Weight Loss Tips : शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी अनेक आजारांना आमंत्रण देते. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्याही दिसून येत आहेत. सांधेदुखी, श्वास घेण्यात अडचण, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल, उच्च रक्त शर्करा आणि हृदयविकार इत्यादींसाठी हा एक महत्त्वाचा घटक जबाबदार आहे. म्हणून, शरीरातील चरबीचे प्रमाण योग्य राखणे आणि अतिरिक्त चरबी कमी करणे खूप महत्वाचे आहे.
परंतु जे तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न करतात, बॉडी बिल्डिंग करतात किंवा चरबी कमी करण्याचा आणि स्नायू बनवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी एक प्रश्न ते सहसा विचारतात की ते त्यांच्या चरबी वितळतेय की नाही हे कसं ओळखायचं, तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर याचं उत्तर आम्ही तुम्हाला देतो.
शरीरातील चरबी वितळत असताना शरीर आपल्याला काही सिग्नल देतं. ते सिग्नल्स ओळखून तुम्ही वजन कमी होतंय की नाही हे तपासू शकता.
वजन हळूहळू कमी होत आहे
वजन कमी होण्याचा प्रवास लगेचच होणार नाही. त्यामुळे दररोज सारख्याच कॅलरीज घेतल्यावरही तुमचे वजन हळूहळू कमी होत असेल तर समजून घ्या की तुमची अतिरिक्त चरबी कमी होत आहे.
हलके वाटणे
शरीरात वजन कमी व्हायला लागले तर आपल्याला कमी थकवा येतो. वजन करताना अनेक वेळा तुमचे वजन समान आहे असे दिसते, तरीही तुम्हाला हलके वाटते, हे शरीरातील चरबी वितळत असल्याचे लक्षण आहे. (Weight Loss Tips)
व्यायामाचा कंटाळा येत नाही
तुम्हाला हे समजेल की पूर्वी व्यायाम करणे तुम्हाला शिक्षेसारखे वाटायचे, परंतु आता तुम्हाला व्यायामाचा आनंद वाटतो. कारण तुमच्यात एक नवी एनर्जी संचारलेली असते. त्यामुळे वजन कमी होताना नवा उत्साह संचारणे हे देखील एक लक्षण आहे.
कपडे सैल होऊ लागतात
डाएटिंग न करता फक्त व्यायाम केल्याने तुमचे वजन कमी होते. त्याचे मुख्य लक्षण म्हणजे तुमचे सध्याचे कपडे तुम्हाला सैल होऊ लागतात. कपडे सैल होऊ लागले आहेत असे लक्षात आले तर ते शरीरातील चरबी कमी झाल्यामुळे असू शकते.
उत्साही वाटणे
जेव्हा तुमच्या शरीरातील चरबी कमी होते, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला शरीरात पूर्वीपेक्षा जास्त ऊर्जा जाणवते.
आनंदी राहा
शरीरातील चरबीच्या प्रमाणामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते, ज्यामुळे मूड बदलणे, चिडचिडेपणा आणि जास्त राग येणे यासारख्या समस्या देखील दिसू शकतात. पण जेव्हा चरबी कमी होऊ लागते तेव्हा तुम्हाला आनंद आणि शांतता वाटते.
आरबट चरबट खाणे बंद होते
जर तुम्हाला आता गोड, जंक आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा कंटाळा येत असेल, तर त्याचे कारण शरीरातील चरबी कमी होऊ शकते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.