Monsoon Trip Esakal
लाइफस्टाइल

Monsoon मध्ये प्रवासाचा आनंद लुटायचाय? तर Trip ला निघण्यापूर्वी करा ‘ही’ तयारी

पावसाळ्यात एखाद्या ठिकाणी फिरायला जात असताना तुम्ही आधीच काही गोष्टींची काळजी घेतली तर तुमचा प्रवास नक्कीच सुंदर होईल

Kirti Wadkar

पावसाळ्यात प्रवास करण्याची, वेगवेगळ्या निसर्ग स्थळांना भेट देण्याची, डोंगर-दऱ्यांमध्ये ट्रेक करण्याची एक निराळीच मजा असते.

खास करून श्रावणाच्या Shravan काळामध्ये पाऊस काहीसा कमी झालेला असतो. ऊन-पावसाचा खेळ सुरू असतो. निसर्ग Nature हिरव्यागार मखमलीने बहरलेला असतो. अशा वेळी वातावरण अल्लाहदायक असल्याने प्रवास करताना मनाला शांती मिळते. What preparation to enjoy your monsoon trips

अर्थात पावसाळ्यात Monsoon प्रवास करत असताना काही आव्हानांचा आणि अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कधी मुसळधार पाऊस, निसरडे रस्ते, वादळी वारा अशा कोणत्याही परिस्थितीमुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता.

यासाठीच पावसाळ्यात एखाद्या ठिकाणी फिरायला जात असताना किंवा प्रवासासाठी निघत असताना जर तुम्ही आधीच काही गोष्टींची काळजी घेतली आणि पूर्ण तयारीने निघालात तर तुमचा प्रवास नक्कीच सुंदर आणि सुकर होईल.

तुम्हाला तुमच्या ट्रीपची मजा लुटायची असेल किंवा प्रवासाचा मनमुराद आनंद घ्यायचा असेल तर प्रवासाला निघण्यापूर्वी काही गोष्टी ध्यानात ठेवा.

हवामानाचा अंदाज घ्या

अलिकडे मोबाईलवरूनच तुम्ही विविध ठिकाणच्या हवामानाचा अंदाज जाणून घेऊ शकता. इंटरनेटच्या मदतीने किंवा विविध अॅपमध्ये पुढील आठवड्याभरात कसं वातावरण असेल, पावसाची शक्यता, किती पर्जन्यमान असेल, एखादं वादळं येणार आहे का अशा अनेक प्रकारची माहिती उपलब्ध होते.

प्रवासाला निघण्यापूर्वी तुम्ही जात असलेल्या ठिकाणचा तसाच दूरचा प्रवास असेल तर त्या संपूर्ण भागातील हवामानाचा अंदाज जाणून घेऊन प्रवासाचा प्लॅन आखा.

हे देखिल वाचा-

योग्य कपडे सोबत घ्या

पावसाळ्यात प्रवास करत असताना अनेकदा पावसामुळे भिजण्याची किंवा कपडे ओले होण्याची जास्त शक्यता असते. यासाठीच दमट वातावरणासाठी योग्य असलेले हलके आणि झटपट सुकणारे कपडे पॅक करा. तसचं सोबत रेनकोट किंवा जॅकेट आणि पावसाळी शूज सोबत न्या.

महागड्या आणि महत्वाच्या वस्तूंची काळजी

पावसाळ्यामध्ये प्रवास करत असताना जर तुम्ही सोबत महत्वाची कागदपत्रं बागळत असाल तर ती भिजणार नाहीत याची काळजी घेणं गरजेचं आहे. तसचं इयर फोन, मोबाईलचा चार्जर किंवा कॅमेरा आणि लॅपटॉप यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील भिजल्यामुळे बिघडू शकतात. यासाठीच या वस्तू योग्य प्रकारे पॅक करणं गरजेचं आहे.

कागदपत्र आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू तुम्ही झीपलॉक बॅगमध्ये पॅक करू शकता. जेणेकरून त्यामध्ये पाणी जाणार नाही. तसचं मोबाईल किंवा कॅमेऱ्यासाठी बाजारामध्ये किंवा ऑनलाईन मिळणारे वॉटरप्रूफ कव्हर तुम्ही खरेदी करू शकता.

मच्छर आणि किड्यांपासून रहा सावध

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मच्छरांचं प्रमाण वाढलेलं असतं. तसचं तुम्ही ट्रेकिंग किंवा निसर्गरम्य ठिकाणी जरी फिरण्यासाठी जात असाल तरी मच्छर किंवा इतर गवतावरील किटक चावण्याची शक्यता असते यासाठीच बाजारात सहज मिळणारे इनसेक्ट रेपेलंट INSECT REPELLENT स्प्रे किंवा लिक्विडचा वापर करा.

आजारांपासून रहा सावध

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये विविध आजारांचं प्रमाणा वाढतं. खास करून दूषित पाणी आणि अन्नामुळे आजारी होण्याची शक्यता वाढते. डेंग्यू, मलेरिया आणि टायफायइडीची लागण होण्याचा धोका असतो. यासाठी दूषित पाणी पिणं टाळा. तसंच प्रवासात उघड्यावरील अन्न, जंक फूड किंवा कच्चं अन्न खाणं टाळा.

हे देखिल वाचा-

लहान मेडिकल किट

पावसाळ्यात ट्रिप किंवा प्रवासासाठी निघण्यापूर्वी एक लहानंसं मेडिकल किट नक्की तयार करा. यासाठी एका बॅगमध्ये किमान पेनकिलर, डॉक्टरांच्या सल्ल्याने उलटी, ताप यासाठीच्या काही गोळ्या, बॅण्डेड आणि एखादं अॅन्टीसेप्टिक मलम सोबत ठेवा.

बॅकअप प्लॅन

पावसाळी ट्रीप किंवा प्रवासाला निघण्यापूर्वी जर वाटेत किंवा प्रवासात पावसामुळे मोठा अडथळा निर्माण झाला किंवा तुम्ही आखलेल्या प्लॅन पोहचल्यानंतर रद्द करावा लागला तर तुम्ही कशा प्रकारे ट्रीप एन्जॉय करू शकता यासाठी एक बॅकअप प्लान तयार ठेवा.

अशा प्रकारे काही गोष्टींची आधीपासून तयारी करून प्रवास सुरु केल्यास तुमचा प्रवास सुखकर होवू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी घडवलं सुसंस्कृतपणाचं दर्शन; चुलते श्रीनिवास पवार यांचे घेतले आशिर्वाद

Maharashtra Vidhan Sabha Voting Percentage Update: सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान

Maharashtra Assembly Election 2024: वरळीत शिवसेनेच्या उमेदवाराला मनसेचा पाठिंबा? व्हायरल पत्राने कार्यकर्त्यांमध्ये वातावरण तापलं! नेमकं काय घडलं?

UGC NET Exam December 2024: यूजीसीचं अधिसूचना जाहीर, जाणून घ्या परीक्षा वेळापत्रक

Maharashtra Assembly Election 2024 : Sachin Tendulkar आणि अजिंक्य रहाणेने बजावला मतदानाचा हक्क; कर्तव्य पुर्ण करण्याचे केले मतदारांना आवाहन

SCROLL FOR NEXT