Weight loss Diet esakal
लाइफस्टाइल

Weight Loss Diet : भावानं पिझ्झा खाऊन कमी केलं वजन, पहा काय आहे ही ट्रिक!

दिवसात इतका पिझ्झा खाल्ला की वजन वाढण्याऐवजी कमी झालं, कसं ते वाचा

Pooja Karande-Kadam

Weight Loss Diet :

परफेक्ट बॉडी हवी असल्यास, वजन कमी करायचे असल्यास पिझ्झा, बर्गर यापासून ब्रेकअप करावा, असे सगळेच सांगतात. जीमला जाणारे लोक तर यापासून चार हात लांबच असतात. पण, एका जिम ट्रेनर भावानं चक्क पिझ्झा खाऊन वजन कमी केलं आहे. पाहुयात त्यानं हे कसं साध्य केलंय.

आज पिझ्झा डे आहे, त्यामुळे पिझ्झा खाऊन वजन वाढते. पिझ्झामुळे अनेक त्रास होतात असे म्हणणाऱ्या लोकांनी ही स्टोरी नक्कीच वाचावी. कारण, या तरूणाने पिझ्झा खाऊन वजन कमी केलं आहे. कसे ते पहा.

वजन कमी करण्यासाठी पिझ्झा खाणं ही गोष्ट ऐकायला विचित्र वाटेल. पण हे खर आहे. फिटनेस ट्रेनरने त्याचे जुने आणि नवीन फोटोही शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्याच्या शरीरात झालेला बदल तूम्हाला आश्चर्यचकीत करेल.

हि ट्रिक शोधून काढणाऱ्याचे नाव रायन मर्सर आहे. तो मूळचा आयर्लंडचा आहे. 34 वर्षीय रायनने दावा केला की, त्याने 30 दिवस दिवसातून तीन वेळा पिझ्झा खाल्ला आणि वजन कमी केले आहे. रायनने 30 दिवस दररोज पिझ्झाचे 10 स्लाईस खाल्ले आणि असे केल्याने त्याने त्याचे वजन 3.4 किलो कमी केले.

कॅलरीज जास्त प्रमाणात पोटात गेल्याने वजन वाढतं. त्यामूळे आवडते पदार्थ खाणे बंद करावं लागतं. पण, रायनने आवडता पिझ्झा खाऊन वजन कमी कसं केलं हे पाहुयात.

रायनने यासाठी आपला डाएट खूप व्यवस्थित तयार केला आणि ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरसाठी फक्त पिझ्झा खाल्ला. प्रत्येकाचे शरीर सारखे नसते आणि प्रत्येकाच्या शरीराच्या गरजाही वेगळ्या असतात. त्यामुळे  मी जे केलं ते तूमच्या शरीराची कपॅसिटी कशी आहे. हे पहा आणि करा.

पुढे तो म्हणाला की, थंडीच्या दिवसात वजन कमी करणे सोपे असते. त्यामूळे मी माझे फिटनेस लक्ष्य पूर्ण करण्यासाठी जानेवारी महिना निवडला. जानेवारीपासून माझा वजन कमी करण्याचा प्रवास सुरू केला. यासाठी मी पिझ्झा बाहेरून मागवला नाही तर घरीच तयार केला.

मी दिवसातून दोन पिझ्झा खात होतो. कॅलरी संतुलित करून मी पिझ्झाचे 10 स्लाइस खाल्लेत. पण मी व्यायाम करणे थांबवले नाही आणि शारीरिकरित्या सक्रिय राहिलो,असेही त्याने सांगितले.

पिझ्झा मला आवडतो त्यामूळे मी ते ३० दिवस खाऊ शकलो. मी माझा आहार खूप मोजून तयार केला. जेणेकरून मला माझे ध्येय गाठता आले. मदत मी सोमवार ते शुक्रवार 1800 ते 2100 कॅलरीज आणि शनिवार-रविवार 2700 कॅलरीज घेत असे. मी दररोज 7 फळे आणि पालेभाज्या देखील घेत असे, असेही त्यांने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT