Skincare Tips Esakal
लाइफस्टाइल

Skincare Tips : वर्किंग वुमनने जरूर फॉलो कराव्यात ‘या’ स्किनकेअर टिप्स

त्वचेची काळजी घेण्यासाठी नोकरदार महिलांकडे पुरेसा वेळ नसतो.

Monika Lonkar –Kumbhar

Skincare Tips : वातावरणातील वाढते प्रदूषण आणि धूळ यांचा आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतो. या सगळ्याचा आपल्या त्वेचवर ही परिणाम होतो. त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये आरोग्यासोबतच आपण त्वचेची देखील काळजी घेणे महत्वाचे आहे.

नोकरदार महिलांकडे तर त्वचेची काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. यामुळे, त्यांचे त्वचेकडे दुर्लक्ष होते आणि त्वचेच्या समस्यांना अधिक आमंत्रण मिळते. मात्र, तुम्ही तुमच्या रोजच्या रूटीनमध्ये काही टिप्सचा वापर करून त्वचेची काळजी नक्कीच घेऊ शकता.

आज आम्ही खास नोकरदार महिलांसाठी काही स्किनकेअर टिप्स सांगणार आहोत. चला तर मग कोणत्या आहेत या टीप्स ? त्या आपण जाणून घेऊयात.

पुरेशी झोप महत्वाची

वर्किंग वुमनला अनेकदा रात्री उशिरा झोप येते किंवा अनेकदा त्यांच जागरण होतं. रात्री उशिरा उठणे आणि सकाळी कामावर जाण्यासाठी लवकर उठणे यामुळे महिलांमध्ये आरोग्याच्या समस्या वाढतात. मात्र, याचा आरोग्यावर परिणाम होण्यासोबतच आपल्या त्वचेवर ही परिणाम होतो.

त्यामुळे, नोकरदार महिलांनी पुरेशी ६-७ तासांची झोप घेणे महत्वाचे आहे. जर ही पुरेशी झोप तुम्ही नाही घेतली तर तुम्हाला त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागेल.

सनस्क्रिन कधीच स्कीप करू नका

उन्हात बाहेर पडताना सनस्क्रिन चेहऱ्यावर अवश्य लावा. हे कधीच स्कीप करू नका. अन्यथा सूर्याच्या अतिनील किरणांचा तुमच्या त्वचेवर प्रभाव पडू शकतो आणि यामुळे त्वचा काळी पडणे, काळे डाग येणे, स्किन टॅन होणे इत्यादी समस्यांना आमंत्रण मिळू शकते.

त्यामुळे, ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर पडताना सनस्क्रिनचा वापर अवश्य करा. चुकूनही सनस्क्रिन स्कीप करू नका.

स्क्रबिंग अवश्य करा

नोकरदार महिलांनी आठवड्यातून किमान २ वेळा चेहऱ्याचे स्क्रबिंग अवश्य करायला हवे. कारण, नोकरदार महिलांचा ऑफिसला जाताना रोज प्रवास होतो. या प्रवासात मग, प्रदूषण, धूळ यांचा रोजच सामना करावा लागतो. या सगळ्याचा त्वचेवर परिणाम होत असतो.

त्यामुळे, त्वचेवर पिंपल्स येणे, काळे डाग पडणे त्वचा निस्तेज होणे यांसारख्या समस्या होत असतात. त्यासाठी आठवड्यातून किमान २ वेळा तरी त्वचेचे स्क्रबिंग करणे आवश्यक आहे.

स्क्रबिंग केल्याने त्वचेची स्वच्छता होते आणि डेड स्किन दूर होते. त्यामुळे, त्वचेवर चांगला प्रभाव दिसून येतो आणि त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT