weight loss recipe esakal
लाइफस्टाइल

Weight Loss Soup: गॅरेंटी देतो, डायटने नाही तर या सूपने नक्की कमी होणार वजन!

सकाळ डिजिटल टीम

थंडीच्या दिवसात शरीराला केवळ आराम आणि वेगवेगळे जिभेचे चोचले पुरवणारे पदार्थ खाल्ले जातात. त्यामूळे हिवाळ्यात शरीर सुंद होते आणि वजनही वाढते. वाढलेल्या वजनाची काळजी करत काही लोक डायट करतात, योगा व्यायाम करतात. पण, हिवाळ्यात शरीर आळशी बनल्याने ते कितपत साथ देईल हा मोठा प्रश्न असतो.

हिवाळ्यात सतत काहीतरी गरम खाण्याची इच्छा होते. तूम्हालाही काही वेगळं ट्राय करायचं असेल तर कॉर्न सूप खाणे फायद्याचे ठरते. कॉर्न सूप जेवढे स्वादिष्ट आहे, तेवढेच ते आरोग्याच्या दृष्टीनेही फायदेशीर आहे.

मक्यामध्ये मुबलक प्रमाणात पोषक तत्वे असतात. यामध्ये अतिउच्च फायबर असते. या हिवाळ्यात, जर तुम्हाला जास्त वजन वाटत असेल तर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात कॉर्न सूपचा समावेश करू शकता.

सूप चवदार तर आहेत पण त्यासोबतच तुमचे वजन कमी करण्यास देखील मदत करू शकते. होय, एका संशोधनात दावा करण्यात आला आहे की, जेवणापूर्वी जर तूम्ही कॉर्न सूप खाल्ले तर तूमचे वजन हमखास कमी होईल.

असे हे फायदेशीर सूप बनवायलाही अगदी सोपे आहे. ते बनलायला केवळ दोन मिनिटे लागतात. तुम्ही आजपर्यंत घरी कधीही कॉर्न सूप केले नसेल  तर आज या जादूई सूपची रेसिपी आम्ही सांगतो. वजन कमी करणारे स्वीट कॉर्न सूप बनवण्याचे साहित्य आणि कृती पुढीलप्रमाणे

साहित्य

  • स्वीट कॉर्न - 1 कप,

  • बारीक चिरलेला कांदा – 4,

  • लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या – 2,

  • गाजर बारीक चिरून - 1/4 कप,

  • आले बारीक चिरून - 1 इंच,

  • बीन्स बारीक चिरून - 1/4 कप,

  • कॉर्नफ्लोर – 1 कप,

  • टीस्पून व्हिनेगर - 1 टीस्पून,

  • काळी मिरी पावडर - 1 टीस्पून,

  • ऑलिव्ह ऑईल - 3 टीस्पून,

  • मीठ – चवीनुसार

कृती

  • कॉर्न सूप बनवण्यासाठी प्रथम कांदा, लसूण, आले, गाजर आणि बीन्स बारीक चिरून घ्या.

  • आता एका कढईत ३ चमचे ऑलिव्ह ऑईल गरम करायला ठेवा.

  • यानंतर तेलात लसूण आणि आल्याचे तुकडे टाकून तळून घ्या.

काही सेकंदांनंतर कढईत कांदा परतून घ्या. आता त्यात अर्धी वाटी स्वीट कॉर्न, गाजर आणि बीन्स टाका. किमान 2 मिनिटे ढवळत रहा. सर्व भाज्या शिजल्या की गरमागरम सूपवर ताव मारा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddiqui Case: हरियाणाच्या कतार तुरुंगात कट रचला, नंतर मुंबईत आले अन् घडवलं कृत्य, चौकशीत आरोपीनं सगळचं सांगितलं!

Pune Crime : बोपदेव घाट लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे; इतर दोन आरोपींचा शोध अद्याप सुरूच

Women's T20 World Cup: निराश नका होऊ! टीम इंडिया अजूनही Semi Final ला जाणार; दुसऱ्या पराभवानंतर वाचा कसं आहे गणित

Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा भारताविरुद्ध रोमांचक विजय, Semi-Final मध्येही मारली धडक; हरमनप्रीतची फिफ्टी व्यर्थ

Football India: व्हिएतनामविरुद्धचा सामना ड्रॉ; कोच मॅनोलो मार्क्वेझ यांच्या पहिल्या विजयाची प्रतीक्षा लांबली

SCROLL FOR NEXT