Weight loss esakal
लाइफस्टाइल

Weight Loss Lifestyle : मैत्रिणींनो, Weight Loss साठी मासिक पाळीनंतर करा हा प्रयोग, वजनावर होईल थेट परिणाम

Weight Loss Food : पाळीनंतर काही दिवस या गोष्टींचे सेवन केले तर तुमच्या वजनावर जास्त परिणाम होतो. त्यामुळे काही दिवस हे पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा.

सकाळ डिजिटल टीम

Weight Loss Lifestyle :

वजन कमी करणे हे आजकाल महत्त्वाचे बनले आहे. कारण, प्रत्येकाच्या चुकीच्या लाईफस्टाइलमुळे वाढलेल्या वजनाचा त्रास होत आहे. पण, यातही लग्नाआधी सडपातळ असलेल्या महिलांचे वजन लगेचच वाढयला सुरू होते.

पुरूषांच्या तुलनेत महिलांचे वजन पटकन वाढते. आणि ते सहज कमी होत नाही. पुरूष वाढलेलं वजन पटकन कमी करू शकतात. असे शारीरिक आणि हार्मोनल फरकांमुळे होते. पण जर महिलांना योग्य माहिती असेल तर त्या पुरुषांपेक्षा वेगाने वजन कमी करू शकतात. तेही केवळ महिन्याचे ९ दिवस कष्ट करून होय.

होय आज आम्ही तुम्हाला एक भन्नाट आयडिया सांगणार आहोत. ती म्हणजे महिला त्यांच्या मासिक पाळीनंतर एक गोष्ट फॉलो करून सहज वजन कमी करू शकतात. कसे ते पाहुयात.

महिला आपल्या वजनाकडे आणि आपल्या लाईफस्टाइलकडे अजिबात लक्ष देत. विशेषतः भारतीय महिला कुटुंबासाठी, मुलाबाळांसाठी वेळ देताना स्वतःसाठी वेळ काढत नाहीत. त्यामुळे त्यांचे वजन वाढते. वजन केवळ शारीरिक बदलांमुळे वाढत नाही. तर, मानसिक तणावामुळेही महिलांचे वजन वाढते.

सध्या सिझरियन डिलिव्हरी वरती भर दिला जात आहे. पण या डिलिव्हरीनंतर योग्य ती काळजी घेतली नाही. त्यामुळे महिलांचे वजन 30 ते 40 किलोने वाढते. ही एक चिंतेची बाब आहे. महिलांनी वजन कमी करण्यासाठी नक्की काय केलं पाहिजे. याबद्दल जाणून घेऊया.

वजन कमी करण्यासाठी मासिक पाळी येईल कामी

वजन कमी करण्यासाठी पुरुषांनी स्त्रिया दोन्हीही मेहनत घेत असतात. पण महिलांना पुरेसा वेळ मिळत नसल्याने त्या वजनाकडे दुर्लक्ष करतात. पण काळजीची बाब ही आहे की महिलांचे वजन जितक्या लवकर वाढते तितक्या लवकर ते कमी होत नाही.

क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डॉ. निधी चौधरी यांनी महिलांसाठी वजन कमी करण्याची ही सर्वोत्तम पद्धत सांगितली आहे. पुरुषांचे वजन कमी वेळेत का कमी होते हेही त्यांनी सांगितले. यामागे हार्मोन्स हे एक मोठे कारण आहे, परंतु महिलांचे वजनही खूप लवकर कमी होऊ शकते. पोट आणि मांड्यांसह संपूर्ण शरीराची चरबी लोण्यासारखी वितळेल.

न्यूट्रिशनिस्टचा असा दावा आहे की, जर महिलांनी महिन्याच्या 9 दिवसांमध्ये त्यांचा आहार कमी केला तर त्यांचे वजन लवकर कमी होईल. तुमची मासिक पाळी संपताच, म्हणजे 6 व्या दिवसापासून ते 14 व्या दिवसापर्यंत, कमी कॅलरीयुक्त आहार घ्या. व्यायाम करा, त्यानंतर संपूर्ण महिनाभर सामान्य आहार आणि नियमित व्यायाम सुरू ठेवा. तुमचे वजन खूप लवकर कमी होईल.

पाळीनंतर काही दिवस नक्की खा हे पदार्थ

फळ, मासे, चिकन, अंडी, ड्राय फ्रूट्स, राजमा, छोले, चिया सीड्स, योगर्ट, ब्रोकली, फॅट कमी असलेले दूध

पाळीनंतर काही दिवस या गोष्टींचे सेवन केले तर तुमच्या वजनावर जास्त परिणाम होतो. त्यामुळे काही दिवस हे पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT