How to Apply Foundation esakal
लाइफस्टाइल

How to Apply Foundation : फाऊंडेशन म्हणजे काय? ‘ही’ आहे लावण्याची योग्य पद्धत

What is the correct method of applying foundation? जाणून घ्या फाऊंडेशन योग्य पद्धतीने लावन्याची पद्धत...

Monika Lonkar –Kumbhar

How to Apply Foundation : मेकअप म्हटलं की त्यात बऱ्याच गोष्टी आल्या. फाऊंडेशन, कन्सिलर, प्रायमर, मस्कारा, काजळ, लिपस्टिक, आयशॅडोज, ब्लशर इत्यादी अनेक घटकांचा मेकअपमध्ये समावेश होतो. या सर्व गोष्टी नसतील तर मेकअप सुद्धा अपूर्ण आहे.

अनेक महिलांना मेकअप करायला आवडतो. आजकाल तर मेअकपची जणू क्रेझच निर्माण झाली आहे. मात्र, मेकअप जर योग्य पदध्तीने केला तर तो चांगल्या प्रकारे उठून दिसतो. अनेक महिलांना फाऊंडेशन लावायला आवडते मात्र, ते योग्य पद्धतीने लावणे सुद्धा महत्वाचे आहे.

जर फाऊंडेशन योग्य पद्धतीने लावले नाही तर तुमचा मेकअप खराब दिसू शकतो. त्यामुळे, आज आम्ही तुम्हाला फाऊंडेशन लावण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत.

फाऊंडेशन म्हणजे काय?

मेकअपमध्ये सर्वात महत्वाचा भाग म्हणजे फाऊंडेशन होयं. नावाप्रमाणेच फाऊंडेशन हा आपल्या मेकअपचा मुख्य बेस असतो. हा बेस जर परफेक्ट नसेल तर मग सगळा मेकअप बिघडण्याची शक्यता असते. विविध प्रकारचे फाऊंडेशन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. लिक्विड, पावडर, क्रीम या प्रकारांमध्ये फाऊंडेशन मिळते.

फाऊंडेशनमुळे मेकअपचा चांगला बेस चेहऱ्यावर तयार होतो. फाऊंडेशन लावताना ते तुमच्या चेहऱ्याच्या स्किनटोनशी मॅच होणारे असावेत. जर ते मॅच होणारे नसतील तर मग तुमचा मेकअप चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

फाऊंडेशन लावण्याची योग्य पद्धत कोणती ?

  • मेकअप चेहऱ्यावर लावण्यापूर्वी सर्वात आधी चेहरा स्वच्छ पाण्याने किंवा फेसवॉशने धुवा.

  • चेहरा स्वच्छ केल्यानंतर आता चेहऱ्याला चांगल्या प्रकारे मॉईश्चराईझ करणे महत्वाचे आहे. यासाठी चेहऱ्यावर मॉईश्चरायझर लावा.

  • मॉईश्चरायझर लावल्यामुळे तुमची त्वचा हायड्रेटेड राहते.

  • आता, फाऊंडेशन चेहऱ्यावर लावण्यापूर्वी ते फाऊंडेशन तुमच्या त्वचेशी मॅच होणारे असावे.

  • तसेच, फाऊंडेशन क्रीमी आणि मिडिअम कव्हरेज देणारे हवे.

  • फाऊंडेशन चेहऱ्यावर लावण्यापूर्वी ते तुम्ही ब्रशच्या सहाय्याने चेहऱ्यावर लावू शकता किंवा हातावर घेऊन ते बोटांच्या सहाय्याने चेहऱ्यावर ब्लेंड करू शकता.

  • फाऊंडेशन चेहऱ्यावर ब्लेंड करण्यापूर्वी तुम्ही ब्युटी ब्लेंडर किंवा स्पंजचा ही वापर करू शकता.

  • स्पंजने लावण्यापूर्वी स्पंज आधी पाण्याने ओला करून घ्या. नंतर, तो पिळून घ्या. आता स्पंजच्या मदतीने फाऊंडेशन चेहऱ्यावर ब्लेंड करा.

  • नाकाजवळ आणि डोळ्यांजवळ फाऊंडेशन चांगल्या प्रकारे लावून घ्या. जर तुमच्या डोळ्यांजवळ काळी वर्तुळे असतील किंवा चेहऱ्यावर डाग असतील तर ते लपवण्यासाठी तुम्ही कन्सिलरचा वापर करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''एकनाथ शिंदेंना नाराज करता येणार नाही'' दिल्लीतल्या नेत्यांची भूमिका? अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर? 'सीएम'ची घोषणा होण्याची शक्यता

IPL Mega Auction 2025: ३० लाख ते ३.८० कोटी! युवीच्या 6 Ball 6 Six विक्रमाशी बरोबरी करणाऱ्या Priyansh Arya साठी तगडी चुरस

Ajit Pawar: अजित पवार विनासुरक्षा 'देवगिरी'तून बाहेर पडले; मुख्यमंत्री पदावरुन घडामोडींना वेग

Will Jacks Video: RCB चा शतकवीर मुंबई इंडियन्सने घेतला अन् आकाश अंबानी बंगळुरूच्या संघमालकांना थँक्यू म्हणून आला

महाराष्ट्राचं स्टेअरिंग दिल्लीच्याच हातात! बिहार पॅटर्नवर फुली? मुख्यमंत्रीपदाबाबत पडद्याआड नेमकं घडतयं तरी काय?

SCROLL FOR NEXT