tingling  sakal
लाइफस्टाइल

Health Care News: हाता-पायांमध्ये येणाऱ्या मुंग्यांकडे कधीही दुर्लक्ष करू नका, कारण...

पायाला सतत मुंग्या का येतात? तुम्ही या आजाराला निमंत्रण तर देत नाहीये; वाचा सविस्तर

Aishwarya Musale

अनेक वेळा आपल्याला अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. कामाच्या व्यस्ततेमुळे किंवा खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी हे त्यामागचे मुख्य कारण आहे. 

बऱ्याचदा आपण सतत एकाच पोजिशनमध्ये बसलो की आपल्या पायाला मुंग्या येतात. हल्ली वर्क फ्रॉम होम झाल्याने तसेच ऑफिसमध्येही सगळी कामे पीसीवर एकाच जागी असल्याने लगेच त्या पोजिशनमधून उठल्यानंतर आपले पाय सुन्न होतात. मात्र पायाला सतत मुंग्या येण्याला ही कारणं जबाबदार असू शकतात. जाणून घेऊया सविस्तर.

१. व्हिटॅमिनची कमतरता

जर तुमच्या हाताला आणि पायाला मुंग्या येत असतील तर तुमच्यात व्हिटॅमिन B-12 ची कमतरता असू शकते. त्याची कमतरता असल्याने तुम्हाला थकलेले वाटेल. तसेच तुम्हाला आळस देखील येईल.

२. कार्पल टनेल सिंड्रोम 

खूप वेळ टायपिंग केल्याने तुमच्या मनगटाच्या नसा आकुंचित होतात. त्यामुळे तुमच्या हाताला मुंग्या देखील येतात. फिजिओथेरपी आणि व्यायामाने या सिंड्रोमचा त्रास दूर होण्यास मदत होते.

३. मधुमेह

रक्तातील अतिरिक्त साखरेचे प्रमाण शरीरातील नसांसाठी विषारी ठरते. त्यामुळे हातापायाला मुंग्या येतात. मुंग्या येण्याबरोबरच तुम्हाला खूप भूक किंवा तहान लागत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

4. हायपरथायरॉईसम

थायरॉईड ग्रंथी निष्क्रीय असल्यास थकवा जाणवू लागतो, वजन वाढू लागते. त्याचबरोबर हातपायाला मुंग्या येतात. म्हणून हायपरथायरॉईसम आहे की नाही हे पाहण्यासाठी ब्लड टेस्ट करून घेणे योग्य.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स तेजीत?

IND vs AUS : विराट कोहलीला खुणावतोय राहुल द्रविडचा विक्रम; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हव्यात फक्त १०२ धावा

तर 'कुछ कुछ होता हैं' मध्ये राणी मुखर्जी ऐवजी दिसली असती ऐश्वर्या राय; 'या' कारणामुळे दिलेला नकार, म्हणालेली-

Stock Market: कोण आहेत FPI आणि FII? त्यांच्यामुळे शेअर बाजार कोसळतो अन् तेजीत येतो?

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

SCROLL FOR NEXT