Infertility in male 
लाइफस्टाइल

Male Infertility : पुरुष वंध्यत्व म्हणजे काय? काय आहेत लक्षणे, उपाय

Male Infertility Symptoms: तुमचा शुक्राणू असू शकतो जबाबदार

सकाळ डिजिटल टीम

Male Infertility Symptoms : पुरुषांमध्ये वंध्यत्वापणाचे कित्येक कारण आहे, ज्यामध्ये वीर्य कमी होणे, शुक्राणूंचे कमी उत्पादन, शुक्राणूंचे असामान्य कार्य ते शुक्राणूंच्या वितरणास प्रतिबंध करण्यात अडथळा किंवा वितरण मार्गामध्ये अडथळे यांचा समावेश होतो

Male Infertility Treatment: जेव्हा वंध्यत्वाचा (वांझ) विषय तेव्हा त्याबाबत अनेक गैरसमज असल्याचे स्पष्ट होते. याला भारतामध्ये सामाजिक नियमांसोबत जोडले जातात, ज्यामध्ये मुलं जन्माला घालण्यासाठी खूप दबाव टाकतात आणि शेवट गर्भ धारणा करण्यामध्ये असर्मथ ठरण्याल दोष मात्र माहिलांना दिला जातो.

पण सत्य वेगळे आहे. ब्ल्यूएचओनुसार, सामान्य लोकसंख्येमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण 15 ते 20 टक्के आहे आणिया दरामध्ये पुरुष वंध्यत्वाचा घटक 20 ते 40 टक्के योगदान देतो.

भारतातील पुरुष वंध्यत्वाचे प्रमाण सुमारे 23 टक्के असल्याचे अभ्यासात आढळून आले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, गेल्या काही वर्षांपासून भारतात पुरुष वंध्यत्वात सातत्याने वाढ होत आहे. (What is Male Infertility What Are symptoms Remedies)

वंध्यत्व म्हणजे काय? | What Is Infertility?

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO), इंटरनॅशनल कमिटी फॉर मॉनिटरिंग असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजीनुसार, वंध्यत्व हा प्रजनन प्रणालीचा एक आजार आहे जो नियमित असुरक्षित लैंगिक संभोगानंतर 12 महिने किंवा त्याहून अधिक काळ क्लिनिकल गर्भधारणा साध्य करण्यात अपयशी ठरतो.

पुरुष वंध्यत्व | Male Infertility

पुरुषांमध्ये वंध्यत्वापणाचे कित्येक कारण आहे, ज्यामध्ये वीर्य कमी होणे, शुक्राणूंचे कमी उत्पादन, शुक्राणूंचे असामान्य कार्य ते शुक्राणूंच्या वितरणास प्रतिबंध करण्यात अडथळा किंवा वितरण मार्गामध्ये अडथळे यांचा समावेश होतो. असे अडथळे जननेंद्रियाच्या दुखापतीमुळे किंवा संक्रमणामुळे असू शकतात. तथापि, वंध्यत्वास कारणीभूत असलेले अनेक बाह्य घटक असू शकतात. धूम्रपान, अति मद्यपान, खराब आहार, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, तणाव, विशिष्ट रसायने आणि कीटकनाशकांचा संपर्क. आजारपण, दुखापत, दीर्घकालीन आरोग्य समस्या, जीवनशैलीची निवड पुरुष वंध्यत्वास कारणीभूत ठरू शकतात.

पुरुष वंध्यत्व लक्षण | Male Infertility Symptoms

जेव्हा लक्षण उत्पन्न होण्यापासून ते भारतामध्ये सामाजिक मानसिकतेमुळे वेळेत मदत घेण्यास उशीर होतो. कित्येक प्रकरणांमध्ये , साधारणपणे पाहिले जाते की पुरुषांची चूकीच्या समजूतीमुळे किंवा लाज वाटत असल्यामुळे स्व:ची टेस्ट करत नाही. याच कारणामुळे पुरुष आणि माहिलांना आपल्या शरीराबाबत जागरूक असणे गरजेचे आहे. पुरुषांना योन क्रिया संबधीत समस्यांवर उपचार घेण्यासाठी लाजले नाही पाहिजे.

उत्सर्ग (Ejaculation)किंवा उत्सर्गमध्ये कमी द्रवपदार्थ येणे, कमी लैंगिक इच्छा, किंवा उत्सर्ग (इरेक्टाइल डिसफंक्शन) करण्यात अडचण या सर्व गोष्टी पुरुष वंध्यत्वास कारणीभूत ठरू शकतात. याव्यतिरिक्त, अंडकोष क्षेत्रात वेदना, सूज किंवा गाठी यासारख्या विकृती लक्षात घेण्याजोग्या आहेत.

