Winter Hair Dandruff Esakal
लाइफस्टाइल

Winter Hair Dandruff : हिवाळ्यात केसामध्ये खूप कोंडा होत असेल तर 'हे' उपाय करून बघा...

बॅक्टेरियामुळे आपल्या टाळूचा वरचा रक्षण करणारा थर नष्ट होतो आणि डोक्यात कोंडा तयार होतो

सकाळ डिजिटल टीम

Hair Dandruff : धूळ, प्रदूषण आणि तीव्र तापमान ह्यासारख्या हवामानातील बदलांमुळे आपल्या टाळू वरील नैसर्गिक ढाल नष्ट होत चालली आहे. म्हणून आपले केस अनेक त्रासांमधून जात आहेत. परिणामी, आपली टाळू कोट्यावधी बॅक्टेरिया आणि बुरशीला उघडी पडलेली दिसून येते. नंतर हे बॅक्टेरिया आणि बुरशी आपल्या टाळूवर हल्ला करतात. बॅक्टेरियामुळे आपल्या टाळूचा वरचा रक्षण करणारा थर नष्ट होतो आणि डोक्यात कोंडा  तयार होतो जो नंतर दाट पांढरा थर म्हणून टाळूवर बसलेला दिसतो. कोंडा हा केसांची नीट निगा, स्वच्छता न ठेवल्यास आणि त्वचारोगाच्या समस्यांमुळे देखील होऊ शकतो.

हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात कोंड्याची समस्या जाणवत असते. कोंड्याच्या समस्येपासुन सुटका करायची असेल तर, 'हे' घरगुती उपाय नक्की करून पाहा..

● दही

दही हे योग्य प्रमाणात  सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी उत्तम असते सोबतच हे दही केसांसाठी  खूप फायदेशीर आहे. तुम्ही जर का हिवाळ्यात दोन दिवसाआड खोबरेल तेल दह्यात मिसळून लावल्याने तुमच्या डोक्यातील कोंडा  हा आपोआप दूर होतो. तसेच केस मजबूत आणि मऊ सुध्दा बनवतात. 

● तुळशीचे पाणी

कोंड्यापासून त्वरित सुटका मिळवण्यासाठी दुसरा घरगुती उपाय म्हणजे कडुलिंब आणि तुळशीची पाने एकत्र करून त्या पाण्याने डोके धुऊन घेतल्यास डोक्यातील कोंडा आपोआप कमी होतो. हे पाणी कसे उकळायचे सर्वप्रथम काही कडुलिंब आणि तुळशीची पाने पाण्यात उकळावे मग ते पाणी थोड कोमट असतांना या पाण्याने डोके धुवावे. काही दिवस डोक्यावर चांगले लावा, तुम्हाला त्याचे फायदे लगेच दिसतील.

● चहाच्या झाडाचे तेल

कोंड्यापासून त्वरित सुटका मिळवण्यासाठी तिसरा घरगुती उपाय म्हणजे टी-ट्री ऑइल डोक्यावर लावणे. टी-ट्री ऑइल हे देखील केसातील कोंडा दूर करण्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल गुणधर्म आहेत. जे कोंड्याची समस्या दूर करण्यास खूप मदत करते. टी ट्री ऑइल शॅम्पूमध्ये एकत्रित करून डोके धुवावे, कोंड्याची समस्या दूर होईल.

● बेकिंग सोडा

कोंड्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठीचौथा घरगुती उपाय म्हणजे बेकिंग सोडा देखील कोंडा कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. केस शॅम्पू करताना त्यात एक चमचा बेकिंग सोडा टाकून डोक्याला चांगला मसाज करा आणि नंतर डोके धुवा. यामुळे डोक्याच्या मुळांवर अडकलेला कोंडा दूर होईल.

● खोबरेल तेल आणि लिंबाचा रस

कोंड्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठीपाचवा घरगुती उपाय म्हणजे खोबरेल तेल लिंबाचा रस एकत्र करून केसांच्या मुळांना लावावा. आणि मग टाळूवर हलक्या हातांनी मसाज करावी असे केल्याने डोक्यातील कोंडा नष्ट होण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Latest Maharashtra News Updates : पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Sovereign Gold Bond: सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

Maratha Reservation: सरकारमुळेच माझ्या मुलाचा जीव गेला; आरक्षणासाठी जीव देणाऱ्या प्रतिकच्या आईचा जरांगेंसमोर टाहो

A Unique Hat trick: ऑस्ट्रेलियन फिरकीपटूची अनोखी हॅटट्रिक; ३६ वर्षांपूर्वी कर्टनी वॉल्श यांनी केली होती अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT