Shopping Sickness Sakal
लाइफस्टाइल

Shopping Sickness: स्वत:ला आवरा! महिलांना होऊ शकतो शॉपिंगचा आजार...एका महिलेवर झाले तीन लाखांचे कर्ज, नेमकं काय घडलं?

Online Shopping Fraud: शॉपिंगच्या बिमारीमुळे एका महिलेवर झाले तीन लाखांचे कर्ज ,जाणून घ्या काय आहे प्रकरण...

पुजा बोनकिले

Shopping Sickness: शॉपिंग करणे ही एक सामान्य गोष्ट आहे. अनेक लोकांना शॉपिंग करायला आवडते. परंतु काही लोकांना शॉपिंगचे व्यसन देखील होते. मग ते कुठेही गेले तरी तिथून काही ना काही वस्तू खरेदी करतात आणि कुठेही जायला जमले नाही तर ते ऑनलाइन काहीतरी वस्तू ऑर्डर करतात.

महिलांबद्दल अनेकदा असं म्हटलं जातं की त्या शॉपिंगमध्ये पुढे असतात. काही लोक गंमतीने म्हणतात की तुम्हाला शॉपिंग सिकनेस झाला आहे, पण तुम्हाला माहित आहे का की जगात अशी एक महिला आहे जिला शॉपिंग सिकनेस झाला आणि तिच्यावर तीन लाखांचे कर्ज झाले.

केली नाइप्स असे या महिलेचे नाव आहे. ती एसेक्सच्या बॅसिलडॉनची रहिवासी आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, 42 वर्षीय केलीने 2006 मध्ये आपल्या पहिल्या मुलाला हेन्रीला जन्म दिला. जेव्हा तिला समजले की तिला झोपे चालण्याचा आजार झाला आहे, परंतु झोपेत चालण्याचा हा आजार लवकरच शॉपिंग सिकनेसमध्ये बदलला. झोपेत खरेदी करण्याच्या या आजारामुळे तिच्यावर तीन लाखांचे कर्ज झाले. मात्र, नंतर तिने हे कर्ज फेडले.

अशी झाली फसवणूक

केलीची झोपेत असताना फसवणूक झाली. ती झोपेत असताना ऑनलाइन शॉपिंग करत होती, तेव्हा तिने एका संशयित साईटवर बँकेचे तपशील भरले होते. मार्च महिन्यात केलीला एक स्पॅम संदेश आला होता, ज्यामध्ये त्याच्या थकबाकीच्या बिलांसाठी आर्थिक मदत देण्यात आली होती. आता झोपेत असताना तिने चुकून आपली आर्थिक माहिती फसवणूक करणाऱ्यांना दिली आणि तेव्हापासून तिची अनेकदा फसवणूक झाली आहे. तिला संशय आहे की फसवणूक करणाऱ्यांनी तिचे बँक तपशील विकले आहेत, त्यामुळेच ती वारंवार फसवणुकीची बळी पडत आहे.

हा दुर्मिळ आजार आहे

रिपोर्ट्सनुसार केलीला पॅरासोम्निया नावाच्या दुर्मिळ आजाराने ग्रासले आहे. यामुळे ती व्यक्ती झोपेतही खरेदी करू लागते. डॉक्टर म्हणतात की पॅरासोमनिया हा झोपेशी संबंधित आजार आहे. यामध्ये एखादी व्यक्ती झोपेत असताना असामान्य क्रिया करू लागते. जसे की, झोपेत चालणे, बोलणे इत्यादींचा समावेश होतो. केलीला असे वाटते की हा आजार तिच्या स्लीप एपनियामुळे झाला आहे, ज्यामध्ये ती झोपेच्या दरम्यान श्वासोच्छवास थांबवते. स्लीप एपनिया त्यांच्या मेंदूला अर्धवट जागृत ठेवण्यास भाग पाडते आणि त्यांना ऑनलाइन शॉपिंगसह त्यांच्या झोपेत काही गोष्टी करण्यास भाग पाडते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT