Women’s Fashion  esakal
लाइफस्टाइल

Women’s Fashion : गुलाब, चाफा अन् मोगरा फुलला; मोती, खड्यांच्या ज्वेलरीवर भारी पडतायत फुलांचे हे सुंदर दागिने!

सकाळ डिजिटल टीम

Women’s Fashion :

आजकाल लग्नसराई जोरात सुरू आहे. लग्न सोहळ्यात लाखो रूपयांची उलाढाल होत असते. लग्नासाठी, हळदी, गावदेव, विड्यासाठी वेगळे कपडे आणि त्यावर वेगळा लुक अन् ज्वेलरी घालण्याचा ट्रेंड सध्याच्या मुलींमध्ये आहे.

केवळ लग्नच नाहीतर ओटीभरण समारंभ, प्री-पोस्ट वेडींग शूट यातही फुलांची ज्वेलरी आवर्जून घातली जाते. ओटीभरण समारंभात तर धनुष्यबाण, कलश अशा वस्तूही मॅचिंग ज्वेलरी प्रमाणे सजवल्या जातात.

लग्न, समारंभच नाहीतर इतरवेळी फॅन्सी ड्रेसवर घालण्यासाठीही फुलांची ज्वेलरी ट्रेंडमध्ये आहे. आज आपण फुलांच्या ज्वेलरीचे काही खास व्हरायटी पाहणार आहोत. ज्या तुम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमात घालू शकता. त्याने तुमच्या गळ्याची शोभा अधिकच वाढेल. आणि तुमच्या लुकलाही वेगळा टच मिळेल.

हळदी समारंभ

हळदी समारंभासाठी पिवळ्या फुलांची ज्वेलरी ट्रेंडमध्ये आहे. पूर्वी हळदीदिवशी मुलीला लग्नात दिले जाणारे नेकलेस अन् बाकीचे दागिने घातले जायचे. काहीवेळा केमिकलयुक्त हळदीने ते दागिने काळेही पडायचे. पण त्यावर या फुलांची ज्वेलरी म्हणजे सोन्याहून पिवळंच म्हणावं लागेल. कारण, कमी किंमतीत अतिशय सुंदर अशा फुलांचे दागिने उपलब्ध आहेत.

डोहाळेजेवण

डोहाळेजेवण कार्यक्रम हा लग्नानंतरचा स्पेशल कार्यक्रम असतो. त्यामुळे लग्नाप्रमाणेच हा कार्यक्रमही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळेच, डोहाळेजेवणाच्या साडीवर मॅच होतील असे दागिने ट्रेंडमध्ये आहेत. हातात, कानात, गळ्यातील लहान-मोठे हार, केसांमधील आकर्षक सजावटही फुलांच्या या ज्वेलरीनेच केली जाते. यासोबत फुलांपासूनच बनलेले धनुष्यबाण आणि कलशही असतो.

चाफा ज्वेलरी

चाफ्याच्या फुलांचा ट्रेंड सध्या जोरदार सुरू आहे. ही ज्वेलरी पारंपरिकच नव्हे तर वेस्टर्न कपड्यांवरही शोभून दिसते. चाफ्याच्या ताज्या फुलांची माळ गळ्यात अन् कानातही चाफ्याची फुलं घातली आहेत असाच भास या ज्वेलरीकडे पाहून होतो.

फुलांच्या पाकळ्यांचे लॉकेट

तुम्हाला फुलांची ज्वेलरी हवीय पण ती साडी किंवा ड्रेसवर नाही तर वेस्टर्न आउटफीटवर हवीय. तर ही नवी कोरी डिझाईन्स तुमच्यासाठीच आहेत. काचेच्या राऊंड फ्रेममध्ये खरे फूल, त्यांची पाकळी अन् तुमच्या प्रिय व्यक्तीची एखादी आठवण, वस्तू या लॉकेटमध्ये असते. हे घातल्यानंतर अतिशय सुंदर दिसते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसर, कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती या जागांवर मनसे उमेदवार देणार

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT