सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. त्यामूळे लग्नाची खरेदी दणक्यात केली जात आहे. नेहमीच्या ठिकाणी खास काही व्हरायटी मिळत नाही, त्यामुळे लोक बाहेरचे नवे मार्केट शोधत असतात. पण, जास्त माहिती नसल्याने व्हरायटी नसलेल्या ठिकाणी जाऊन खरेदी केली जाते.
तूमच्या घरातही कोणाचे लग्न ठरले असेल तर त्यासाठी कोणत्या मार्केटला जावे, हे आज आम्ही तूम्हाला सांगणार आहोत. जिथे तूम्हाला कपडे आणि इतर वस्तू सहज उपलब्ध होतील.
भारताची राजधानी दिल्ली सध्या थंडीचा कडाका वाढला आहे. तरी तिथे भेट देणाऱ्या पर्यटकांची वर्दळ कमी नाही. दिल्ली ला कोणी गेलं आणि खरेदी न करता आले, असे कधी होत नाही. खाण्यापिण्यापासून कपड्यांपर्यंत आणि घराच्या सजावटीपर्यंतच्या सर्व वस्तू अगदी माफक दरात इथल्या बाजारपेठेत उपलब्ध आहेत. यामुळेच लोक लग्नाची सर्व खरेदी दिल्लीच्या मार्केटमधूनच करतात.
दिल्लीत काही बाजार आहेत जे विशेषतः लग्नाच्या खरेदीसाठी प्रसिद्ध आहेत. येथे तुम्हाला वधूचा लेहेंगा, साडी, घरातील सामान, चप्पल, दागिने या सर्व गोष्टी अगदी स्वस्त दरात मिळतील. यावर्षी म्हणजेच 2022 मध्ये लोकांनी या मार्केटमधून लग्नाची भरपूर खरेदी केली आहे. त्यामुळे जर तुम्हालाही तुमच्या बजेटमध्ये लग्नाची खरेदी करायची असेल, तर दिल्लीतील या मार्केटला भेट द्या.
कोणत्याही लग्नासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कार्ड छापणे. लग्नासाठी लग्नपत्रिका छापायची असतील तर कुठेही भटकण्याची गरज नाही. तुम्हालाही लग्नाची पत्रिकेत व्हरायटी पाहिजे असेल तर थेट चावरी बाजाराकडे जा. येथे सुमारे 500 कार्डधारकांची दुकाने आहेत. या जुन्या दिल्लीच्या बाजारपेठेतील छोटी दुकाने म्हणजे लग्नपत्रिकांचा खजिना आहे. येथे तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत साधे ते डिझायनर कार्ड मिळतील.
स्वस्त खरेदीसाठी लाजपत नगर हे लोकांचे आवडते मार्केट आहे. लग्नाची खरेदी करायची असेल तर हे मार्केट बेस्ट आहे.या बाजारात तुम्हाला लग्नाचे कपडे, चप्पल, दागिने मिळतील. हा बाजार सोमवारी बंद असतो. त्यामुळे इतर दिवशी खरेदीसाठी बाहेर पडा.करोल बागला लग्नाच्या खरेदीसाठीच बनले असल्याचे म्हणतात. लग्नाच्या कपड्यांसाठी अजमल खान रोड,तर सुंदर दागिन्यांसाठी बँक स्ट्रीटला भेट द्या.
लग्नाच्या खरेदीचा विचार केला तर लोकांच्या ओठावर सरोजिनी नगर मार्केटचे नाव येते. ही दिल्लीची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. लग्नाशी संबंधित छोट्या-छोट्या गोष्टी इथे सहज उपलब्ध होतात. जर तुम्ही तुमच्या नववधूसाठी लेहेंगा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर येथे तुम्हाला त्यातील एक प्रकार पाहायला मिळेल.
राजौरी गार्डन लग्नाच्या खरेदीसाठी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. पाहिले तर उत्तर भारतीय नववधूंसाठी हे वन स्टॉप डेस्टिनेशन आहे. ट्रेंडी वेडिंग वेअर, वेडिंग फूटवेअर, शूज, कॉस्मेटिक्स आणि वेडिंग गिफ्ट्ससाठी अनेक पर्याय आहेत. या बाजारानंतर तुम्हाला खरेदीसाठी कुठेही भटकावे लागत नाही. राजौरी गार्डन मार्केट बुधवारी बंद असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.