डिप्रेशन, तणाव या समस्यांमधून आतापर्यंत वयस्क व्यक्ती गेल्याच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या आहेत. मात्र, सध्याच्या काळात वयस्क व्यक्तींप्रमाणेच लहान मुलेदेखील नैराश्य व तणाव या समस्यांना सामोरे जात असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेकदा लहान मुलं चिडचिड करताना दिसतात. परंतु, त्यांच्या स्वभावात झालेल्या या बदलाविषयी पालक फारसं लक्ष देत नाही. मात्र, जर तुमची मुलं खरंच चिडचिड करत असतील, अचानकपणे शांत झाली असतील किंवा त्यांच्या वागण्याबोलण्याच्या पद्धतीत बदल झाला असेल तर तुमची मुलं नैराश्यात असू शकतात. विशेष म्हणजे अनेकदा पालकांच्या मुलांकडून काही अपेक्षा असता, या अपेक्षांच्या ओझ्यामुळेही मुलं तणावात जाऊ शकतात. (what are the signs show that your child is in stress)
१. झोपेची समस्या-
लहान मुले मानसिक दबावाखाली किंवा डिप्रेशनमध्ये असतील तर त्यांना झोपेची समस्या निर्माण होते. ज्याप्रमाणे वयस्क लोकांना डिप्रेशनमध्ये असताना झोप न येणे, अस्वस्थ वाटणे या समस्या जाणवतात. त्याच समस्या मुलांमध्येही दिसून येतात. यात अनेकदा मुलांना वाईट स्वप्नदेखील पडतात.
२. चिडचिड करणे -
जर तुमचं मुलं प्रत्येक मिनिटाला लहान-लहान कारणांवरुन चिडत असेल तर तो मानसिक समस्यांनी त्रस्त आहेत असं समजावं. कारण, बऱ्याचदा दडपणाखाली आल्यामुळे मुलं चिडचिड करु लागतात.
३. नखे तोडणे -
साधारणपणे अनेक लहान मुलं दाताने नख तोडत असतात. परंतु, जर मुलं वारंवार अशी नख चावत असतील तर ते डिप्रेशनमध्ये असू शकतात.
४. खाण्याच्या सवयीत बदल -
मुलं तणावग्रस्त असताना त्यांच्या खाण्याच्या सवयींमध्ये बदल होतो. यात काही मुलं प्रमाणापेक्षा जास्त खाऊ लागतात. तर काही जणांना भूकच लागत नाही.
५. मूड स्विंग्स -
लहान मुलांचे मूड हे प्रत्येक क्षणाला बदल असतात. परंतु, तणावात असताना मुलांचे मूड जास्त प्रमाणात स्विंग्स होतात. यात बहुतेकवेळा त्यांना राग जास्त येतो. त्याच्या मनाविरुद्ध एखादी घटना घडली की ते लगेच चिडचिड करु लागतात. किंवा, अनेकदा ते तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्षदेखील करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.