Wedding Management : सध्या सगळीकडे वेडिंग सीजन सुरु असून यंदा उन्हाळ्यातील मुहूर्त हे फक्त २८ जूनपर्यंतच आहेत. त्यानंतरचे मुहूर्त लांबणीवर आहे. लग्नसोहळा हा आयुष्यातील एका महत्वाच्या सोहळ्यात एक असतो. प्रत्येकाला त्याचं लग्न अगदी थाताट व्हावं असं वाटतं. मात्र पैशांअभावी अनेकांना हे शक्य होत नाही. मात्र चिंता करू नका. तुम्ही कमी पैशांतही अगदी थाताट लग्न करू शकता. त्यासाठी या सोप्या ट्रिक्स लक्षात घ्या.
लग्नात पैसे वाचवण्याची सुरुवात तुम्हाला लग्न सोहळ्याची जागा निवडण्यापासून करावी लागेल. तुम्ही शहराच्या आत जर हॉल किंवा लॉन बुकिंग केलं तर ते तुम्हाला दुप्पट किंमतीचे पैसे मोजावे लागतील. शहराबाहेरची जागा तुम्ही बुक केल्यास इथे तुमचे पैसे वाचू शकतात.
ऑफ सीजनमध्ये किंवा ऑफर सुरु असताना बुकिंग केल्यास हॉटेल्स आणि जेवणाच्या खर्चाची खूप बचत होऊ शकते. तसेच 5 स्टार हॉटेल्समध्ये कर हा ३५-४० टक्के लागते तर मोकळ्या मैदानात हा कर १०-५ टक्के लागतो.
जेवणामध्ये अधिक आंतरराष्ट्रीय पदार्थ ठेवण्यापेक्षा स्वदेशी पदार्थ ठेवा. तुम्ही जेवढे आंतरराष्ट्रीय पदार्थ मेन्यूमध्ये अॅड कराल तेवेढा प्रति थाळी खर्च वाचेल. भारतीय खाद्यपदार्थांची किंमत पर प्लेट कमी असते.
ऋतूनुसार मोजकेच पदार्थ ठेवा. तसेच महागड्या पत्रिकेऐवजी डिजिटल कार्ड्स बनवा आणि ते मित्रमंडळींत आणि नातेवाईकांत वाटा. आजकाल हा एक ट्रेंड आहे. तुम्हाला फारच जवळच्या लोकांना पत्रिका द्यायच्या असतील तर त्याची एक खास यादी तयार करून फक्त त्यांनाच द्या. (Money Saving Hacks)
अशी जागा निवडा जेथे तुम्हाला खाद्यपदार्थांसाठी किंवा सजावटीसाठी विक्रेत्यांवर अवलंबून राहावे लागणार नाही. तुम्ही मोकळे मैदान निवडल्यास तुम्ही स्वस्त विक्रेत्यांकडून जेवण घेऊ शकता.
विवाहसोहळ्यातील कपड्यांवर भरपूर खर्च केला जातो. लग्नानंतर त्याचा फारसा उपयोग होतानाही दिसत नाही. तेव्हा जमल्यास आणि तुम्हाला योग्य वाटल्यास तुम्ही कपडे दागिणे भाड्यानेही विकत घेऊ शकता. (Wedding Ceremony)
कुठलाही मेकअप आर्टिस्ट मेकअपसाठी तुमच्याकडून दुप्पट पैसे घेतो. तेव्हा तुमच्याकडे मेकअपचे सामान असणे कधीही उत्तम. प्रसिद्ध फोटोग्राफर बुक करण्यात फार पैसे खर्च होतात. तेव्हा तुम्ही एखाद्या फ्री लांसरला एका दिवसासाठी बोलावू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.