लाइफस्टाइल

Women Health : वयाच्या पन्नाशीनंतरही दिसाल तरुण! आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

Aishwarya Musale

सुंदर दिसणं आणि तंदुरुस्त राहणं कुणाला आवडणार नाही? यासाठी आरोग्याकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे. तरुण आणि तंदुरुस्त दिसावं अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. यासाठी पोषक आहाराची आवश्यकता असते. घरातील कामं आणि कुटुंबियांची काळजी घेणं यामध्ये महिला बहुतेक वेळा स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.

महिलांमध्ये कॅल्शिअम, लोह आणि इतर पोषक तत्वांची कमतरता प्रामुख्याने दिसून येते. कारण, महिला स्वत:च्या आरोग्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. वाढत्या वयासोबत याचे परिणाम दिसू लागतात. त्यामुळे सकस आणि पोषक आहार घेणं फार गरजेचं आहे.

आवळा

केवळ महिलांनीच नाही तर सर्व वयोगटातील लोकांनी आवळा रोज खावा. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असतात. याशिवाय आवळ्यामध्ये पोटॅशियम, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन ए, बी, फायबर, प्रोटीन, लोह आणि मॅग्नेशियम देखील असते. हे खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते, पचनक्रिया सुधारते आणि मासिक पाळीच्या समस्या दूर होतात. याशिवाय, यामुळे चेहऱ्यावर चमक येते आणि केस लांब आणि दाट होतात. तुम्ही दररोज 1 कच्चा आवळा, रस इत्यादी घेऊ शकता.

खजूर

महिलांनी आपल्या आहारात खजूरचा समावेश करावा. हे एक सुपरफूड आहे जे अशक्तपणा आणि आळस दूर करते, शरीरात लोहाची पातळी वाढवते आणि मासिक पाळी नियंत्रित करते.

तीळ

मज्जासंस्थेपासून ते तुमच्या स्नायू आणि हाडांच्या आरोग्यापर्यंत, तीळ अनेक समस्या दूर करतात आणि मासिक पाळीच्या वेदना देखील कमी करतात. मासिक पाळीच्या 15 दिवस आधी 1 चमचे भाजलेले तीळ खा.

नारळ

नारळामुळे पित्त आणि वातदोष दूर होतात. नारळ फिजिकल स्‍ट्रेंथ वाढवते, हाडांना निरोगी ठेवते, तसेच थायरॉइडचे कार्य योग्य प्रकारे होते. हेल्‍थ बेनिफिट्ससाठी दररोज नारळाचा एक छोटा तुकडा खा.

काळा मनुका

काळे मनुके अनेक आजारांवर रामबाण उपाय म्हणून काम करते. रोज सकाळी काळ्या मनुका खा आणि सकाळची सुरुवात करा. यामुळे लोहाची पातळी वाढते, आतडे स्वच्छ होतात, मन शांत राहते आणि शरीराला पुरेसे पोषण मिळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Dasara Melava: "गर्दीचा आशीर्वाद मिळवतो तो दिल्ली झुकवतो..."; जरांगेंचा हुंकार, नारायण गडावर लाखोंची हजेरी

Indapur News : विठ्ठला इंदापूर विधानसभेचा उमेदवार बदला, अन्यथा उद्रेक होईल; शरद पवार यांना विठ्ठलाची उपमा देत साकडे

Nandurbar Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीच्या तोंडावर तिघांची भाजपला सोडचिठ्ठी; राजकीय गोटात चर्चांना उधाण

Dussehra Melava 2024 Live Updates: जय शिवराय म्हणत नारायण गडावर मनोज जरांगे यांच्या भाषणाला सुरुवात

मागील वेळी निसटता पराभव झालेल्या 'या' नेत्याला 'जनसुराज्य'कडून पुन्हा उमेदवारी; आमदार कोरेंची घोषणा

SCROLL FOR NEXT