Parenting Tips sakal
लाइफस्टाइल

Parenting Tips : लहान मुलांच्या सतत रडण्यामागे असू शकतात 'ही' कारणे; घ्या जाणून

लहान मुलांचे सततचे रडणे हे केवळ त्यांचे रडणे नसते. यामागे अनेक कारणे असू शकतात.

Monika Lonkar –Kumbhar

Parenting Tips : लहान मुलांचे हसणे, खेळणे या सर्व गोष्टी पालकांना सूखावतात. या गोष्टींमधून लहान मुलगा किंवा मुलगी किती आनंदात आहेत किंवा खुश आहेत ? हे देखील दिसून येते. मात्र, लहान मुलगा किंवा मुलगी रडायला लागले, तर पालकांना चिंता वाटणे स्वभाविक आहे.

लहान मुलांचे रडणे ही खरं तर एक सामान्य बाब आहे. लहान मुले त्यांच्या पालकांना आवाज देण्यासाठी किंवा बोलवण्यासाठी रडतात. परंतु, जर तुमचा लहान मुलगा किंवा मुलगी सतत रडत असतील तर तुम्हाला त्यांचे दु:ख समजून घेणे सर्वात महत्वाचे आहे.

कारण, लहान मुलांचे सततचे रडणे हे केवळ त्यांचे रडणे नसते. यामागे अनेक कारणे असू शकतात. मुलांचे रडणे हे केवळ फक्त कोणता आजार नाही तर Babies Cries Causes असू शकते. यापैकी काही प्रमुख कारणे सांगितली जातात. चला तर मग जाणून घेऊयात लहान मुलांच्या रडण्यामागील कारणे काय असू शकतात ?

हाडे निखळणे

लहान मुलांचे शरीर हे मुळात नाजूक असते. त्यांच्या शरीरातील हाडे नाजूक असतात ती पूर्णपणे मजबूत झालेली नसतात. त्यामुळे, पालकांनी लहान मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

यामध्ये थोडा जरी निष्काळजीपणा झाला तरी त्यांच्या शरीरातील हाडे निखळण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे, याची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे.

अचानक घरी आलेली पाहुणीमंडळी किंवा घरातील सदस्य लहान मुलांना उचलताना सावकाशपणे न उचलता गडबडीने किंवा निष्काळजीपणाने उचलू शकतात. अशावेळी, मग बाळाची मान आखडू शकते किंवा त्याच्या शरीरातील इतर हाडे निखळण्याचा धोका असतो.

त्यामुळे, यासंदर्भात पालकांनी सावधानता बाळगायला हवी. जर बाळाची हाडे निखळली किंवा मान आखडली किंवा इतर काही समस्या निर्माण झाल्या तर बाळ सतत रडू शकते.

आईचा आहार

बाळाची आई जे काही खाते किंवा जो काही आहार घेते त्याचा थेट परिणाम लहान बाळाच्या आरोग्यावर होतो. जर आई जास्त तळलेले आणि मसालेदार अन्न, आंबट-गोड पदार्थ, तिखट खाद्यपदार्थ खात असेल तर त्याचा परिणाम लहान मुलांवर दिसून येतो.

कारण, लहान मुल आईचे दूध पिते आणि अशावेळी मग बाळाला या गोष्टी सहन कराव्या लागतात. त्यामुळे, बाळाला पोटदुखी किंवा गॅसेसचा त्रास होऊ शकतो. या कारणांमुळे देखील बाळ सतत रडू शकते.

ओव्हरफिडिंग

बाळ रडण्यामागे हे देखील महत्वाचे कारण असू शकते. ते नेमके कसे? चला आपण जाणून घेऊयात. अनेकदा काय होतं की आईकडून लहान बाळाचे स्तनपान करताना त्याला कळत-नकळतपणे अधिकचे दूध पाजले जाते.

कधीकधी गडबडीमध्ये बाळाला जास्त ओव्हरफिडिंग केले जाते. त्यामुळे, बाळाचे पोट फुगू शकते आणि बाळाला अपचन सारख्या समस्या उद्भवू शकतात. या कारणांमुळे देखील लहान बाळ सतत रडू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT