Red Flags in a Relationship sakal
लाइफस्टाइल

Red Flags in a Relationship : नात्यातील 'रेड फ्लॅग्स' असे ओळखा; नाहीतर शिखर धवनसारखा होऊ शकतो तुमचाही घटस्फोट

रेड फ्लॅग्स काय आहेत? आणि हे कसे ओळखायचे? याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

Red Flags in a Relationship : कोणतेही नाते मनापासून जपणे खुप गरजेचे आहे. एखादं नवीन नातं आपल्या आयुष्यात आलं की आपण अधिक त्यांच्याकडे आकर्षित होतो पण नंतर जेव्हा हेचं जुनं व्हायला लागतं तेव्हा आपल्याला त्यात चुका दिसायला लागतात.

मुळात नातं हे तेव्हा टिकतं जेव्हा तुम्ही एकमेकांना त्यांच्या चांगल्या आणि वाईट गुणासह स्वीकारता. पण कधी कधी नात्यातील रेड फ्लॅग्समुळे चांगले नाते कालांतराने नकोसे वाटायला लागतात. हे रेड फ्लॅग्स काय आहेत? आणि हे कसे ओळखायचे? याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. (what is Red Flags and how can red flags identify in a Relationship read Shikhar Dhawan divorced)

रेड फ्लॅग्स काय आहेत?

कोणत्याही व्यक्तीच्या Toxic पर्सनॅलिटीला रेड फ्लॅग म्हटले जाते. रिलेशनशिपचा विचार केला तर त्यांच्या अशा सवयी ज्या नात्यासाठी चांगल्या नसतात. यात पार्टनरला चीट करणे, आपल्या मनासारखं काम करण्यास थांबविणे किंवा रिलेशनशिपमध्ये कोणत्याही प्रकारचं चुकीचं काम करणे किंवा अग्रेशन दाखवणे, यालाच रेड फ्लॅग्स म्हणतात ज्यामुळे तुमचं नातं खराब होऊ शकतं.

रेड फ्लॅग्स कसे ओळखायचे?

नात्यातील वेळीच रेड फ्लॅग्स ओळखणे, खूप जास्त गरजेचे आहे. जर तुम्ही वेळेत हे रेड फ्लॅग्स ओळखू शकले नाही तर तुमच्या नात्याचा शेवट होणे, निश्चित आहे. चला तर थोडक्यात जाणून घेऊया, रेड फ्लॅग्स कसे ओळखायचे?

१. जर तुमचा पार्टनर वारंवार तुमच्यावर राग व्यक्त करत असेल, हा एक रेड फ्लॅग आहे. अनेकदा असे लोक स्वत:ला खूप महत्त्व देतात आणि आपल्याच विश्वात रमलेले असतात. त्यांना कुणाची काहीही काळजी, पर्वा नसते.

२. कोणत्याही नात्यात संवाद हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. जर तुमचा पार्टनर संवाद साधण्यास टाळाटाळ करत असेल तर भविष्यात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही मोकळेपणाने एकमेकांशी संवाद साधू शकत नसाल तर तुम्हाला तुमचं नात्याचा शेवट केव्हाही होऊ शकतो.

३. जर तुमचा पार्टनर तुम्हाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असेल तर हे एक प्रकारे चुकीचं वर्तन आहे. वारंवार असे घडले तर एकेदिवशी तुम्हाला ते असहनीय होऊ शकतं. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या पार्टनरच्याच मनाप्रमाणे जगताय तुम्ही स्वत:साठी निर्णय घेऊ शकत नाही, तर हा एक नात्यातील रेड फ्लॅग आहे.

४. कोणत्याही नात्यात एकमेकांविषयी आदर असणे, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुमचा पार्टनर वारंवार तुमचा अनादर करत असेल, तुमचा अपमान करत असेल तर हा नात्यातला खूप मोठा फ्लॅग आहे. याचा एक अर्थ हा पण होतो की तुमचा पार्टनर तुमची आणि तुमच्या भावनांना महत्त्व देत नाही.

५. कोणत्याही नात्यात विश्वास असणे, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि हेल्दी नात्यासाठी विश्वास हा अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर आहे. जर तुमचा पार्टनर सातत्याने तुम्हाला प्रश्न विचारत असेल, तुमच्यावर शंका घेत असेल, तुमच्यावर विश्वास ठेवत नसेल तर तुम्ही हा रेड फ्लॅग त्वरीत ओळखा.

तुमच्या पार्टनरशी मोकळेपणाने बोला ज्यामुळे तुमच्यातील गैरसमज दुर होणार अन्यथा रेड फ्लॅग तुमचं नातं उद्धस्त करू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

"जितकं तू बोलतोस तितका चांगला माणूस तू अजिबात नाहीस" ; जवान फेम अभिनेत्री नयनताराचा धनुषवर खळबळजनक आरोप

Ranji Trophy 2024-25: Ayush Badoni चं दमदार द्विशतक; दिल्लीला आघाडीही मिळाली, पण सामना राहिला ड्रॉ

Vastu Tips: कामधेनूची मूर्ती ऑफिसमध्ये कोणत्या दिशेला ठेवावी? वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

Farmer : हिरव्या मिरचीने आणले डोळ्यांत पाणी...तोडणी बारा तर विक्रीसाठी पंचवीस रुपये; पीकांच्या लागवडीचाही खर्च निघेना

SCROLL FOR NEXT