How to Apply Concealer esakal
लाइफस्टाइल

How to Apply Concealer : कन्सिलर म्हणजे काय ? कन्सिलर लावण्याची ‘ही’ योग्य पद्धत घ्या जाणून

चेहऱ्याचा मेकअप पूर्ण करण्यासाठी कन्सिलरची मदत होते.

सकाळ डिजिटल टीम

How to Apply Concealer : मेकअप हा विषय महिलांच्या अत्यंत जवळचा विषय आहे. मेकअप करायला सगळ्यांनाच आवडतं. खास कार्यक्रमांसाठी किंवा एखाद्या पार्टीसाठी आवर्जून मेकअप केला जातो. मेकअपमध्ये आता असंख्य गोष्टींचा समावेश होतो. काळानुसार मेकअपमध्ये अनेक प्रकारचे ट्रेंड आले आणि विविध प्रॉडक्ट्स देखील आले.

परंतु, या सर्व प्रॉडक्ट्सबद्दल नीटशी माहिती नसल्यामुळे ते प्रॉडक्ट्स नेमके वापरायचे कसे ? त्याचा वापर कसा करायचा ? याबद्दल काहीशी गोंधळाची परिस्थिती महिलांमध्ये दिसून येतो. कन्सिलर हे एक असे प्रॉडक्ट आहे. ज्याच्या शिवाय, मेकअप पूर्ण होऊ शकत नाही.

आज आपण कन्सिलर म्हणजे काय ? आणि कन्सिलर लावण्याची योग्य पद्धत कोणती ? याविषयी जाणून घेणार आहोत.

कन्सिलर म्हणजे काय ?

अनेक महिलांना कन्सिलर म्हणजे काय ? हेच माहित नसल्यामुळे त्याचा वापर विविध प्रकारे कसा केला जातो ? याची त्यांना पुसटशी कल्पना नसते. कन्सिलर हे एक प्रकारचे मेकअप प्रॉडक्ट आहे. चेहऱ्याचा मेकअप पूर्ण करण्यासाठी कन्सिलरची मदत होते. कन्सिलरमुळे तुमच्या चेहऱ्याचा एक बेस तयार होतो. शिवाय, चेहऱ्याला एकसमान टोन कन्सिलरमुळे येतो.

चेहऱ्यावरील काळे डाग आणि रेड रॅशेस लपवण्यासाठी कन्सिलरचा प्रभावीपणे वापर केला जातो. कन्सिलरमुळे हे सर्व डाग लपले जातात. एवढचं काय तर डोळ्यांखालची काळी वर्तुळे लपवण्यासाठी ही कन्सिलरचा वापर केला जातो.

डोळ्यांखालची काळी वर्तुळे लपवण्यासाठी तुम्ही ऑरेंज कलर बेस्ड कन्सिलरचा वापर करू शकता. तसेच, चेहऱ्यावरील लाल पुरळ, लाल रॅशेस लपवण्यासाठी हिरव्या रंगाच्या कन्सिलरचा वापर नक्की करा.

कन्सिलर लावण्याची योग्य पद्धत कोणती ?

  • सर्वात आधी तुमचा चेहरा फेसवॉशने धुवा. आता चेहऱ्याचे स्क्रबिंग करा.

  • त्यानंतर, टॉवेलच्या सहाय्याने चेहरा पुसून घ्या. त्यानंतर चेहऱ्याला मॉईश्चरायझर लावा आणि प्रायमर लावा.

  • डोळ्यांखालील काळी वर्तुळे झाकण्यासाठी ऑरेंज कलर बेस्ड असलेले कन्सिलर लावा. यासाठी पिवळ्या रंगाचे कन्सिलरही वापरू शकता. यासाठी डोळ्यांखाली एक लाईन ओढा त्यानंतर तुमच्या काळ्या वर्तुळाच्या आकाराप्रमाणे कन्सिलर गालांवर लावा. यामुळे चेहऱ्याला फूल कव्हरेज मिळेल.

  • आता, ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने हे सर्व कन्सिलर चांगल्या प्रकारे ब्लेंड करा.

  • कन्सिलर ब्लेंड केल्यानंतर एक चांगल्या क्वालिटीचे फाऊंडेशन घ्या, जे तुमच्या स्किन टोनला सूट होणारे असेल.

  • त्यानंतर, ही जर तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग, डार्क सर्कल्स दिसत असतील तर तुम्ही लिक्विड कन्सिलरचा ही वापर करू शकता.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

Latest Maharashtra News Updates : मला कोणी गाडू शकत नाही- अब्दूल सत्तार

Sharad Pawar : पवार, मुंडे यांनी बीडमधील राष्ट्रवादीतील कलह मिटवला, महायुतीच्या क्षीरसागरांना मिळाले समर्थन

Pune Crime News: पाकिटावर लिहिलं ५० हजार रुपये! आतमध्ये निघाली कागदं; पुण्यात पोलिस असल्याचा बनाव करुन सराफाची फसवणूक

SCROLL FOR NEXT