पुरुष वंध्यत्वाचे निदान कसे करावे? | How to diagnose male infertility?

चांगली बातमी अशी आहे की, तुम्ही जितक्या लवकर एखाद्या तज्ज्ञांकडे जाताल आणि निदान कराल तितक्या लवकर तुम्ही समस्येचे निराकरण करू शकता. संपूर्ण वैद्यकीय इतिहास, शरीर चाचणी, रक्त चाचणी, सामान्य संप्रेरक चाचणी आणि वीर्य विश्लेषणासह निदान सुरू होते.

वीर्य विश्लेषण शुक्राणूंच्या उत्पादनाची पातळी आणि शुक्राणूंची हालचाल दर्शवू शकते (शुक्राणु चांगले काम करत आहे आणि पुढे जात आहे). परिणाम काहीही असो, शुक्राणूंची संख्या कमी असली किंवा शुक्राणू नसले तरीही अनेक उपचार पर्याय उपलब्ध आहेत.

पुढील चाचण्या जसे की ट्रान्सरेक्टल अल्ट्रासाऊंड, टेस्टिक्युलर बायोप्सी (वंध्यत्वाची कारण नष्ट करण्यासोबत सहायक प्रजनन तंत्रात वापरण्यासाठी शुक्राणू संकलन करणे ), हार्मोनल प्रोफाइल, उत्सर्गानंतरचे (Ejaculation)मूत्र विश्लेषणामुळे हे समजते की, शुक्राणू मूत्राशयात उलट्या मार्गाने जात आहेत की नाही.

पुरुष वंध्यत्वाचे निदान करण्यात मदत करणारे तंत्रज्ञानातील एक प्रमुख प्रगती म्हणजे शुक्राणूंचे डीएनए विखंडन. ही चाचणी शुक्राणूंच्या अनुवांशिक सामग्रीमधील कोणत्याही समस्यांचे मूल्यांकन करण्यासाठी केली जाते कारण शुक्राणूमध्ये डीएनएचे कोणतेही नुकसान आहे की नाही हे ते शोधू शकते. स्पर्म एन्युप्लॉइडी चाचणी (SAT) ही अनुवांशिक पार्श्वभूमी किंवा पुरुष वंध्यत्वाच्या कारणाचा अभ्यास करण्यासाठी एक निदान चाचणी आहे. हे शुक्राणूंच्या नमुन्यातील गुणसूत्र संबंधी असामान्यता दर्शवते.

पुरुष वंध्यत्वाचे उपाय | Remedies for Male Infertility

सर्वप्रथम, डॉक्टर धूम्रपान आणि अल्कोहोल बंद करणे, मधुमेह, लठ्ठपणा इत्यादींवर नियंत्रण ठेवणारे बदल जीवनशैलीमध्ये करण्याचा सल्ला दिला जातो. कोणत्याही प्रजनन मार्गाच्या संसर्गाच्या बाबतीत, एंटीबायोटिक उपचार सुचवले जाऊ शकतात. औषधोपचार किंवा समुपदेशनाच्या रूपात लैंगिक समस्यांवर उपचार केल्यास इरेक्टाइल डिसफंक्शन (Erectile Dysfunction) किंवा अकाली वीर्यपतन (Premature ejaculation) यांसारख्या परिस्थितीत प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत होते. अंडकोषांमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे अॅझोस्पर्मिया (शून्य शुक्राणूंची संख्या), ऑलिगोस्पर्मिया (थोडे शुक्राणू तयार होतात) यासारख्या समस्या टेस्टिक्युलर स्पर्म एक्सट्रॅक्शनने हाताळल्या जाऊ शकतात, हे एक तंत्र आहे जेथे डॉक्टर अंडकोषातून शुक्राणू मिळवू शकतात.

सहाय्यक प्रजनन तंत्र (ART) मधील प्रगती जगभरातील वंध्यत्वाशी लढणाऱ्या हजारो जोडप्यांसाठी वरदान ठरली आहे. पुरुष वंध्यत्वाच्या उपचारासाठी सहाय्यक प्रजनन सर्वात लोकप्रिय तंत्रांमध्ये इंट्रायूटरिन फर्टिलायझेशन (IUI), इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) आणि इंट्रासाइटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन (ICSI) यांचा समावेश आहे. उपचारांमध्ये सामान्य उत्सर्ग (Ejaculation), शस्त्रक्रियाकरून काढणे किंवा दात्याकडून शुक्राणू मिळवणे यांचा समावेश होतो.

प्रगत तंत्रज्ञान जसे की मायक्रो-टीईएसई, आयएमएसआय आणि स्पर्म व्हीडी क्रायोप्रिझर्वेशन उपकरणे देखील पुरुष वंध्यत्वाच्या समस्या असलेल्या जोडप्यांना मदत करण्यासाठी उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT