Medicine Sakal
लाइफस्टाइल

Healthy Tips: डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे यकृतासाठी ठरू शकते धोकादायक

सकाळ वत्तसेवा

Healthy Tips: मद्यपान हे यकृतविकाराचे मुख्य कारण आहे. परंतु, जंक फूडचे अतिसेवन, धूम्रपान, कामाचा ताण अशा नेहमीच्या वाईट सवयींमुळे यकृताच्या विकारात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अतिप्रमाणात औषधी घेतल्यास यकृताच्या कार्यात बिघाड होण्याचा धोका आहे. एकदा यकृताचा आजार झाला की, व्यक्ती धोकादायक स्थितीत पोचते. नकळत येणारा आजार असल्याने यकृत विकाराने अखेरच्या घटका मोजत असताना उपचारासाठी येतात.

या स्थितीत यकृत प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसतो. देशात यकृताचा कॅन्सर आणि सायरोसिसमुळे तब्बल दीड लाखावर व्यक्ती मृत्युमुखी पडतात. दरवर्षी २ लाख यकृताने आजारी व्यक्ती अखेरच्या क्षणी निदान होते, त्यातच अलीकडे बदललेली जीवनशैली आणि मद्यपानाचे अधिक सेवन जीवघेण्या दीर्घकालीन यकृत विकारांचे प्रमुख कारण ठरत आहे. मधुमेह आणि लठ्ठपणा हेदेखील यकृत विकारास कारणीभूत ठरतात. अशा विकारांना बळी पडणाऱ्यांचे वय हे ४० ते ६० वयोगटातील आहे.

यकृत अतिशय महत्त्वाचे

यकृत शरीराचा महत्त्वाचा अवयव असून, तब्बल ५०० हून अधिक कार्य करते. यकृताला होणाऱ्या विकारांसाठी हिपॅटायटिस-बी विषाणू हा सर्वांत जास्त कारणीभूत ठरतो. यामुळे भारतीय जीवनशैली अंगीकारावी, ताणतणाव घालविण्यासाठी काही जण मद्यपान करतात. या सगळ्यांचा परिणाम यकृतावर होतो. स्वतःची जबाबदारी स्वीकारावी, मद्यपान टाळावे, लठ्ठपणा नियंत्रणात ठेवावा, हीच निरोगी यकृताची गुरुकिल्ली आहे.

यकृत विकारांची लक्षणे

पोटात जडपणा

पोटदुखी

अन्नपचन

भूक मंदावणे

उलट्या व मळमळ

कावीळची लागण

उलटीद्वारे रक्त

पोट फुगणे

पायाला सूज

यकृताचे विकार

हिपॅटायटीस बी

साधा कावीळ

फॅटी लिव्हर

लिव्हर सिरॉसिस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT