Stress In Child esakal
लाइफस्टाइल

Stress In Child : का वाढतोय मुलांवर एवढा ताण? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

सध्याच्या युगाला संगणकाचे युग, तंत्रज्ञानाचे युग, धावपळीचे युग, स्पर्धेचे युग अशा अनेक प्रकारे संबोधता येईल

साक्षी राऊत

Stress In Child : सध्याच्या युगाला संगणकाचे युग, तंत्रज्ञानाचे युग, धावपळीचे युग, स्पर्धेचे युग अशा अनेक प्रकारे संबोधता येईल. मात्र, शिक्षणक्षेत्रात विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हे युग जीवघेण्या स्पर्धेचे, शर्यतीचे युग समजले जाते. गेल्या पंधरवड्यात एक बातमी वाचण्यात आली, ती म्हणजे बीडमधील नवव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वर्गातच मृत्यू. यानिमित्ताने का येतो एवढा ताण मुलांवर, हा प्रश्न चर्चिला जात आहे.

वाढत्या स्पर्धेमुळे शाळा, शिकवणी वर्ग, रात्री होमवर्क यात विद्यार्थ्यांचे खेळणे, विरंगुळा बंदच झाला आहे. अतिताणामुळे विद्यार्थ्यांमध्ये ह्रदयविकारासारखे प्रकार वाढत आहेत. आतातरी पालकांनी सावध होणे गरजेचे आहे. एखादी घटना घडल्यावर त्यावर चर्चा करण्यापेक्षा अशा घटना घडूच नये म्हणून विशेषत्वाने प्रयत्न होणे गरजेचे आहे. खरं म्हणजे दहावी, बारावीचा काळ म्हणजे विद्यार्थ्यांच्या पौगंडावस्थेचा काळ. या दिवसांत मानसिक, शारीरिक स्थित्यंतरे घडतात.

त्यातच अभ्यासाचा ताणही त्यांच्यावर येतो. वेळेचे व्यवस्थापन नीट जमत नाही. त्यामुळे या धावपळीच्या काळात मुलांची मनोभूमिका सकारात्मक ठेवण्यासाठी आणि शिकण्यासाठी लागणारी ऊर्जा टिकून राहण्यासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देणे शाळा आणि पालक या दोघांचेही कर्तव्य ठरते.

ताण व्यवस्थापन शिकण्यापूर्वी आपण ताण निर्माण कसा होतो, याचाही विचार केला पाहिजे. गेल्या दशकात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड बदल होत आहेत; पण त्या बदलांचा स्वीकार करण्याची माणसाची क्षमता तेवढीच आहे. त्यामुळे नकळतपणे सर्वांवर ताण येतोच. विद्यार्थीही त्याला अपवाद नाही. एखादी दबावकारक वा अप्रिय परिस्थिती आली की, आपल्या मनात त्या परिस्थितीचे क्षणातच आधीच्या मानसिक सवयींनुसार विश्लेषण होते. बहुतेक वेळा हे आपल्या नकळतही होते. पण एकाच घटनेचे विश्लेषण प्रत्येकाच्या बाबतीत सारखे नसते. आपल्या मानसिक सवयी, दृष्टिकोन, आपण एखादी परिस्थिती कशी पाहतो, हाताळतो यावर ते अवलंबून असते.

मुलांचं वय खेळण्याचं असतं. त्यासाठी खेळ, आवडीचे छंद त्यांना खूप मदत करतात. खेळामुळे शरीरात ‘हॅपी हार्मोन्स’ निर्माण होतात. परिणामी ताण कमी होतो. आपल्या आवडत्या कामांचा आधार घेऊन मुलं ताण कमी करू शकतात. पण, दुर्दैवाने नववी, दहावीनंतर पालक मुलांचे खेळ, छंद बंद करतात. फक्त अभ्यास एके अभ्यास असेच त्यांचे वेळापत्रक बनवतात. परिणामी त्याचा परिणाम ताण वाढविण्यावर होतो. मुलांसोबत ‘क्वालिटी टाईम’ घालविणे, मुलांशी संवाद वाढविणे, त्याच्या मित्र-मैत्रिणींसोबत संवाद वाढविणे आवश्यक आहे. (stress)

मुलं म्हणजे आपल्याला हवा तसा रिझल्ट देणारी मशीन नव्हे. त्यामुळे त्यांच्या भावनांचाही कुठेतरी विचार झाला पाहिजे, भावना समजून घेतल्या पाहिजे. त्यांची इतर मुलांशी तुलना टाळली पाहिजे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडण्यासाठी पालक म्हणून, शिक्षक म्हणून आपल्याला मार्गदर्शकाची भूमिका पार पाडायची आहे. मुलाच्या क्षमता माहिती करून त्यांचे मालक नाही तर खरे पालक बनल्यास मुलं तणावापासून दूर राहू शकतील. त्यामुळे प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी समजावून घेण्याची गरज आहे. (Childcare Tips)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT