आजकाल जरीचे फेटे ट्रेंडमध्ये आहेत. तुम्हाला आईची आठवण जपायची असेल तर तुम्ही आईच्या शालूच्या पदराचा फेटा बनवून घेऊ शकता. त्यावर आईचीच आठवण असलेली एखादा ब्रोच लावू शकता. ज्यामुळे आईच तुम्हाला तो फेटा घालत आहे असे वाटेल.

शाल

लग्नात ड्रेस कुर्ता असो वा ब्लेझर प्रत्येक ड्रेसवर शाल असतेच. शालमध्येही अनेक व्हरायची आहेत. खांद्यापासून पिनअप केलेली शाल मागून वळवून तुम्ही दुसऱ्या हाताच्या तळव्याला लावू शकता. यामुळे तुमचा संपूर्ण लूक परिपूर्ण होईल.

उपरणं

लग्नात वर-वधूने सप्तपदी चालायची असते. तेव्हा दोघांचेही गठबंधन केले जाते. वराकडे असलेले उपरणे आणि नवरीची शाल, चुनरी यांची गाठ बांधली जाते. त्या उपरनासाठी सुद्धा आईची साडी वापरता येऊ शकते. ज्यामुळे तुम्हा दोघा नवजोडप्याला आईच आशिर्वाद देऊन तुमची लग्नगाठ बांधतेय असे भासेल.

तुम्ही तुमच्या लग्नातील कोणत्याही ड्रेसवर आईच्या साडीची फॅशन केलीत तर लग्न सोहळ्याला उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती तुमचे कौतुकच करेल. आणि त्यानिमित्ताने आईची आठवणही जपली जाईल.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT