why are railway station names always written on yellow board know very interesting reason behind it  
लाइफस्टाइल

रेल्वे स्टेशनची नावे पिवळ्या बोर्डवरच का लिहीतात? जाणून घ्या खास कारण

सकाळ डिजिटल टीम

भारतीय रेल्वे (Indian Railway) हे जगातील चौथ्या क्रमांकाचे आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे रेल्वे नेटवर्क आहे. दररोज कोट्यावधी लोक रेल्वेने प्रवास करतात आणि देशातील एकूण रेल्वे स्थानकांची संख्या 7349 इतकी आहे. तुम्हीही कधीतरी रेल्वेमधून प्रवास केला असेल, तर तुमच्या लक्षात आले असेल की, रेल्वे स्थानकांची (Railway Stations) नावे नेहमी पिवळ्या रंगाच्या साइनबोर्डवर लिहिलेली असतात. पण असे का असते? हे जाणून घेण्याचा कदाचित तुम्ही कधी प्रयत्न केला नसेल. पण आज आपण या मागचे कारण जाणून घेणार आहोत.

आनंद, बुद्धिमत्ता आणि ऊर्जा यांचा थेट संबंध

पिवळा रंग प्रामुख्याने सूर्याच्या तेजस्वी प्रकाशावर आधारित असतो. पिवळ्या रंगाचा थेट संबंध आनंद, बुद्धिमत्ता आणि उर्जेशी आहे. गर्दीच्या भागात, बाकीच्या रंगांच्या तुलनेत पिवळी पार्श्वभूमी चांगली उठून दिसते. याशिवाय, बहुतेकदा हा रंग वास्तुशास्त्र आणि मानसिक घटक लक्षात घेऊन वापरला जातो. पिवळ्या पार्श्वभूमीवर काळ्या रंगाचे लिखाण सर्वात प्रभावी आहे, ते अगदी दुरूनही स्पष्टपणे पाहाता येते.

पिवळा रंग लांबून दिसतो

याशिवाय, पिवळा रंग खूप चमकदार असतो, जो ट्रेनच्या ड्रायव्हरला दुरूनच दिसतो. पिवळ्या रंगाचे बोर्ड ट्रेनच्या लोको पायलटला गाडीचा वेग कमी करण्यासाठी किंवा सतर्क राहण्याचे सूचित करतात. प्रवासात अनेक रेल्वे स्थानकांवर रेल्वे गाड्या थांबत नाहीत, अशा गाड्यांचे लोको पायलट स्टेशनमध्ये प्रवेश करण्यापासून ते बाहेर पडण्यापर्यंत अत्यंत सतर्क असतात आणि सतत हॉर्न वाजवतात जेणेकरून स्थानकावर उपस्थित प्रवासी सावध होतात. त्यांना याकरिता स्टेशन येण्याआधी ते समजने गरजेचे असते.

लॅटरल पेरिफेरल व्हिजन

लाल रंगानंतर पिवळ्या रंगाची व्हेवलेन्थ सर्वाधिक असते. त्यामुळे शाळेच्या बसेस पिवळ्या रंगात रंगवल्या जातात. एवढेच नाही तर पाऊस, धुके किंवा धुळीतही पिवळा रंग ओळखता येतो. पिवळ्या रंगाचे लॅटरल पेरिफेरल व्हिजन (lateral peripheral vision) लाल रंगापेक्षा दीडपट जास्त असते.

याशिवाय धोक्याविषयी सांगण्यासाठी लाल पार्श्वभूमी असलेला साइनबोर्ड पिवळ्या आणि पांढऱ्या रंगात लिहिला जातो. लाल रंग अतिशय तीव्र असतो, त्यामुळे धोका दूरवरून जाणवतो. रस्त्यांव्यतिरिक्त, लाल रंगाचा वापर रेल्वे वाहतुकीत मोठ्या प्रमाणात केला जातो. याशिवाय वाहनाच्या मागे फक्त लाल दिवा लावलेला असतो, जेणेकरून मागून येणारी इतर वाहने दुरूनच पाहू शकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT