Weight Gain During Pregnancy  esakal
लाइफस्टाइल

Weight Gain During Pregnancy : गर्भधारणेदरम्यान वजन वाढणे सामान्य आहे का?

गरोदरपणात जास्त वजन वाढल्याने प्रसूतीदरम्यान समस्या निर्माण होऊ शकतात का?

Pooja Karande-Kadam

Weight Gain During Pregnancy : असं म्हणतात की बाळाचं वजन जितकं जास्त असेल तितकं बाळ सुदृढ आणि निरोगी असतं आणि जितकं बाळाचं वजन कमी तितकं त्या बाळाला जपावं लागतं. बाळचं वजन हे आईच्या वजनावर अवलंबून असतं. गरोदरपणात आई जितकी सुदृढ असते तितकंच बाळ सुदृढ असतं.

पण ही गोष्ट कितपत खरी आहे? कारण गरोदरपणात स्त्रीचं वजन जास्त नसलं पाहिजे असं तज्ञ सांगतात आणि न ते खूप कमी असावं.

कोणत्याही स्त्रीसाठी गर्भधारणा हा अत्यंत नाजूक आणि महत्त्वाचा काळ असतो. गर्भवती महिलेच्या आत एक बाळ वाढत आहे, जे नऊ महिन्यांनंतर जगात येते. गरोदरपणात प्रत्येक स्त्रीच्या मनात अनेक प्रश्न असतात. गर्भधारणेदरम्यान स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होतात. या बदलांमध्ये गर्भवती महिलेचे वाढते वजन देखील समाविष्ट आहे.

गरोदरपणात वजन वाढणे हे सामान्य आहे, परंतु प्रत्येक स्त्रीच्या मनात एक प्रश्न कायम आहे की वजन वाढणे कितपत योग्य असेल? गरोदरपणात जास्त वजन वाढल्याने प्रसूतीदरम्यान समस्या निर्माण होऊ शकतात का?

पहिल्यांदाच आई होणार्‍या स्त्रिया वजन वाढण्याची चिंता करतात आणि त्यांच्या आहारावर नियंत्रण ठेवू लागतात. विचार न करता आहार किंवा व्यायामाद्वारे वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे गर्भवती महिलेसाठी हानिकारक असू शकते.

तर सर्वप्रथम तुम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की गर्भवती महिलेचे वजन किती वाढणे सामान्य आहे? प्रसूतीदरम्यान वजन वाढल्याने समस्या उद्भवू शकतात?

गरोदरपणात वजन वाढण्याचे कारण

 गरोदरपणात स्त्रीचे वजन वाढण्याचे एक कारण म्हणजे आईच्या शरीरात मुलाचे वजन देखील समाविष्ट असते. जुळी मुले असल्यास, 15 ते 20 किलो वजन वाढणे सामान्य आहे.

 याशिवाय गरोदर महिलेच्या स्तनाचा आकार वाढणे, नाळेचा आकार वाढणे, गर्भाशयाचा आकार वाढणे आणि शरीरातील अतिरिक्त रक्त व द्रवपदार्थ यामुळे वजनही वाढू लागते.

गर्भवतीचे वजन कधी वाढू लागते

गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांत स्त्रीचे वजन सामान्य असते, परंतु त्यानंतर दर आठवड्याला वजन एक पौंड किंवा 1 किलोपर्यंत वाढू शकते.

गरोदरपणात वजन किती वाढते

गर्भवती महिलेमध्ये सामान्य: वजन 12 ते 16 किलो पर्यंत वाढू शकते. ज्या महिलांचे वजन गर्भधारणेपूर्वीच वाढले आहे ते गर्भधारणेदरम्यान त्यांचे वजन सुमारे 16 किलो वाढवू शकतात. दुसरीकडे, निरोगी महिलांचे वजन सुमारे 12 किलोने वाढण्याची शक्यता आहे.

गरोदरपणात जास्त वजन वाढण्याची जोखीम

 जर गर्भवती महिलेचे वजन सामान्यपेक्षा जास्त वाढू लागले तर आई आणि बाळासाठी काही गुंतागुंत निर्माण होऊ शकते. जास्त वजन वाढल्याने सी-सेक्शन, गर्भधारणेदरम्यान मधुमेह, उच्च रक्तदाब आणि मॅक्रोसोमियाच्या तक्रारी होऊ शकतात. याशिवाय जास्त वजन असलेल्या मातांच्या मुलाला भविष्यात लठ्ठपणा आणि इतर आरोग्य समस्या होण्याची शक्यता असते.

गरोदरपणात या गोष्टींची काळजी घ्या

गरोदरपणात बाळाचे वजन वाढवण्यासाठी उपाय करताना गरोदर स्त्रीने काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. गरोदर स्त्रीला कोणते व्यसन असेल जसे की मद्यपान आणि धुम्रपान, तर तिने बाळंतपण होईपर्यंत या व्यसनांपासून दूरच राहावे.

अधिक प्रमाणात कॉफी, चहा घेणे आई व बाळ दोघांसाठी घातक ठरू शकते. म्हणून काही काळ या गोष्टींचा सुद्धा त्याग करावा. रोज तळलेले पदार्थ, गोड पदार्थ, चटपटीत पदार्थ खाणे टाळावे. यामुळे वजन अतिवाढून डिलिव्हरी वेळी धोका निर्माण होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT