Weight Loss Recipe esakal
लाइफस्टाइल

Weight Loss Recipe : डायटवर आहात तर रात्रीच्या भुकेला असं करा शांत, सोप्या आहेत रेसिपी

डायटमध्ये सतत लागणाऱ्या भुकेसाठी भन्नाट पर्याय आहेत हे पदार्थ

Pooja Karande-Kadam

Weight Loss Recipe :

जगाची काळजी एकीकडे अन् वजन कमी करण्याची काळजी एकीकडे. आजकाल अनेक लोक वजन वाढण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. वाढलेल्या आजारामुळे मधुमेह, कोलेस्टेरॉल वाढणे असे अनेक आजारांची लागण होते. त्यामुळे कसेही करून वजन कमी व्हावे यासाठी प्रयत्न करत आहेत.

काही लोक यासाठी डायट करतात. पण डायटमध्ये खायचं काय हा प्रश्न असतो. कारण, दोन वेळच्या जेवणाला स्कीप करून त्याजागी पोट भरेल पण जास्त कॅलरी नसलेलं खायचं काय हा प्रश्न असतो. जेव्हा काही खायची इच्छा नसेल तेव्हाही या पदार्थांचा विचार केला जाऊ शकतो.   

तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी योग्य आहार खूप महत्त्वाचा आहे. आपण काय खात आहात याकडे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे. काही लोकांच्या मते, रात्रीचे जेवण लवकर घेणे किंवा वेळेवर अन्न खाणे हे वजन कमी करण्याच्या प्रवासात खूप प्रभावी ठरू शकते. यासाठी आज आपण काही सोप्या रेसिपी पाहुयात.

डाळ खिचडी

- 1 कप तांदूळ
- 1/4 कप चना डाळ
- 1/4 कप तूर डाळ
- 1/4 कप मसूर डाळ
- 1/4 कप मूग डाळ
- 1 टीस्पून हळद
- 1 टीस्पून तूप
- पाणी
- 1 टीस्पून जिरे
- 2- ३ सुक्या लाल मिरच्या
- मीठ (चवीनुसार)

 

पद्धत:

खिचडी बनवण्याच्या अनेक पद्धती आहेत. कुकरमध्ये खिचडीची ही सोपी पद्धत तुम्ही बनवू शकता. मसूर आणि तांदूळ नीट धुवून घ्या. कुकरमध्ये ठेवा, पाणी, हळद आणि मीठ घाला. झाकण ठेवून शिजवा. आता फोडणीच्या पातेल्यात तूप घेऊन त्यात जिरे आणि तिखट टाका. आता कुकरमध्ये घालून मिक्स करा. त्यावर तुम्ही कोथिंबीर घालू शकता. सोबत पापड, दही, लोणचे यासोबत खाऊ शकता.

व्हेज पुलाव

- 3 चमचे तेल/तूप
- 1 तमालपत्र
- दालचिनीचा तुकडा
- 2 वेलची
- 1/2 टीस्पून जिरे
- 1/2 कांदा (बारीक चिरलेला)
- 1 हिरवी मिरची (बारीक चिरलेली)
- बीन्स, गाजर, मटार, शिमला मिरची, कोबी, बटाटा आणि तुम्हाला हव्या असलेल्या भाज्या
- १ कप तांदूळ (धुवून भिजवून)
- मीठ (चवीनुसार)
- बारीक चिरलेली कोथिंबीर

 

पद्धत:

एका कढईत तूप टाका. त्यात तमालपत्र, दालचिनी, वेलची आणि जिरे टाका. कांदा व मिरची घालून परता. भाज्या घालून थोडावेळ परतून घ्या. तांदूळ घालून थोडा वेळ शिजवा. यानंतर, त्यात पाणी घाला, मीठ घाला, चांगले मिसळा आणि 20 मिनिटे उकळवा. ही रेसिपी तुम्ही प्रेशर कुकरमध्येही बनवू शकता. रायता किंवा कोणत्याही करीसोबत सर्व्ह करा. (Recipe)

छोले सॅलेड

- 2 कप चणे/ छोले (भिजवून उकडून घेणे)
- 1 छोटा टोमॅटो (बारीक चिरलेला)
- 1 काकडी (बारीक चिरलेला)
- 1 छोटा कांदा (बारीक चिरलेला)
- 1 हिरवी मिरची (बारीक चिरलेली)
- मीठ (चवीनुसार)
- लिंबाचा रस (चवीनुसार)
- हिरवी कोथिंबीर

पद्धत:

एका मोठ्या भांड्यात हे सर्व साहित्य मिसळा. निरोगी रात्रीचे जेवण तयार आहे. हा देखील एक आरोग्यदायी नाश्ता आणि दुपारच्या जेवणाचा पर्याय आहे. तुम्ही त्यात पनीर/टोफू किंवा उकडलेले कॉर्न देखील घालू शकता.

मूग, बाजरीची खिचडी

- 1/4 कप बाजरी
- 1/4 कप मूग
- 1/2 कप हिरवे वाटाणे
- 1/2 कप बारीक चिरलेला कांदा
- 1 कप चिरलेला टोमॅटो
- 1/2 टीस्पून आले पेस्ट
- 1/2 टीस्पून हिरवी मिरची पेस्ट
- 1/ 2 टीस्पून हळद
- 1/2 टीस्पून लाल मिर्च पावडर
- 2 टीस्पून तेल
- 1 टीस्पून जिरे
- मीठ (चवीनुसार)

पद्धत:

बाजरी आणि मूग 5-6 तास पाण्यात भिजत ठेवा. यानंतर कुकरमध्ये बाजरी, मूग आणि वाटाणे टाकून थोडे मीठ घालून ५ शिट्ट्या शिजवून घ्या. कढई घ्या, तेल गरम करा आणि जिरे घाला. यानंतर हिंग व कांदा घालावा. 

1-2 मिनिटे तळून घ्या. टोमॅटो, लसूण आले पेस्ट घालून काही सेकंद ढवळा. यानंतर त्यात हळद, तिखट, मीठ घालून मध्यम आचेवर शिजवा. कढईत बाजरी, मूग आणि वाटाणे टाका. पाणी घालून मिक्स करा. पॅन झाकून 2-3 मिनिटे मध्यम आचेवर शिजवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT