लाइफस्टाइल

Womens Toilet : सार्वजनिक स्वच्छतागृह वापरताना संसर्ग होण्याची भिती?; महिलांनो अशी घ्या काळजी

पण महिलांच्या स्वच्छतागृहांचा प्रश्न ऐरणीवर

सकाळ वृत्तसेवा

देशाच्या कोपऱ्या कोपऱ्यात वीज, रस्ते पाणी या सुविधा पोहोचल्या. पण महिलांच्या स्वच्छतागृहांचा प्रश्न ऐरणीवर आहे. मुळात प्रवासात स्वच्छतागृह शोधणं हा एक ‘जागतिक’ प्रश्न आहे. कारण एकवेळ हरवलेला दागिना अनेक वर्षांनी सापडेल. पण, महिलांसाठी टॉयलेट सापडणार नाही. बरं ते सापडलंच तर ते किती स्वच्छ असेल याबाबत बोलायलाच नको.

लांबच्या प्रवासात वॉशरूम, शौचालय सापडणार नाही म्हणून अनेक महिला द्रवपदार्थांचे सेवन कमी करतात. त्यामुळे अधिक थकवा महिलांना जाणवतो. एखाद्या पेट्रोल पंपावर मिळाले शौचालय तर ते किती स्वच्छ असेल, ते वापरताना काय काळजी घ्यायची हे पाहुयात.

केवळ बस स्टॅंड, रेल्वेस्टेशनच नव्हे तर शॉपिंग मॉल्स, पर्यटन स्थळे इथेही सार्वजनिक स्वच्छतागृहांची वाईट अवस्था आहे. सर्वच स्वच्छतागृहांमध्ये कमोड असते. त्यामुळे ते स्वच्छतागृह वापरल्याने संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये कमोडवर बसण्याआधी ते टिश्यू पेपरने स्वच्छ करा. अनेक लोकांच्या विचित्र वागण्यामुळे कमोडवर जंतू पसरलेले असतात. त्यामुळे ते स्वच्छ असल्याची खात्री करा. ते स्वच्छ नसेल तर टिशूपेपरने स्वच्छ करावे.

टॉयलेट सॅनिटायझर

कोविडनंतर सर्वांनी सॅनिटायझर जवळ ठेवण्यास सुरुवात केली आहे. याचा वापर तुम्ही टॉयलेट सीट साफ करण्यासाठी देखील करू शकता. प्रवास करताना तुमच्यासोबत नेहमी सॅनिटायझर ठेवा. टॉयलेट सीटवर आधी सॅनिटायझरचा वापर करून मगच त्याचा वापर करा.

सीट कव्हरचा वापर

टॉयलेट सीट साफ करायची नसल्यास किंवा तसे करणे शक्य नसल्यास स्वत:जवळ नेहमी सीट कव्हर ठेवा. हे कव्हर्स बाजारात कुठेही मिळतील.ते कुठेही सोबत घेऊन जाणे सहज शक्य आहे.

साबण वापरू नका

सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये ठेवलेला साबण कधीही वापरू नका. बरेच लोक याचा वापर करतात. त्यामुळे जंतूंचे संक्रमण होणे अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे नेहमी कागदी साबण सोबत ठेवावेत.

हात धुण्यासाठी गरम पाणी

सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये हात धुण्यासाठी गरम पाणी असल्यास केवळ त्यानेच हात धुवा. यामुळे हात व्यवस्थित स्वच्छ होतील. तसेच, हात नेहमी 20 सेकंद धुवावेत. तेव्हाच हात जंतूमुक्त होतील.

भारतीय पद्धतीचे स्वच्छतागृह वापरा

भारतीय पद्धतीच्या स्वच्छतागृहात जाण्यात अनेकांना कमीपणा वाटतो. त्यामुळे भारतीय तशा स्वरूपाचे टॉयलेट असेल तर लोक जात नाहीत. पण, भारतीय स्वरूपाचे टॉयलेट वापरणे सुरक्षित आहे. त्यामुळे कोणतेही आजार होत नाहीत. त्यामुळे त्या पद्धतीचे टॉयलेट वापरण्याचा प्रयत्न करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT