Deccan Queen esakal
लाइफस्टाइल

Deccan Queen : ती दुर्घटना टाळता आली असती, कल्याणला डेक्कन क्वीन का थांबत नाही?

पुणे-मुंबई रेल्वेरूळावर धावणारी डेक्कन क्वीन मागल्या ९० पेक्षा जास्त वर्षांपासून प्रवाशांची आवडती आहे

साक्षी राऊत

Deccan Queen : पुणे-मुंबई रेल्वेरूळावर धावणारी डेक्कन क्वीन मागल्या ९० पेक्षा जास्त वर्षांपासून प्रवाशांची आवडती आहे. डेक्कन क्वीनचा थाटही शाजेशाहीच म्हणावा लागले. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या जवळपास शेकडो गाड्या मुंबईच्या दिशेने जाताना कल्याणला थांबतात मात्र डेक्कन क्वीन कल्याणला थांबत नाही. असे का?

डेक्कन क्वीन मुंबईला थांबत नसल्या कारणाने काही प्रवाशांनी धावत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातच त्यांचा अपघात झाला. डेक्कन क्वीन कल्याणला थांबत असती तर ती दुर्घटना टाळता आली असती का?

कल्याणला थांबत नसल्या कारणाने होतात अनेक दुर्घटना

आज डेक्कन क्वीन कल्याण स्थानकावरून काही प्रवाशांनी डेक्कन क्वीनमधून उतरण्याचा प्रयत्न केला, ही गाडी कल्याणला थांबत नसल्या कारणाने प्रवाशांनी केलेला हा प्रयत्न त्यांच्या जिवावर बेतला, त्यांचा अपघात झाला. डेक्कन क्वीन कल्याणला थांबत असती तर हा अपघात टळू शकला असता का? डेक्कन क्वीन कल्याणला का थांबत नाही यामागचं कारण काय? ते आज आपण जाणून घेऊया.

१ जून १९३० मध्ये डेक्कन क्वीन म्हणजेच दख्खनची राणी प्रवाशांसाठी सुरू झाली होती. तेव्हा या रेल्वेचा वापर प्रामुख्याने घोड्यांच्या शर्यतींच्या शौकिनांना मुंबई व पुणे दरम्यान प्रवासासाठी होत असे. सुरुवातीला ही ट्रेन फक्त शनिवार, रविवार प्रवाशांच्या सेवेत असायची. मात्र प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादाने ही दररोज चालवली जाऊ लागली.

डेक्कन क्वीन कल्याणला का थांबत नाही?

मुंबईकरांसाठी कल्याण हे स्थानक अतिशय महत्वाचे आहे. कल्याण स्थानक उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारे असले तरी डेक्कन क्वीन इथे न थांबण्याची काही खास कारणे आहेत.

डेक्कन क्वीन या रेल्वेची सेवा सुरु झाल्यानंतर सुरुवातीला ती कल्याण नगरपालिकेच्या हद्दीतून धावत होती. याबाबत रेल्वेला कल्याण नगरपालिकेला कर देणे लागत असे. मात्र अनेक वर्षे कल्याण नगरपालिकेला हा कर देण्यात आलाच नव्हता. अखेर संतापून कल्याण नगरपालिकेने रेल्वेला कोर्टात खेचले. कोर्टात कल्याण नगरपालिकेच्या बाजूने निकाल लागला. त्यानंतर या गाडीचे इंजिनसुद्धा नगरपालिकेने जप्त केले होते.

या संपूर्ण प्रकरणानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी जाऊन नगरपालिकेकडे असलेला थकीत कर भरून जप्त केलेले इंजिन सोडवून घेतले. मात्र या संपूर्ण प्रकरणानंतर रेल्वेने यापुढे कधीही कल्याणला न थांबण्याचा निर्णय घेतला. या खटल्यात कल्याण नगरपालिकेची बाजू डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडल्याचे काही संदर्भही आहेत.

डेक्कन क्वीनची प्रवाशांमध्ये असणारी लोकप्रियता आणि त्यातील सोयी यामुळे कित्येकदा प्रवाशांकडून डेक्कन क्वीनचे थांबे वाढवण्याची मागणी रेल्वेकडे करण्यात आली. पण रेल्वेकडून त्याला आजवर सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. या गाडीचे थांबे न वाढवण्यामागे आणखी अनेक कारणे दिली जातात. उदा. डेक्कन क्विनचे थांबे वाढवल्यास गाडीच्या वेळेत फरक पडेल आणि त्यामुळे गाडीचा सुपरफास्ट हा दर्जासुद्धा कमी होईल अशी कारणे दिली जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यांनी घेतला शहरी वृक्ष व्यवस्थापन कार्यशाळेत भाग

SCROLL FOR NEXT