Do you know history of jeans pants  
लाइफस्टाइल

जाणून घ्या ; जीन्स निळ्या रंगाने का रंगवतात?

जीन्स निळ्या रंगाने का रंगवतात हे तुम्हाला माहिती आहे का?

अर्चना बनगे

जीन्स विविध प्रकारच्या डिझाईन्स आणि पॅटर्नमध्ये येतात. मात्र मूळ रंग अजूनही निळा आहे. पण तुम्हाला माहित आहे का निळा का निवडला गेला? जीन्स एक असे फॅशन स्टेटमेंट आहे जे केवळ वर्षानुवर्षे नव्हे तर शतकानुशतके चालू आहे. जीन्सचा इतिहास 200 वर्षांपेक्षा जास्त जुना आहे. त्याच्या स्टाइलमध्ये थोडेसे अंतर जर सोडले गेले तर बाकी जीन्स लिवाइस कंपनीने सुरुवातीला बनवली होती तशीच आहे. जीन्समध्ये वर्षानुवर्षे अनेक मूलभूत फरक पाहिले गेले आहेत. मात्र त्याचा रंग अजूनही निळा आहे.असे नाही की डेनिम फॅब्रिक नेहमी निळे असते. याला ब्लू डाई केले जाते. पण प्रश्न उद्भवतो की हा रंग निळा का आहे? तरीही तो सर्वोत्तम का मानला जातो? यासाठी आपल्याला जीन्सबद्दल काही मुलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.

जीन्स विविध प्रकारच्या डिझाईन्स आणि पॅटर्नमध्ये येतात. मात्र मूळ रंग अजूनही निळा आहे. पण तुम्हाला माहित आहे का निळा का निवडला गेला?

जीन्सशी संबंधित काही मुलभूत फॅक्ट्स-

जीन्स ही कापसापासून बनवलेली आहे. त्याचा मूळ रंग पांढरा आहे.

जीन्सचे फॅब्रिक बनवण्यासाठी अनेक धागे एकत्र जोडले जातात. हे फॅब्रिक इतर कापडांपेक्षा किंचित जाड आहे.

जीन्सला निळ्या रंगात डाई केले जाते. ज्यासाठी नॅचुरल इंडिगो डाई वापरला जातो.

तुम्ही असा विचार करत असाल की, जीन्स कॉटन धाग्यांनी बनवलेली असते. तेव्हा ती फक्त अशा निळ्या रंगात का रंगवली जाते? तर त्याचे कारण म्हणजे जीन्स रंगवण्याची प्रक्रिया आणि त्याचा परिणाम. यासाठी थोडी केमिस्ट्रीही जाणून घेऊया..

तुम्ही कधी लक्षात घेतले आहे की फक्त निळ्या जीन्समध्ये एकतर पांढरा किंवा आतील बाजूस निळ्या रंगाची फिकट शेड असते?

काळ्या, गुलाबी, तपकिरी इत्यादी छटांमध्ये, बहुतेकदा तोच रंग आतून दिसतो जसा तो बाहेरून दिसतो. हे सर्व केमिकल डाईमुळे घडते.

निळा रंग का निवडला गेला?

जर तुम्ही कधी फॅब्रिकला डाईंग करताना पाहिले असेल, तर तुम्हाला हे जाणवले असेल की, डाईचा वापर फॅब्रिकवर गरम पाण्याचा वापर करून किंवा उच्च तापमान वापरून इतर कोणत्याही तंत्राने केला जातो. हेच कारण आहे की बहुतेक रंग केवळ उच्च तापमानासोबत काम करतात. परंतु निळ्या रंगाच्या अर्थात इंडिगो डाईच्या बाबतीत असे नव्हते. हा नैसर्गिक रंग केवळ बाह्य धाग्यांना चिकटतो आणि त्याला उच्च तापमानाची आवश्यकता नसते.अशावेळी जीन्सला प्रत्येक वेळी धुतल्यावर थोड़ा-थोड़ा डाई निघून जातो. जीन्सचे फॅब्रिक आपोआप मऊ होते. रासायनिक डाईपेक्षा इंडिगो डाई स्वस्त असल्याने ते अधिक किफायतशीर मानले गेले.

सुरुवातीला अमेरिकेतील कामगारांसाठी जीन्स बनवले गेले. आणि नंतर Levis कंपनीने कामगारांना चांगले जीन्स देण्यासाठी रिव्हट्स (जीन्समधील लहान बटणे) चे पेटंट केले. कारण कामगारांना चांगली जीन्स देता येईल.यानंतर या जीन्स रंगवण्याच्या तंत्राबद्दल माहिती झाली. जीन्सचे फॅब्रिक धुतल्यानंतर मऊ होतात अशी बातमी पसरताच लोकांना ते खूप आवडले. जीन्स ही केवळ फॅशन स्टेटमेंटच नाही तर एक गरज देखील बनली आहे जी आजपर्यंत चालू आहे.

जीन्सचे फॅब्रिक मऊ झाल्यानंतर तुम्ही ते अनेक प्रकारे रीसायकल देखील करू शकता. हे काम कामगारांना खूप आवडले. काही दिवसातच सेल्फ मेड जीन्स पिशव्यांचा ट्रेंडही आला आणि 1900 पर्यंत जीन्स अमेरिका, लंडनच्या पलीकडे जाऊन हळूहळू जगभर पसरली.जीन्स रंगविण्यासाठी आजही तीच प्रक्रिया वापरली जाते. आणि जीन्सला फॅशन स्टेटमेंट मानले गेले आहे. ब्लू जीन्स आणि त्याच्या वेगवेगळ्या शेड्स अजूनही लोकांना खूप आवडतात आणि तुम्हाला बाजारात त्याची वेगवेगळी वेरिएंट्स पाहायला मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : दक्षिण नागपूर मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे मोहन मते 15573 मतांनी विजयी

Harish Pimple Won Murtizapur Assembly Election 2024: भाजप उमेदवार हरीश पिंपळे तिसऱ्यांदा विजयी!

Chiplun Assembly Election 2024 Results : चिपळूण विधानसभा निवडणुकीत शेखर निकमांनी राखला गड; प्रशांत यादवांचा पराभव

Purandar Assembly Election 2024 Result Live: तिरंगी लढतीत विजय शिवतारेंनी पुरंदरचा 'गड' राखला, संजय जगताप यांना धोबीपछाड

Sajid Khan Pathan won Akola West Election 2024: भाजपचा बालेकिल्ला काँग्रसने जिंकला! अकोला पश्चिममध्ये साजिद खान पठाण करणार 'राज्य'

SCROLL FOR NEXT