Garba And Dandiya History: हिंदू धर्मात नवरात्रीला खुप महत्व आहे. या नऊ दिवसांमध्ये माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. मान्यतेनुसार माता दुर्गेची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. यंदा ३ सप्टेंबरला शारदीय नवरात्री साजरी केली जाते तर १२ सप्टेंबरला दसऱ्याला संपणार आहे. अनेक लोक उपवास करतात आणि देवीसमोर रात्री गरबा किंवा दांडिया खेळतात. गुजरातमध्ये गरबा आणि दांडियाला सर्वात जास्त महत्व आहे. तर पश्चिम बंगालमध्ये अष्टमी पूजेला खास महत्व आहे. चला जाणून घेऊया गरबा आणि दांडियाचा इतिहास काय आहे.
शारदीय नवरात्रीमध्ये गरबा-दांडिया खेळण्यासाठी अनेक लोक उत्साही असतात. यासाठी अनेक ठिकाणी क्लास देखील घेतले जातात. काही लोक तर महिनाभर आधीच गरबा आणि दांडियाचा सराव करतात.
गुजरातच्या संस्कृतीचा एक भाग असून ते गुजराती लोकांसाठी सर्वात प्रसिद्ध मानले जाते. या निमित्ताने रंगीबेरंगी गरब्याचे कपडे परिधान करायला मिळतात. या कपड्यांमध्ये प्रत्येकजण खूपच सुंदर दिसतो. गरबा प्राचीन काळी सुरू झाला होता जो आता परंपरा बनला आहे. गरबा हा शब्द संस्कृतमधील गर्भ या शब्दापासून आलेला आहे. ज्याचा अर्थ गर्भाशय असा होतो.
गरबा, दांडिया खेळताना एका वर्तुळात खेळला जातो. जेव्हा अनेक लोक एकत्र येतात तेव्हा वर्तुळात हे खेळले जाते . हे एक काळाचे प्रतिक आहे. तसेच हिंदू धर्मात चक्राला खुप महत्व आहे. जीवनाच्या चक्रात जन्म, मृत्यु आणि पुनर्जन्म यांचा समावेश असतो हे चक्र सतत फिरत असते. नवरात्रीत नऊ दिवस मातेचा जागर आणि तिची उपासना करतो.
अनेक लोक गरबा आणि दांडियाला एकच समजतात. पण असे नसून दोन्ही वेगवेगळे आहेत.
गरबा करण्यापूर्वी सर्वात आधी माता दुर्गेची पूजा केली जाते. यानंतर महिला माता दुर्गेच्या मातीच्या भांड्यात छिद्र करतात आणि त्यामध्ये दिवा लावतात. यानंतर चांदीचे नाणे टाकले जाते. त्यानंतर त्याच दिव्याच्या उजेडात गरबा केला जातो. यामध्ये महिला आणि पुरूष ग्रुपने गरबा खेळतात. तसेच गरबा खेळण्यासाठी रंगीत कपडे परिधान केले जातात.
तुम्ही नवरात्रीत दांडिया देखील खेळू शकता. दांडिया खेळताना खुप ऊर्जा लागते. यामध्ये छोट्या रंगीबेरंगी सजवलेल्या काड्या वापरड्या जातात. तसेच यात ढोल, तबला यांचाही वापर केला जातो. यामध्ये महिला आणि पुरूष ग्रुपने दांडिया खेळतात. देवीसमोर दांडिया खेळताना वातावरणात सकारात्मकता निर्माण होते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.