शारीरिक संबंध ही पती-पत्नीच्या नात्यातील एक नाजूक गोष्ट आहे. दोघांमधील शारीरिक संबंधांचा थेट परिणाम त्यांच्या नात्यावर होत असतो. त्यामुळेच, ही गोष्ट दोघांसाठीही महत्त्वाची असते. लग्न नवं असो वा जुनं ते चिरंतन टिकवण्याचा एक मार्ग म्हणजे शारीरिक संबंधही असू शकतात.
महत्त्वाच्या असलेल्या या गोष्टीसंबंधी उघडपणे चर्चा होत नाही. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी घडतात. शारीरिक संंबंध ठेवल्यानंतर घ्यावयाची स्वच्छता (Post-Sex Hygiene for Women) यावरही कोणी उघडपणे चर्चा करत नाही. या गोष्टी फारशा माहिती नसल्याने महिलांना अनेक आजारांना तोंड द्यावे लागते.
शारीरिक संबंधानंतर प्रत्येकाने त्यांच्या लैंगिक अवयवांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः महिलांनी हे काम केले पाहिजे. लैंगिक संबंधानंतर काही प्रतिबंधात्मक उपाय केल्याने तुम्हाला अनपेक्षित आजारपासून स्वत:चा बचाव करता येईल. एका अभ्यासानुसार, लैंगिक संबंधानंतर योग्य ती स्वच्छतेची काळजी न घेतल्याने लैंगिक संक्रमित रोग, यीस्ट इन्फेक्शन आणि यूटीआयचा धोका वाढतो.
त्यामुळेच, शारीरिक संबंध ठेवल्यानंतर योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे. हे केवळ तुमच्या योनीची स्वच्छता करणारे नाही. तर, तुमची कामवासनाही अबाधित ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. आज आम्ही तुम्हाला लैंगिक संबंधानंतरच्या चार महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहोत, ज्या प्रत्येक महिलेने पाळल्या पाहिजेत.
असे काही स्त्री-पुरुष आहेत जे आळसामुळे लैंगिक संबंधानंतर जननेंद्रिय स्वच्छ न करता किंवा लघवी न करता झोपी जातात. आळशीपणाची ही सवय तुमच्या लैंगिक आरोग्यास हानी पोहोचवू शकते. संंबंधांनंतर वॉशरूममध्ये जाऊन लघवी करा. योनीतील वीर्य लघवी वाटे बाहेर पडते. त्यामुळे योनी स्वच्छ पाण्याने साफ करा. असे न केल्यास मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका वाढतो. याची काळजी घेतल्यास बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोकाही कमी होऊ शकतो.
फक्त लघवी करणे पुरेसे नाही. तुमचे प्रायव्हेट पार्ट पाण्याने पूर्णपणे स्वच्छ करा. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आंघोळ करा. यामुळे, तुम्हाला संसर्ग होण्याचा धोका राहणार नाही. तसेच माऊथवॉशने चुळा भरा. माऊथवॉश उपलब्ध नसल्यास, पाण्याने तोंड चांगले धुवा.
शारीरिक संबंधापूर्वी केलेल्या फोरप्ले दरम्यान, काही संसर्ग निर्माण करणारे जंतू तोंड आणि ओठांना चिकटून राहतात, ज्यामुळे गोनोरिया आणि क्लॅमिडीया सारख्या लैंगिक संक्रमित रोगांचा धोका वाढतो.
शारीरिक संबंधानंतर महिलांनी अंतर्वस्त्र बदलणे ही लैंगिक स्वच्छतेची चांगली सवय मानली जाते. संबंधानंतर तुम्ही संभोगाच्या आधी घातलेल्या अंतर्वस्त्रांमध्ये झोपणे टाळले पाहिजे. अंतर्वस्त्रामध्ये देखील योनीतून येणारा द्रव किंवा स्त्राव अडकतो. यामुळे संसर्ग होऊ शकतो, त्यामुळे सेक्सनंतर स्वच्छ अंतर्वस्त्रे घाला. तुमचे गुप्तांग कोरडे ठेवा आणि संसर्गापासून दूर रहा.
शारीरिक संबंध ही थकवणारी गोष्ट आहे. हा एक प्रकारचा शारीरिक व्यायाम आहे, ज्याद्वारे तुम्ही काही कॅलरीजही बर्न करता. पण, शारीरिक संबंधानंतर पाणी पिण्याची सवय ठेवा. शारीरिक संबंधावेळी घाम जास्त प्रमाणात जातो. त्यामुळे, तुम्हाला डिहाड्रेशनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे शारीरिक तणाव, थकवा दूर करण्यासाठी भरपूर पाणी प्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.