Coconut esakal
लाइफस्टाइल

Coconut Benefits : 'नारळ' खरंच आरोग्याचा कल्पवृक्ष आहे?

सकाळ डिजिटल टीम

नारळाचे पूजा पाठामध्ये किंवा धार्मिक कार्यांमध्ये मोठे महत्व आहे, हे आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे.

नारळाचे पूजा पाठामध्ये किंवा धार्मिक कार्यांमध्ये मोठे महत्व आहे, हे आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे. कोणतेही शुभकार्य असले, तरी त्यासाठी नारळ हवाच. पुराणांमध्ये देखील नारळाचे महत्व सांगितले गेले आहे. भारतीय संस्कृतीत नारळाला नारिकेल, कन्नडमध्ये टेंगू, इंग्रजीत कोकोनट, लॅटिनमध्ये कोकम असे म्हणतात. भारतात समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात याची लागवड आढळते. दक्षिण भारत, मलबार, कोकण, कारवार, श्रीलंका, केरळ, इंडोनेशिया, अमेरिका, आफ्रिका, ब्राझील, भारत येथे एकूण जागतिक उत्पादनापैकी 73 % उत्पादन आढळते.

भारतात विविध प्रकारांमध्ये नारळाचा किंवा खोबऱ्यापासून काढलेल्या तेलाचे फायदे आहेत. आयुर्वेदातही त्याचा विशेष उल्लेख केला गेलेला आहे. खोबऱ्याचे तेल त्वचेसाठी नैसर्गिक मॉयश्चरायझर म्हणून काम करते. त्याच बरोबर रंग उजळण्यासाठीही मदत करतं. खोबऱ्याचे तेल हे नैसर्गिक असल्याकारणाने त्याचे कोणतेच साइड इफेक्ट्स नसल्यामुळे याचा वापर शारीरिक व्याधी, त्वचेच्या, केसांच्या समस्या, सांधेदुखी सारख्या दुखण्यांवर सुद्धा होतो. परंतु, हे खोबऱ्याचे तेल घाण्यावर काढलेले आणि कच्चे असावे. ओला नारळ, सुका नारळ, कच्चा नारळ, शहाळे त्याचप्रमाणे नारळाचे पाणी, नारळाचे तूप, नारळाचे तेल व करवंटी तेल, राख यांना औषधी म्हणूनही आयुर्वेदात महत्त्व आहे. नारळ शरीरात बल आणि स्निग्धता वाढवितो. ज्यांचे शरीर कृश आहे, त्यांनी रोज पाच ते सात ग्रॅम ओल्या खोबऱ्याचा तुकडा खडीसाखरेबरोबर अनशापोटी घेतल्यास दोन ते तीन महिन्यांत शरीरावर मांस व तेज दिसू लागते.

खोबऱ्याच्या तेलाने लहान मुलांना मालिश केली जाते, जेणेकरून मुलांची त्वचा सुधारून, हाडे सुद्धा मजबूत व्हायला मदत होते. ओठ गुलाबी होण्यासाठीही फायदा होतो. त्यामुळे नियमितपणे खोबऱ्याच्या तेलाचा वापर त्वचा आणि ओठांसाठीही फायदेशीर ठरतो. त्याचप्रमाणे खोबऱ्याचं तेल केसांची निगा राखण्यासाठी खूप उपयोगी पडते. केस घनदाट, लांब आणि चमकदार करण्यासाठी खोबऱ्याचं तेलं अत्यंत गुणकारी असतं. खोबऱ्याच्या तेलाने आंघोळी आधी केसांना १० मिनिट्स आधी मसाज केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. तसेच गरोदर स्त्रीला खोबऱ्याचा खुराक दिल्यामुळे बाळाची मांसपुष्टी चांगली होते. अशा या नारळाला कल्पवृक्ष वनौषधी असंही म्हणतात.

टीप : (या लेखात प्रकाशित केलेली माहिती सामान्य माहिती आणि घरगुती उपचारांवर आधारित आहे. 'ई-सकाळ' याला दुजोरा देत नाही. म्हणून, लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT