How to Apply Primer : मेकअप हा महिलांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. मागील काही वर्षांमध्ये मेकअपची भलतीच क्रेझ निर्माण झाली आहे. पार्टीवेअर आणि ट्रॅडिशनल मेकअपला बरीच मागणी वाढली आहे. यासोबतच लग्नकार्यात, प्री-वेडिंग, पोस्ट-वेडिंग, मॅटर्निटी फोटोशूट, मुंज, बारसे, वाढदिवस इत्यादी अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये मेकअप करण्याला महिलांचे प्राधान्य आहे.
मेकअप म्हटलं की मग त्यात अनेक गोष्टींचा समावेश होतो. फाऊंडेशन, कन्सिलर, लिक्विड फाऊंडेशन, लिपस्टिक,मस्कारा, काजळ, बीबी-सीसी क्रीम आणि प्रायमर इत्यादी अनेक गोष्टींचा मेकअपमध्ये समावेश आढळून येतो.
आज आपण मेकअपमधील महत्वाचा भाग असलेल्या प्रायमरबद्दल जाणून घेणार आहोत. प्रायमर म्हणजे काय ? आणि ते लावण्याची योग्य पद्धत कोणती ? त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
तुम्हाला जर मेकअप करण्याची आवड असेल तर मेकअपमध्ये प्रायमरचा जरूर समावेश करा. कोणताही मेकअप त्वचेवर लावण्यापूर्वी त्वचा मऊ असणे आवश्यक आहे. तुमची त्वचा मऊ दिसण्यासाठी प्रायमर आवश्यक असते. त्यामुळे, त्वचेवर कोणतेही मेकअप प्रॉडक्ट लावण्यापूर्वी सर्वात आधी प्रायमर लावले जाते.
तुमचा मेकअप आणि चेहरा यांच्यामध्ये एक प्रकारचा थर तयार करण्याचे काम प्रायमर करते. थोडक्यात सांगायचे झाले तर, मेकअप आणि फाऊंडेशनचा आधार म्हणजे प्रायमर आहे. मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्यावर प्रायमर लावले जाते.
या प्रायमरमुळे चेहऱ्यावर अनेक तास मेकअप टिकून राहण्यास मदत होते. प्रायमरमुळे चेहरा चमकदार दिसतो आणि त्वचा टोन्ड दिसते. त्यासोबतच, चेहरा मऊ दिसतो.
सर्वात आधी चेहरा स्वच्छ धुवा.
चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर तुमच्या हाताच्या मागच्या बाजूला आवश्यकतेनुसार प्रायमर लावा.
त्यानंतर, बोटांच्या मदतीने प्रायमर चेहऱ्यावर आणि मानेजवळ लावा.
प्रायमर लावण्याची सुरूवात नाकाच्या वरच्या भागापासून करा.
आता, बोटांच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर प्रायमर लावा.
प्रायमर लावल्यानंतर काही सेकंद थांबा. प्रायमर त्वचेमध्ये मिसळण्यासाठी काही वेळ जाऊ द्या.
आता प्रायमर लावल्यानंतर फाऊंडेशन लावा.
प्रायमरमुळे चेहऱ्यावरील रोमछिद्रे लपण्यास मदत मिळेल आणि त्वचा सॉफ्ट होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.