Face Roller Benefits : चेहऱ्याची त्वचा तरूण आणि चमकदार दिसण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय केले जातात. यामध्ये काही घरगुती तर काही केमिकल्सने युक्त असलेल्या स्किनकेअर प्रॉडक्ट्सचा वापर केला जातो. मात्र, ज्यांची त्वचा संवेदनशील आहे, अशा लोकांना त्वचेची खास काळजी घेणे हे फार महत्वाचे आहे.
मात्र, आता त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही फेस रोलरचा वापर करू शकता. फेस रोलरचा वापर केल्याने तुमची त्वचा दीर्घकाळ तरूण राहू शकते. आजकाल फेस रोलरचा वापर महिलांकडून मोठ्या प्रमाणात केला जात आहे.
या फेस रोलरचा वापर केल्याने त्वचेतील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते आणि त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते. आज आपण त्वचेसाठी लाभदायी असणारा फेस रोलर काय आहे? आणि याचे फायदे कोणते आहेत? ते जाणून घेणार आहोत.
फेस रोलर हे एक प्रकारचे ब्युटी प्रॉडक्ट आहे. ज्याचा वापर तुम्ही त्वचा आणि मान यांचा मसाज करण्यासाठी करू शकता. फेस रोलरचा वापर केल्याने त्वचेतील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. मुरूम आणि चेहऱ्यावरील सुरकुत्यांची समस्या दूर करण्यास यामुळे फायदा होतो. तुमची त्वचा कोणत्याही प्रकारची असो तुम्ही बिनधास्तपणे फेस रोलरचा वापर करू शकता. (Know What is a face roller)
चेहऱ्यावर फेस रोलरचा वापर केल्याने त्वचेला नैसर्गिक चमक मिळण्यास मदत होते. शिवाय, फेस रोलरमुळे त्वचेतील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते, ज्यामुळे त्वचेवर ग्लो येतो आणि त्वचा निरोगी बनते.
फेस रोलरचा नियमितपणे चेहऱ्यावर वापर करण्यापूर्वी तुम्ही कोणत्याही प्रकारचे मात्र, तुमच्या त्वचेला सूट होणारे फेस सीरम, किंवा फेशिअल ऑईल लावा. त्यानंतर, फेस रोलरने चेहऱ्याचा मसाज करा. फेस सीरम किंवा फेशिअल ऑईलमुळे चेहऱ्यावरील समस्या दूर होण्यास मदत होते. यासोबतच चेहऱ्यावरील सुरकुत्यांपासून सुटका होते.
जर तुमची त्वचा पफी असेल किंवा चेहऱ्यावर सूज असेल तर फेस रोलरचा जरूर वापर करा. फेस रोलरचा वापर केल्याने चेहऱ्यावरील पफीनेस आणि चेहऱ्यावरील सूज कमी होण्यास मदत होऊ शकते. त्वचेवर फेस रोलरने मसाज केल्याने तुमचा मूड चांगल्या प्रकारे सुधारतो.
फेस रोलरचा नियमितपणे वापर केल्यास सैल त्वचेची समस्या दूर होते आणि तुमची त्वचा टाईट होण्यास मदत होते. (Benefits of face roller)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.