Wedding Shopping esakal
लाइफस्टाइल

Wedding Shopping : दोन हजारात लेहंगा, बाराशेत नऊवारी, नवरीची संपूर्ण खरेदी पुण्यातच करायची,या शॉप्सना भेट द्या

रविवार पेठेत तुम्हाला सगळ्या वस्तू स्वस्त अन् टिकाऊ मिळतील

Pooja Karande-Kadam

Wedding Shopping :  

एखाद्या घरात लग्न ठरवताना एक बैठत बसते. त्या बैठकीत लग्नाच्या मानपानाच्या, देण्या-घेण्याच्या चर्चा होतात. पण. त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे, वर-वधुचे कपडे खरेदी. त्यांचे लुक अन् ते कोणी कोणाला घ्यायचे.

पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार मुलीला वरपक्ष कपडे घेतो अन् मुलाला वधुपक्ष. पण आता असं नाही. प्रत्येक ठिकाणी आपआपले कपडे घेतले जातात. कपडे कोण घेणार हे एकदा फायनल झालं की, लुक काय करायचा, कपडे कुठे स्वस्तात मस्त भेटतील याची माहिती काढली जाते.

तुम्हीही नवरीच्या खरेदीसाठी चांगले होलसेल मार्केट कोणते, मेकअप किट, पर्स अशा एक्सेसरीज कुठे मिळतील याची माहिती घेत असाल. तर, ही बातमी तुम्हाला मदत करेल. कारण आज आपण पुण्यातील नवरीचे कपडे अन् ऍक्सेसरीजसाठी होलसेल मार्केट कोणतं याची माहिती घेणार आहोत.

नऊवारी लुकसाठी

सध्याच्या ट्रेंडनुसार नवरीला नऊवारी लुक करायचा असेल तर पुण्यात असंख्य व्हरायटी पहायला मिळतील. पण फक्त नऊवारीसाठी प्रसिद्ध असलेले अन् होलसेल दरात कपडे देणारे एक दुकान आहे. पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शनिपार चौकातील महालक्ष्मी मार्केटमध्ये हे दुकान आहे. याचे नाव न्यु नऊवारी नक्षत्र असे असून इथे तुम्हाला ७५० पासून नऊवारी साडी मिळेल.

तुम्हाला नऊवार शिवून घ्यायची असेल तरी तुम्ही घेऊ शकता. इथे तुम्हाला नऊवारी साडी पेशवाई, राजलक्ष्मी, शाही पेशवाई, ब्रह्माक्ष्मी, नक्षत्रा, अवंतिका अशा अनेक प्रकारच्या साड्या तुम्हाला तयार आणि शिवून मिळतील.  

या साड्यांची किंमत ७५० पासून पुढे आहे. तुम्हाला १० ते २० साड्या घ्यायच्या असतील ग्रूपसाठी तर होलसेल अन् एकच घ्यायची असेल तर १२०० पासून पुढे साड्या मिळतील. केवळ काठपदर नाहीतर वेलवेट नऊवारी साडीही तुम्हाला मिळेल.

शाही नऊवारी

लेहंगा चोली

पुण्यातील रविवार पेठेतील आर्वी हे लेहंगा चोलीसाठी प्रसिद्ध दुकान आहे. इथे तुम्हाला लेहंग्याची अनेक व्हरायटी पहायला मिळतील. घागरे इथे केवळ १००० इतक्या किमतीत मिळतील. तुम्ही होलसेल आणि रिटेल दोन्ही प्रकारे खरेदी करू शकता.

नेट घारगा, फुल वर्क घागरा केवळ ११५० मध्ये मिळतील. क्रेऑन वर्क, पार्टीवेअर लेहंगा केवळ ३ हजारात मिळेल. यानंतर सध्या ट्रेंडींग असलेले पेस्टल रंगही तुम्हाला इथे मिळतील. वेलवेट घागरे तुम्हाला केवळ ३ हजारात मिळतील. ज्यावर वेलवेट वर्क आणि ब्लाऊजही मिळतील. 

लेहंगा फार वापरला जात नाही त्यामुळे त्यावर जास्त खर्च करू नका

ब्राईडल ब्लाऊज

लग्नात लेहंगा असो वा साडी ब्लाऊज डिझाईनरच घेतले जातात. नवरीच्या साडीहुन जास्त चर्चा तिच्या ब्लाऊजचीच होते. सेम साडीवर सेम ब्लाऊज हवा असेल तर रेग्युलर पिसवर हॅंडवर्क केले जाते. पुण्यातील शुक्रवार पेठेतील नेहरू चौकात सत्यम फॅब्रिक हे दुकान आहे. इथे तुम्हाला १५० पासून रेडिमेड ब्रायडल ब्लाऊज मिळतील.

ब्रायडल ब्लाऊजची सध्या क्रेझ आहे

वधुची ज्वेलरी

पुण्यातील रविवार पेठेतील कापडगंज येथे ममता ज्वेलर्स शॉप आहे. तिथे तुम्हाला नवरीची सर्वकाही ज्वेलरी, ज्यात गळ्यातले, कानातले, नथ, साऊथ इंडियन सेट अशा हजारो व्हरायटी मिळतात. इथे तुम्हाला ३० रूपयात गोल्ड प्लेटेड नथ मिळेल. तसेच बांगड्या आणि तोडे यांच्या अनेक व्हरायटी तुम्हाला मिळतील. त्याही तुम्हाला केवळ होलसेल रेटमध्ये मिळणार आहे.

नवरीचे चप्पल, अन् पर्स

पुण्यातील रविवार पेठेत होलसेल खरेदी करणाऱ्यांची गर्दी असते. तुम्हाला पर्सनल वापरासाठी हव्या असतील, किंवा संक्रांतीला वाण देण्यासाठी तर तुम्ही पर्स, बटवे यांचे सुरेख कलेक्शन रविवार पेठेत शनिमंदिरातील महादेव ट्रेडर्समध्ये मिळू शकतील. इथे तुम्हाला २० रूपयांपासून हजार रूपयांपर्यंत पर्स, बटवे मिळू शकतील.

नवरीसाठी चप्पल घेण्यासाठी मोजडी, सॅंडल, शूज, ब्रायडल फुटवेअरच्या असंख्य व्हरायटी तुम्हाला रविवार पेठेत मिळतील. इथल्या ऍपल शूजमध्ये तुम्ही १५० ते ४०० पर्यंत तुम्हाला सगळ्या प्रकारचे व्हरायटीची चप्पल तुम्हाला मिळतील.

ब्रायडल सॅंडल्स अनेक वर्षांपासून वेगळेपण जपून आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT