Womens Health Tips :  esakal
लाइफस्टाइल

Womens Health Tips : मैत्रिणींनो, तुम्ही निरोगी आहात का? मासिक पाळीचा रंग सांगतो सर्वकाही!

महिन्याला हार्मोनल बदलांमुळे या रक्ताचा पोत आणि रंग बदलत राहतो

Pooja Karande-Kadam

Womens Health Tips :

मासिक पाळीचा अनुभव हा प्रत्येकीचा वेगळा असतो. काहींना अगदी सहज आणि कोणताही त्रास न होता मासिक पाळी येते. तर काहींना मात्र या दिवसात इतका त्रास होतो की, त्यांना या दिवसात काहीही करायची इच्छा होत नाही. पण या व्यतिरिक्त तुम्ही कधी असा विचार केला आहे का?

तुमच्या मासिक पाळीतील (Periods)च्या काळात होणारा ब्लड फ्लो अर्थात रक्तस्राव, त्याचा रंग तुमच्या आरोग्याविषयी बरेच काही सांगतो. तुमच्या मासिक पाळीतील स्रावाचा रंग नेमका कसा असतो? काळपट, लाल की फिकट, त्यावरून तुमचे आरोग्य कसे आहे, तुम्हाला काही आजार तर नाही याची माहिती आज आपण घेऊयात.

मासिक पाळी दरम्यान बाहेर पडणारा रक्तस्त्राव तुम्हाला काही संकेत देतो. तुमच्या शरीरात काहीतरी गडबड होत आहे हे तुम्हाला आधीच सांगतो. पण तुम्ही त्याकडे लक्ष देत नाही. जोपर्यंत ती समस्या मोठी होऊन तुमच्यासमोर उभी राहते तोपर्यंत तुम्ही लक्ष देत नाही.

परंतु तुम्हाला नंतर येणार्‍या मोठ्या समस्येची लहान चिन्हे आधीच मिळू लागली आहेत. याकडे थोडे लक्ष द्या, तर तुम्ही तुमच्या मोठ्या आजारांपासून मुक्त होऊ शकता. या छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर ते मोठे आजार होतील.

दर महिन्याला हार्मोनल बदलांमुळे या रक्ताचा पोत आणि रंग बदलत राहतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्त्रीचा आहार, जीवनशैली, वय आणि वातावरण यावरही ते अवलंबून असते. संसर्ग, गर्भधारणा आणि काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगामुळे रक्ताचा रंग आणि अनियमित रक्ताच्या गाठी बनू शकतात. (Women Health)

मासिक पाळीचा रंग आणि आरोग्य

काळा

काळ्या रंगाच्या रक्तप्रवाहाबाबत डॉक्टर म्हणतात की दीर्घ कालावधीनंतर तुमच्या गर्भाशयातून रक्त बाहेर आल्याचा हा थेट संकेत आहे. त्यामुळे ते अधिक ऑक्सिडाइज्ड आहे. हे सहसा ज्या स्त्रियांना मासिक पाळी नियमित येत नाही त्यांच्यामध्ये दिसून येते. मासिक पाळीच्या चुकल्यामुळे त्यांच्या गर्भाशयात रक्त जमा होते आणि जेव्हा ते बाहेर येते तेव्हा त्याचा रंग काळा असतो.

लाल किंवा तपकिरी:

डॉक्टर म्हणतात की तपकिरी रंगाचे रक्त मासिक पाळीच्या सुरुवातीला किंवा शेवटी येते. हे सूचित करते की तुमचे रक्त जुने झाले आहे. यामध्ये काळजी करण्यासारखे काही नाही.

गडद लाल

आरोग्यतज्ज्ञांच्या मते गडद लाल रक्त हे तुमच्या निरोगी असण्याचे लक्षण आहे. जर तुमचे रक्त लाल भडक रंगाचे असेल तर याचा अर्थ ते पूर्णपणे ताजे आहे. या रंगाचे रक्त तुमच्या मासिक पाळीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसू शकते, जेव्हा तुम्हाला जास्त रक्तस्त्राव होतो. पण यात घाबरण्यासारखे काही नाही.

गुलाबी

एखाद्या महिलेला असे वाटत असेल की तिच्या मासिक पाळीच्या रक्ताचा रंग गुलाबी आहे, तर तिच्या रक्तामध्ये गर्भाशयातील ग्रीवाच्या द्रवपदार्थाचा समावेश होण्याची शक्यता असू शकते. जर तुमचा प्रवाह सामान्यपेक्षा हलका असेल तर, इस्ट्रोजेन पातळीचे कारण असू शकते.

केशरी रंग

डॉक्टरांचे म्हणणे आहे की जर तुम्हाला तुमच्या मासिक पाळी दरम्यान केशरी किंवा नारंगी रंगाचे रक्त दिसले तर ते तुम्हाला योनिमार्गाचे संक्रमण, लैंगिक संक्रमित संसर्ग (STI) किंवा इतर काही बॅक्टेरियाचे संक्रमण असल्याचे सूचित करू शकते. या रक्तात तुम्हाला एक विचित्र वास देखील जाणवेल.

त्याच्या टेक्‍चरमध्‍येही तुम्हाला फरक दिसू शकतो. यावर डॉक्टरांनी असा सल्ला दिला की, असे झाल्यास तुम्ही तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसार तुमचे उपचार करा.

राखाडी

डॉक्टरांच्या मते, जर तुमच्या योनीतून या रंगाचे रक्त येत असेल तर ते तुम्हाला संसर्ग झाला असण्याचे लक्षण आहे. म्हणून तुम्ही ताबडतोब आपल्या स्त्रीरोगतज्ज्ञांशी भेटीची वेळ निश्चित केली पाहिजे आणि त्वरित उपचार सुरू करावे.

“बॅक्टेरियल योनिओसिस हा सामान्य संसर्गांपैकी एक आहे. पण जर योनीतून रक्तप्रवाहात बदल होत असेल आणि तुम्ही गर्भवती असाल तर तुमचा गर्भपात होण्याची शक्यता आहे.

पांढरट स्त्राव

डॉक्टर सिद्धार्थ जोर देतात की जर तुम्हाला तुमच्या मासिक पाळीच्या रक्तात पांढरा स्त्राव दिसत असेल तर तुम्हाला गर्भाशयाच्या मुखाची झीज होण्याची शक्यता आहे. कारण ही सर्वायकल इरोशनची लक्षणे असू शकतात. म्हणून आपल्याला शक्य तितक्या लवकर शोधणे आणि आपल्या स्त्रीरोगतज्ञाशी बोलणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT