Womens Health Tips esakal
लाइफस्टाइल

Womens Health Tips : Vagina तून सतत वास येतोय? मग तुम्ही करताय या चूका, वेळीच सुधारा

अनेक महिलांना Vagina च्या स्वच्छतेसंदर्भातील या गोष्टी माहितीच नाहीत

Pooja Karande-Kadam

Womens Health Tips : मासिक पाळी सुरू होण्यापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या समस्यांमध्ये योनीतून वास येण्याच्या समस्येचा समावेश होतो. या समस्येमध्ये योनीतून दुर्गंधी येऊ लागते, काही वेळा मासिक पाळी संपल्यानंतर ही समस्या वाढते.

या घाणेरडया वासामुळे तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीलाही विचित्र वाटू शकते. याच्या कारणांबद्दल बोलायचे झाले तर ही समस्या अनहेल्दी पदार्थ खाणे, स्वच्छतेकडे लक्ष न देणे आणि योनीमार्गाच्या संसर्गामुळे त्रस्त होऊ शकते.

पण काही गोष्टी लक्षात ठेवल्या आणि जीवनशैलीत आरोग्यदायी बदल केले, काही चूका टाळल्या तर या समस्येपासून मुक्ती मिळू शकते.

पाणी कमी पिणे

ज्या महिलांच्या शरीराची दुर्गंधी येते. त्या पाणी कमी पितात. त्यामुळे अशा समस्यांचा त्यांना सामना करावा लागतो. नैसर्गिकरित्या योनीचा वास कमी करण्यासाठी द्रवपदार्थांचे सेवन करणे महत्वाचे आहे. यामुळे शरीरात साचलेली विषारी द्रव्ये निघून जातात आणि शरीर हायड्रेटही राहते. त्यामुळे लघवी आणि योनीतून दुर्गंधी येण्याची समस्याही कमी होऊ लागते.

त्याच त्याच पॅन्टी वापरणे

जर तुम्ही अनेक दिवस सतत तीच पॅंटी घालत असाल. तर वापरून वापरून दुर्गंधी पँटीवर देखीस बसते. त्यामुळे सतत तीच कपडे वापरून तो वासही शरीराला लागून राहतो. त्यामुळे योनीतून दुर्गंधी येण्याची समस्या वाढू शकते. यामुळे योनीमार्गात संसर्ग होण्याचा धोकाही वाढू शकतो, त्यामुळे काही काळानंतर पॅंटी बदलायला विसरू नका. (Womens Health Tips )

स्वच्छता न राखणे

लघवीला गेल्यावर प्रत्येकवेळी योनी स्वच्छ पाण्याने धुणे आणि कोरडी करणे गरजेचे आहे. पण, अनेक महिलांना ही गोष्ट माहितीच नाही. त्यामुळे प्रत्येकवेळी स्वच्छता केली जात नाही. तुम्ही लघवीला जाल तेव्हा योनी साफ करायला विसरू नका . यामुळे बॅक्टेरिया जमा होण्याची शक्यताही कमी होईल आणि योनीतून वास येणार नाही. हे देखील लक्षात ठेवा की योनी धुतल्यानंतर, आपण ते टिश्यूने स्वच्छ केले पाहिजे.

सकस आहार न घेणे

आजकाल प्रत्येकाला जंक आणि प्रोस्टेट फूड खाण्याची सवय असते. पण या सवयीमुळे योनीतून वास येऊ शकतो. जास्त साखर आणि तेलकट अन्न योनीच्या pH पातळीला हानी पोहोचवू शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत सकस आहार घेणे गरजेचे आहे.

सेक्सनंतरही योनी स्वच्छ करावी लागते

अनेकदा, अनेक स्त्रिया Sex नंतर योनी साफ करण्यास विसरतात. यामुळे योनिमार्गात संसर्ग होऊ शकतो आणि वास वाढू शकतो. त्यामुळे शारीरिक संबंध ठेवल्यानंतरही योनीमार्ग व्यवस्थित स्वच्छ केला पाहिजे. यामुळे योनिमार्गाच्या संसर्गाचा धोका कमी होतो आणि योनीतून दुर्गंधी येण्याची समस्या येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT