Raksha Bandhan Suit sakal
लाइफस्टाइल

Raksha Bandhan Suit Fashion : रक्षाबंधनासाठी बेस्ट आहेत या प्रिंटेड सलवार-सूटच्या नवीन डिझाईन्स... नक्की ट्राय करून बघा

Women Fashion Tips : रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रिंटेड सलवार-सूट डिझाईन घालता येतील. चला तर मग पाहुयात या प्रिंटेड सलवार-सूटच्या लेटेस्ट डिझाईन्स.

सकाळ डिजिटल टीम

सलवार-सूट दिसायला स्टायलिश आणि घालायला अतिशय आरामदायक असतात. यामध्ये तुम्हाला अनेक डिझाईन्स आणि विविध प्रकारचे मटेरियल पाहायला मिळेल. फॅन्सी लूकबद्दल बोलायचे झाले तर रक्षाबंधन येणार आहे.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रिंटेड सलवार-सूट डिझाईन घालता येतील. चला तर मग पाहुयात या प्रिंटेड सलवार-सूटच्या लेटेस्ट डिझाईन्स. तसेच, आम्ही तुम्हाला हे सलवार सूट स्टाईल करण्याच्या सोप्या टिप्स सांगणार आहोत.

फ्लोरल प्रिंट सलवार-सूट

फ्लोरल डिझाईन्स खूप फ्रेश लुक देण्यास मदत करते. या प्रकारच्या सूटमध्ये तुम्ही अंगरखा, अनारकली, नायरा कट, आलिया कट डिझाईन्स ट्राय करू शकता. आजकाल तुम्हाला असे फ्लोरल सूट्स 1,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळू शकतात.

बांधणी प्रिंट सलवार-सूट

प्रिंटेडमध्ये बांधणी प्रिंट खूप सुंदर दिसते. हे तुम्हाला जयपूर आणि गुजरातमध्ये सर्वाधिक दिसतील. यामध्ये ओम्ब्रे शेड्सही खूप सुंदर दिसतात. चुनरी किंवा कॉटन फॅब्रिकमध्ये तुम्ही बाजारात पाहू शकता.

कॉटन प्रिंटेड सूट

रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला सिंपल लूक स्टाईल करायचा असेल, तर तुम्ही अशा प्रकारचा कॉटन प्रिंटेड सलवार सूट घालू शकता. तुम्ही या प्रकारचा सलवार सूट डेली वेअरसाठी ते ऑफिस वेअरसाठी कॅरी करू शकता.

तसेच तुम्ही रक्षाबंधनाला काही वेगळ्या हेअरस्टाइल ट्राय करू शकता. आम्ही तुम्हाला काही बेस्ट हेअरस्टाइलच्या आयडिया देणार आहोत.

ब्रेडेड हेअरस्टाइल

अनंत अंबानींच्या लग्नात अनेक बॉलिवूड अभिनेत्री या ब्रेडेड हेअरस्टाइलमध्ये दिसल्या होत्या. तुम्ही फ्रंटमध्ये मेसी आणि स्लीक दोन्ही लुक देऊ शकता. तुम्ही वेणीला सुंदर ॲक्सेसरीजने सजवून आणखी सुंदर बनवू शकता.

मेसी पोनी

तुम्ही मेसी पोनी हा लुक ट्राय करू शकता. यामुळे तुमचे केस सुंदर दिसतील आणि बांधलेलेही राहतील

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT