Weight Loss Rules esakal
लाइफस्टाइल

Weight Loss Rules : वजन कमी करण्यासाठी फॉलो करा हे नियम, चरबी मेणासारखी वितळेल!

Weight Loss Mistakes : बऱ्याचवेळा डायट फॉलो करूनही वजन कमी होत नाही. कारण...

सकाळ डिजिटल टीम

Weight Loss Rules :

आजकालच्या लोकांची बिघडलेली लाईफस्टाईल त्यांच भविष्य दाखवतआहे.चुकीच्या वेळी खाणं आणि झोप न घेणं याचा थेट परिणाम लोकांच्या वजनावर होत आहे. वाढलेलं वजन हा एक चर्चेचा मुद्दा आहे.

आजकाल सर्वजण एका शर्यतीत पळत आहेत. ही शर्यत वजन कमी करण्याची आहे. कुठलाही कौंटुंबिक कार्यक्रम असेल किंवा कुठलाही ऑफिसची मिटींग.चर्चा असते ती वाढलेले पोट अन् वजन कसं करावं याची.

काही लोक या चर्चेत वाढलेलं वजन कमी कसं करायंचं हे सांगतात.पण, बऱ्याचवेळा डायट फॉलो करूनही वजन कमी होत नाही. कारण, तुम्हीही वजन कमी करत असताना अशा काही चूका करत असता. ज्या तुमच्या वजन कमी करण्याच्या पद्धतीत आडवे येत असतात.

दररोज व्यायाम करता का?

वाढलेले वजन कमी करण्यासाठी लोकसंख्या व्यायाम करा. लोकांना व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही, तसेच व्यायाम करायचा कंटाळा येतो. त्यामुळे लोक डायटवर भर देतात आणि व्यायाम करणे बंद करतात. पण तुम्हाला माहिती आहे का तुम्ही दररोज 45 मिनिटे व्यायाम केला तरच तुमचं वजन कमी होईल.

डायटच्या भरोशावरती राहून वजन कमी होईल म्हणून वाट पाहत असाल तर ते चुकीचं ठरेल. तुम्हाला योगासने,एक्सरसाइज आवडत नसतील किंवा जमत नसतील. तर तुम्ही दररोज सायकल चालवणे, धावणे, पोहणे असे व्यायाम करू शकता.

जेवण बंद केलंय का?

लोक जेवण कमी करतात हे चुकीचं आहे. वजन कमी करण्याच्या दृष्टीने जेवण कमी करणे नाही तर जेवणातील कॅलरी कमी करणे गरजेचे असते. असे डायटेशन्स आणि न्यूट्रिशनिस्ट सांगत असतात. जर तुम्हाला वजन फास्ट कमी करायचं असेल तर पुरेपूर जेवण घेऊन त्यातील गोड आणि कॅलरी असलेले पदार्थ कमी करा. तरच त्या डायटचा तुम्हाला फायदा होईल.

पाणी भरपूर पिणे

लोक जेव्हा वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात तेव्हा ते नारळ पाणी, डिटॉक्स वॉटर, ज्यूस यावर भर देतात. कारण डाएट असल्याने असे पदार्थ आपल्याला एनर्जी देतील असं त्यांना वाटतं. हे बरोबर सुद्धा आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, की तुम्ही दररोज भरपूर प्रमाणात पाणी पिल्याने सुद्धा वजन कमी होते.

काही वेळा फक्त साधं पाणी पिण्याचा कंटाळा आला असेल तर कधी उकळलेलं, कधी कोमट तर कधी लिंबू पाणी पिऊ शकता हे तुमच्या बॉडीसाठी फायदेशीर ठरेल.

डायट कोणता करावा

तुम्ही वजन कमी करण्यासाठी डायट करत असाल तर त्या डायट मध्ये प्रोटीन युक्त आहाराचा समावेश करा. तसेच आपल्या शरीरासाठी फायबरयुक्त आहार थोडा फायदेशीर ठरतो. वजन कमी करायचं असेल तर सोयाबीन, व्हाईट एग, असे पदार्थ तुम्ही आहारात नक्की खाल्ले पाहिजे.

अपुरी झोप घेणे

पुरेपूर प्रमाणात झोप घेणे सुद्धा वजन कमी करण्याच्या दृष्टीने पाऊलच आहे. अपुरी झोप तुम्हाला वाढलेले वजन भेट करू शकते. त्यामुळे तुम्ही वजन कमी करत असाल तर पुरेपूर झोप घ्या. पुरेपूर आठ तासांची झोप झाली पाहिजे. यासाठी तुमचा मोबाईल स्विच ऑफ करून ठेवा आणि शांत झोपून टाका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT