Curry leaves benefits In Marathi : प्रत्येकच्या स्वयंपाकघरामध्ये हिरव्या मसाल्यातील कढीपत्ता अगदी सहजासहजी आढळतो. कढीपत्त्याच्या फोडणीमुळे डाळी तसंच भाज्यांची चव अधिक रूचकर होते. पण तुम्हाला माहीत आहे का? कढीपत्त्याची हिरवी पाने केवळ स्वयंपाकाची चवच वाढवत नाहीत तर तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात.
कढीपत्त्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, व्हिटॅमिन सी, कॅरोटीन, कॅल्शिअम, लोह यासारख्या पोषणतत्त्वांचा मोठ्या प्रमाणात साठा असतो. या घटकांमुळे अनेक शारीरिक समस्या कमी होण्यास मदत मिळते. या लेखाद्वारे आपण कढीपत्ता पाण्यात उकळून त्याचे सेवन केल्यास काय फायदे मिळू शकतात, याची माहिती जाणून घेणार आहोत.
कढीपत्ता पाण्यात उकळून त्याचे पाणी प्यायल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. यातील अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्मामुळेच रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते, ज्यामुळे कित्येक आजारांपासून आरोग्याचे संरक्षण होते.
तुम्ही शरीराचे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर कढीपत्त्याचा आहारामध्ये नक्की समावेश करावा. कारण यामध्ये कॅलरीज् चे प्रमाण कमी आणि फायबरचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जमी होत नाही.
फायबरचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या उद्भवत नाही. तसंच रक्तातील शर्करेची पातळी देखील नियंत्रणात राहते. कढीपत्त्याच्या सेवनामुळे केस, त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्यासही भरपूर लाभ मिळतात.
कढीपत्त्यामुळे शरीराची पचनक्रिया देखील मजबूत होते. यामुळे चयापचयाचीही क्षमता सुधारते. ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त विषारी घटकही सहज शरीराबाहेर फेकले जातात. परिणामी वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. कढीपत्त्यातील पोषणतत्त्व हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत.
एक ग्लास पाणी
आवश्यकतेनुसार कढीपत्ता
गॅसवर एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवा. यानंतर कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुऊन घ्या आणि पाण्यामध्ये मिक्स करा. काही वेळ कढीपत्त्यासह पाणी उकळून घ्या. यानंतर गॅस बंद करावा. एका ग्लासमध्ये पाणी गाळून घ्यावे व प्यावे.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.