White Hair Solution: आजच्या युगात लोकांच्या आहारात आणि जीवनशैलीत बराच बदल झाला आहे, तसेच माणसाला अनेकदा टेन्शनला सामोरे जावे लागते, त्याचा वाईट परिणाम आपल्या केसांवरही दिसून येतो. पूर्वीच्या काळी पांढरे केस हे वाढत्या वयाचे लक्षण मानले जात होते.
पण आता २०-२५ वर्षे वयोगटातील लहान मुलेही या समस्येला बळी पडत आहेत. यामुळे त्यांना अनेकदा लाजिरवाणे आणि कमी आत्मविश्वासाला सामोरे जावे लागते.
कॉस्मेटिक वर्ल्डमध्ये तगडी फी घेऊन पांढरे केस काळे करण्याचं काम कॉस्मेटिक एस्थेटिक्स आणि डर्मेटोलॉजिस्ट करत आहेत. पण हे काम काही सोप्या घरगुती उपायांनीही केले जाऊ शकते. (White Hair: Due to white hair, old age started coming in youth? Hair will be dark through these home remedies)
काही उपाय केस पांढरे होण्यापूर्वी काम करतात तर काही पांढरे झाल्यानंतर तुमची मदत करतात. आम्ही तुम्हाला केस पांढरे होण्यापासून रोखण्याचे काही सोप्या घरगुती उपायांबाबत सांगणार आहोत.
केस काळे होण्यासाठी असते या व्हिटॅमिन्सची गरज
व्हिटॅमिन बी, विशेष रुपाने बी-12 आणि बायोटिन
व्हिटॅमिन डी
व्हिटॅमिन ई
व्हिटॅमिन ए
पांढरे केस लपवण्यासाठी लोक अनेकदा केमिकलबेस्ड हेअर डायचा वापर करतात. पण यामुळे फायद्याऐवजी नुकसान होते. यामुळे केस कोरडे होऊ शकतात आणि केस गळण्यासारख्या समस्यादेखील उद्भवू शकतात. (White Hair)
त्यामुळे नैसर्गिक पद्धतींचा वापर करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला काळे केस तर मिळतीलच, शिवाय पोषण आणि चमकही मिळेल. जाणून घेऊया इच्छित परिणाम कसा मिळू शकतो.
कोरफड जेल
कोरफडच्या मदतीने तुम्ही त्वचा चमकदार कराल, पण आता केसांसाठीही नक्की ट्राय करा. आपण केसांच्या मुळांमध्ये कोरफड जेलची मालिश करू शकता आणि कोरडे झाल्यावर शॅम्पूने धुवू शकता. हे आठवड्यातून 2 ते 3 वेळा करा. हळूहळू केसांमध्ये काळेपणा येऊ लागेल. (White hair remedies in marathi)
आवळा आणि रीठा
पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी तुम्ही आवळा आणि रीठा वापरू शकता कारण हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. यासाठी आवळा आणि रीठा पावडर लोखंडी भांड्यात रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर केसांना लावा आणि कोरडे होण्याची वाट पहा. शेवटी स्वच्छ पाण्याने केस धुवून घ्या. आठवड्यातून 2 ते 3 वेळा ही पद्धत पुन्हा करा. (Home Remedies)
कांद्याचा रस
पांढरे केस काळे करण्यासाठी तुम्ही कांद्याचा ही आधार घेऊ शकता. यासाठी कांदा मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून त्याचा रस काढून नंतर टाळूवर लावावा. कोरडे झाल्यावर सौम्य शॅम्पूने धुवून टाका.
केस धुण्यासाठी हा हर्बल शाम्पू घरीच बनवा
शाम्पूसाठी लागणारे साहित्य
सुका आवळा - 100 ग्रॅम
रिठा - 100 ग्रॅम
शिकेकाई - 100 ग्रॅम
मेथीचे दाणे - 50 ग्रॅम
घरी हर्बल शाम्पू बनवण्यासाठी आधी आवळा, रीठा, शिकाकाई आणि मेथीचे दाणे स्वच्छ पाण्याने धुवा.
त्यांना रात्रभर दोन ग्लास पाण्यात भिजवा. सकाळी ते सर्व आपल्या हातांनी चांगले मॅश करा आणि ते शिजवण्यासाठी गॅसवर ठेवा. (Herbal Shampoo)
जेव्हा पाणी दोन ग्लासांपासून एका ग्लासपर्यंत शिल्लक राहील, तेव्हा गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या.
हे मिश्रण ते चांगले थंड होते, ते दुसऱ्या भांड्यात गाळून घ्या आणि नंतर एका बाटलीमध्ये ठेवा. तर या पद्धतीनं तुमचा होममेड हर्बल शॅम्पू तयार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.