Weight Loss Tips  esakal
लाइफस्टाइल

Weight Loss Tips : डेअरी प्रोडक्ट खाऊन वजन वाढणार नाही तर कमी होणार, सुटलेली ढेरी कमी करण्याचा हा आहे बेस्ट फॉर्म्युला

Weight Loss च्या प्रवासात दुग्धजन्य पदार्थ हवेतच, कारण...

Pooja Karande-Kadam

Weight Loss Tips : आजच्या काळात वाढलेलं वजन, सुटलेली ढेरी ही सर्वात मोठी समस्या बनली आहे. आजच्या काळात लोक वजन कमी करण्यासाठी, जिममध्ये तासनतास घाम गाळतात आणि विविध डायट देखील फॉलो करतात. पण अनेक वेळा हे सगळं करूनही वजन कमी होत नाही.

बरेच लोक वजन कमी करताना दुग्धजन्य पदार्थांचे सेवन पूर्णपणे बंद करतात. यामुळे हाडे कमकुवत होण्यासोबतच त्वचेच्या समस्या आणि पचनाच्या समस्याही उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत वजन कमी करताना दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केले जाऊ शकते.

बहुतेक लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की वजन कमी करताना दुग्धजन्य पदार्थांचे सेवन कसे करावे, त्यामुळे वजन कमी होण्याआधी जास्तच वाढेल का, अशी शंकाही असते. शेवटी, वजन कमी करण्यासाठी दुग्धजन्य पदार्थ कसे वापरावे? हे पाहुयात.

बेस्ट आहे दही

वजन कमी करण्यासाठी दह्याचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. दह्यामध्ये कॅल्शियम भरपूर असण्यासोबतच याच्या सेवनाने पचनसंस्थाही निरोगी राहते. वजन कमी करण्यासाठी, दही नाश्ता किंवा दुपारच्या जेवणात खाऊ शकतो. दह्याचे सेवन केल्याने त्वचाही चमकदार होते आणि सुटलेली ढेरीही कमी होते.

पनीर

पनीर शरीरासाठी फायदेशीर आहे. यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी12 आणि प्रोटीन आढळतात. याच्या सेवनाने स्नायू तयार होण्यास मदत होते आणि वजनही कमी होते. पनीरमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. अशा स्थितीत याचे सेवन केल्याने जास्त वेळ भूक लागत नाही आणि वजनही कमी होते. हे चयापचय देखील वाढवते. (Weight Loss Tips)

चीज खाऊन वजन कमी होतं

ग्रीक दही

वजन कमी करण्यासाठी प्रोबायोटिक्सचे सेवन देखील केले जाऊ शकते. पोट निरोगी ठेवण्यासोबतच प्रोबायोटिक्समुळे छातीत होणारी जळजळ, पित्त ही कमी होते. प्रोबायोटिक पदार्थांमध्ये ग्रीक दही वापरता येते. हे चयापचय वाढवते आणि शरीर निरोगी ठेवते.

चीज करेल मदत

वजन कमी करण्यासाठी तुम्ही चीजचे सेवन देखील करू शकता. पण चीज खाताना ते मर्यादित प्रमाणातच खाण्याची विशेष काळजी घ्या. चीजमध्ये प्रोटीन असते. अशा स्थितीत याचे सेवन केल्यावर तुम्हाला जास्त वेळ भूक लागणार नाही आणि तुमचे वजन कमी होईल. तुम्ही मेयोनेझचे सेवन करत असाल तर त्याऐवजी चीज वापरू शकता.

वजन कमी करण्यासाठी अशा प्रकारे दुग्धजन्य पदार्थांचा वापर केला जाऊ शकतो. मात्र, तुम्हाला कोणताही आजार किंवा अॅलर्जीची समस्या असल्यास डॉक्टरांना विचारूनच या गोष्टींचे सेवन करा.

दही खाल्ल्याने अन्नाचे पचनही चांगले होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT