दिवसभर फ्रेश राहण्यासाठी नाश्ता करणे हे खूप महत्त्तवाचे आहे. नाश्ता केला की कामात उत्साह येतो अन् भूकही थोड्यावेळापुरती टाळता येते. पण तुम्ही नाश्त्याला काय खात आहात याचा विचार करावा लागतो. कारण, नाश्ता जर तुम्ही अनहेल्दी करत असाल तर त्याचा तुमच्या शरीराला काहीच फायदा होणार नाही.
तुम्ही अनेकवेळा टीव्हीवर दोन मिनिटात तयार होणाऱ्या ओट्सच्या जाहिराती पाहिल्या असतील. पण बाजारात उपलब्ध असलेल्या झटपट ओट्समध्ये अनेक गोष्टी असतात. ज्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते.
अशा परिस्थितीत जर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी ओट्स खायचे असतील तर प्रक्रिया केलेल्या ओट्स ऐवजी कच्च्या म्हणजेच साध्या ओट्सचे पॅकेट घरी आणा. त्यापासून बनलेल्या रेसिपीजने तुमचे वजन, वाढलेले पोट कमी होऊ शकते.
ओट्स कशापासून बनवले जातात?
ओट्सला मराठी मध्ये 'जव' म्हणतात. ओट्स इतके हेल्दी असण्यासारखं त्यात आहे तरी काय? तर यात तंतुमय पदार्थ जसं, की सोल्युबल फायबर किंवा विरघळणारे तंतुमय पदार्थ असतात. हे पदार्थ पोटात खूप वेळ राहत असल्यानं लवकर परत भूक लागत नाही, त्यामुळे वजन कमी करताना याचा उपयोग होतो.
येथे आम्ही तुम्हाला ओट्सपासून बनवलेल्या अशा 5 रेसिपी सांगणार आहोत, ज्या तुम्हाला चव देतील आणि वजन कमी करण्यातही फायदेशीर ठरतील.
नाश्ता का महत्त्वाचा आहे
वजन कमी करण्याच्या संपूर्ण प्रवासात तेलकट पदार्थ टाळणे, चपाती,भाकरी कमी खाणे हे जितकं महत्त्वाचं आहे. तितकंच महत्त्वाचं नाश्ता करणंही आहे. कारण, रात्रीच्या जेवणानंतर आपण थेट दुपारी १ वाजता जेवत असाल.
तर १५ तासांचा गॅप आपल्या या खाण्याच्या रूटीनमध्ये पडतो. त्यामुळे आपल्याला विकनेस, थकवा वाढतो. अशा परिस्थितीत नाश्ता हा गरजेचाच आहे. तुम्ही रात्री ८ वाजता जेवण केले असेल. तर, सकाळी ९ च्या दरम्यान नाश्ता करणे गरजेचाच आहे.
ओट्स उपमा
ओट्स उपमा बनवण्यासाठी तुम्हाला १ वाटी ओट्स, हळद, मीठ, चिरलेली मिरची, चिरलेला कांदा, गाजर, हिरवे वाटाणे, बारीक चिरलेली सिमला मिरची, कढीपत्ता, उडीद डाळ, तेल, काळी मोहरी, लिंबू, हिरवी धणे लागेल.
हे करण्यासाठी कढईत १ चमचा तेल घेऊन त्यात ओट्स, हळद, मीठ आणि हिरवी मिरची घालून ४-५ मिनिटे परतून घ्या आणि थोडे पाणी घालून मऊ होण्यासाठी बाजूला ठेवा. आता दुसर्या पॅनमध्ये १ चमचा तेल गरम करून त्यात मोहरी, उडीद डाळ, कढीपत्ता, हळद आणि कांदा घालून सर्व काही परतून घ्या.
आता गाजर, सिमला मिरची आणि वाटाणे घालून शिजवा. सर्व भाज्या शिजल्यावर त्यात ओट्स घालून वरून लिंबाचा रस आणि कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.
ओट्स चिला
ओट्सपासून चीला बनवण्यासाठी १ कप ओट्सच्या पिठात २ चमचे रवा, चिरलेला कांदा, चिरलेली शिमला मिरची, हिरवे धणे, दही किंवा ताक, मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोमट पाणी आणि हळद एकत्र करून द्रावण तयार करा. आता गॅसवर पॅन ठेवा आणि त्यावर हलके तेल लावा आणि ओट्स पिठात घाला. हा चीला दोन्ही बाजूंनी भाजून चटणीसोबत सर्व्ह करा.
ओट्स इडली
ओट्स इडली बनवण्यासाठी १ वाटी ओट्सचे पीठ घ्या आणि त्यात किसलेले गाजर, मीठ, दही, १ चमचा तेल टाकून इ़डलीसारखे पीठ भिजवा. आता इडली बनवण्याचे भांडे तेलाने ग्रीस करा आणि ओट्स इडली पिठात घाला. वाफवून घ्या आणि तयार झाल्यावर नारळाची चटणी आणि सांबार बरोबर सर्व्ह करा.
दही आणि ओट्स
दही ओट्स बनवण्यासाठी ओट्स रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी पाणी काढून ओट्स वेगळे काढून त्यात ताजे दही मिसळा. आता तुमच्या चवीनुसार मध घाला आणि वरती आंबा, केळी सारखी हंगामी फळे घाला. तुम्ही त्यात खरबूज आणि भोपळ्याच्या बिया मिसळूनही खाऊ शकता.
ओट्स खीर
ओट्सची खीर बनवण्यासाठी १ कप ओट्स, अर्धा लिटर दूध, तुमच्या आवडीचे ड्राय फ्रूट्स, साखर घ्या. खीर बनवण्यासाठी आधी ओट्स थोडे फ्राय करून घ्या. आणि नंतर त्यात दूध घालून शिजवा आणि नंतर ओट्स शिजल्यावर त्यात साखर आणि ड्रायफ्रूट्स घालून सर्व्ह करा. ही खीर तुम्ही फ्रिजमध्ये ठेवूनही खाऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.