आपल्या सर्वांना माहित आहे की एड्स हा एक गंभीर आणि असाध्य रोग आहे. एड्समुळे आतापर्यंत लाखो लोकांचा बळी गेला आहे. त्यामुळेच लोकांमध्ये या आजाराबद्दल जनजागृती व्हावी यासाठी जागतिक एड्स दिवस साजरा केला जातो. लोकांच्या मनातील शंका दूर करून, लोकांनी योग्य ती काळजी घ्यावी यासाठी विविध उपक्रम या दिवशी राबवले जातात.
बहुतेक लोकांना एड्सबद्दल माहिती आहे. पण, याच्याशी संबंधित काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने पसरवल्या जात आहेत. लोकांना अनेक शंका असतात पण त्याचे योग्य निरसन न करता लोक या आजाराबाबत चुकीची माहिती देतात. चुकीची माहिती मिळाल्याने हा आजार बळावण्याची शक्यता आहे.
एड्सबद्दल चुकीची माहिती लोकांना गोंधळात टाकू शकते आणि एड्सच्या रुग्णांसाठी ते खूप धोकादायक आणि घातक ठरू शकते. म्हणूनच, आज जागतिक एड्स दिवसाच्या निमित्ताने तुम्हाला एचआयव्ही आणि एड्सशी संबंधित अशा गोष्टींबद्दल सांगत आहोत, ज्या चुकीच्या सांगितल्या जातात.
उत्तर - हा आजार फक्त एचआयव्ही ग्रस्त व्यक्तीसोबत राहून पसरत नाही. एकाच टॉयलेट सीटचा वापर करून, एकत्र अन्न खाल्ल्याने, एकाच हवेचा श्वास घेतल्याने, मिठी मारून किंवा हस्तांदोलन केल्याने हा आजार पसरत नाही.
एकाच ताटातील अन्न खाल्ल्याने किंवा जिममधील साधने शेअर केल्याने हा आजार पसरत नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की एचआयव्ही संक्रमित रक्त, वीर्य, योनीतील द्रव आणि आईच्या दुधाद्वारे पसरू शकतो
एचआयव्हीचा प्रसार सर्वसाधारणपणे लैंगिक संबंधातून होऊ शकतो. परंतु, ओरल सेक्सद्वारे एचआयव्ही पसरण्याचा धोका खूप कमी आहे. Hiv.gov मध्ये प्रकाशित झालेल्या लेखानुसार, ओरल सेक्सद्वारे एचआयव्ही पसरण्याची शक्यता खूप कमी झाली आहे.
एखाद्याचा जोडीदार एचआयव्ही पॉझिटिव्ह असला आणि त्याने आपल्या स्त्री जोडीदाराच्या तोंडातून विर्यस्सखलन केले तरीही एचआयव्हीची लागण होण्याचा धोका योनीमार्गाच्या जोखमीपेक्षा खूपच कमी असतो.
तोंडावर व्रण, हिरड्यांमधून रक्तस्त्राव, जननेंद्रियाच्या जखमा इत्यादीमुळे तोंडावाटे सेक्सद्वारे एचआयव्ही पसरण्याचा धोका वाढतो.
तुम्ही औषधे घेत आहात की नाही याने काही फारसा फरक पडत नाही. मात्र, जर तुम्ही अनेक जोडीदारांसोबत लैंगिक संबंध ठेवत असाल तर एचआयव्ही होण्याचा धोका लक्षणीय वाढतो. webmd मध्ये प्रकाशित झालेल्या लेखानुसार , "समलिंगी व्यक्तींना शरीर संबंध ठेवल्याने एचआयव्हीचा संसर्ग होण्याचा धोका आधिक असतो.
एचआयव्ही किंवा एड्स झाल्यानंतर या आजाराची लक्षणे लगेच दिसू लागतात ही पूर्णपणे चुकीची संकल्पना आहे. असे नाही. या आजाराची लक्षणे वर्षानुवर्षे दिसू शकत नाहीत आणि तुम्ही सामान्य जीवन जगू शकता. म्हणून, एचआयव्ही शोधण्यासाठी तुम्ही त्याची चाचणी घेणे फार महत्वाचे आहे.
मृत्यू हे जीवनाचं अंतिम सत्य आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. हे जरी सत्य असलं की, एचआयव्ही रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण खूप जास्त आहे. पण, आज अशी अनेक औषधे आली आहेत जी एचआयव्ही रुग्णांची प्रतिकारशक्ती एचआयव्ही विषाणूशी लढण्यास सक्षम बनवतात. यासोबतच रुग्णाने चांगली जीवनशैली आणि सकस आहार पाळल्यास तो निरोगी आणि दीर्घायुष्य जगू शकतो.
किस केल्याने परसतो का HIV?
HIV किंवा AIDS ची लागण थुंकीतून होत नाही. त्यामुळे किस केल्याने हा आजार पसरत नाही. पण, बाधित व्यक्तीच्या तोंडावर फोड किंवा हिरड्यांमधून रक्तस्त्राव होत असेल तर त्यांच्या संपर्कातून एचआयव्ही पसरण्याची शक्यता असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.