World Blood Donor Day 2024: रक्तदानाच्या पुण्यांची महती फार मोठी आहे. चरकाच्या शास्त्राप्रमाणे जीवितदान हे सर्वश्रेष्ठ दान होय. रक्त म्हणजे ‘जीव’ असे सुश्रुताचार्यानी म्हटले आहे. त्यामुळे अगदी सामान्य व्यक्तीही रक्तदान करून दुसऱ्याचा जीव वाचवून जीवितदान करण्याचे पुण्य मिळवू शकते म्हणून रक्तदान हे श्रेष्ठ दान होय.
‘१४ जून’ हा जागतिक रक्तदान दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. जे लोक ऐच्छिक रक्तदान करून जीवनदान करतात त्यांचे आभार मानणे व नवीन लोकांना ऐच्छिक रक्तदानासाठी प्रवृत्त करणे तसेच रक्तदान केल्यास आपल्याला काहीही त्रास होत नाही हे सांगून रक्तदानाविषयी माहिती लोकांपर्यंत पाहोचविण्याचे कार्य करण्याचे उद्दिष्ट या दिवशी ठरविलेले आहे.
हा दिवस जागतिक पातळीवर साजरा करण्यासाठी वर्ल्ड हेल्थ सेंटर ऑर्गनायझेशन इंटरनॅशनल रेडकॉस व रेडकियेसंट सोसायटी सक्रीय आहेत. सुरक्षित रक्त रूग्णांना मिळवून देण्यासाठी ऐच्छिक रक्तदान महत्वाचे ठरते कारण रक्तदान हे धर्म जात, पंथ, लिंग, वित्त असा भेदभाव न करता मानवतेच्या दृष्टीने रक्तदात्याची संख्या वाढवणे ते नियमित रक्तदाते होण्यासाठी काम करावे याचा अभ्यास या दिवशी करून काहीही मोबदल्याची अपेक्षा न करता, रक्तदान करण्यास प्रवृत्त करणे हे मोलाचे कार्य आहे.
जागतिक रक्तसंक्रमणामध्ये एड्स या रोगाचे प्रमाण वाढत असल्यामुळे ऐच्छिक रक्तदानाची चळवळ ही महत्वपूर्ण ठरत आहे. ‘१४ जून’ हा जागतिक रक्तदान दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. जे लोक ऐच्छिक रक्तदान करून जीवनदान करतात त्यांचे आभार मानणे व नवीन लोकांना ऐच्छिक रक्तदानासाठी प्रवृत्त करणे तसेच रक्तदान केल्यास आपल्याला काहीही त्रास होत नाही हे सांगून रक्तदानाविषयी माहिती लोकांपर्यंत पाहोचविण्याचे कार्य करण्याचे उद्दिष्ट या दिवशी ठरविलेले आहे.
एकविसाव्या शतकात मानवाने सर्वच क्षेत्रात अनेक शोध लावले आहेत. शरीरात कृत्रिम अवयव बसविले जातात. टेस्टट्यूब बेबीच्या तंत्रज्ञानामुळे अनेकांना अपत्यलाभ झालेला आहे. परंतु कृत्रिम रक्त तयार करण्याचे तंत्र मानवाने अद्याप आत्मसात केलेले नाही. मानव रक्तावर प्रकीया करतो. त्याचे विघटन करू शकतो परंतु प्रत्यक्षात रक्त तयार करू शकत नाही. त्यामुळे मानवी रक्ताला पर्याय सापडलेला नाही. मानवी रक्त फक्त मानवी शरीरातच तयार होते म्हणून रक्तदान करून ही गरज भागवावी लागते व त्याची रक्तगटानुसार नोंद ठेवावी लागते.
रक्तदानामुळे काहीही त्रास होत नाही. कावीळ, गुप्तरोग मलेरिया, एड्स असे रोग न झालेला माणूस रक्तदान करू शकतो. वयाच्या १८ वर्षापासून ६५ वर्षापर्यंत करता येते. रक्त्तदानानंतर कोणतेही कष्टाचे काम करू शकतो. रक्तदान करणाऱ्या रक्त्तदात्याचे वजन ४५ किलोच्या वर असावे. रक्तदात्याच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण १२.५ ग्रॅमच्यावर असावे तर रक्तदान हा सिस्टोलिक १०० ते १५० व डायास्टोलिक ६० वे ९० असावे. नाडीचे ठोके ८० ते १०० असावे.
आज धकाधकीच्या जीवनात बरयाच ठिकाणी छोट्या मोठ्या आजारात अपघातात ऑपरेशनच्या वेळी रक्ताची खूप मोठ्या प्रमाणावर गरज असते व त्यावर रक्तदान हाच एक उपाय आहे व तो आपणासारखा सुन नागरिकच करू शकतो. 'फळाची अपेक्षा न करता कर्म करणे' या उक्तीप्रमाणे आजच्या दिनी कशाचीही अपेक्षा न ठेवता दर तीन महिन्यास मी रक्तदान करेन हा संकल्प युवा वर्गाने सोडावा.
आज मितीला दमाणी रक्तपेढीमध्ये २ शतकवीर जोडपे रक्तदाते आहेत. पहिल्या व दुसऱ्या शतकवीर रक्तदात्या महिला मिळण्याचा मान याच रक्तपेढीला मिळाला आहे.
इंडियन रेडकॉस सोसायटीची शाखा असलेली दमाणी रक्तपेढी ही सोलापुरातील सर्वात मोठी रक्तपेढी आहे. रक्तपेढीचे वार्षिक रक्तसंकलन १०००० युनिटस् पेक्षा जास्त आहे. ही रक्तपेढी ब्लड ट्रान्सफ्युजन सेंटर चालवते व वर्षाला १५०० युनिटस रक्त मोफत देते. तसेच अद्ययावत कंपोनंट सेक्शन आहे. ज्यायोगे अफेरसिस रुग्णाला मिळण्याची सोय झाली. १०० वेळा अफेरसिस दान करणारे रक्तदाते सुध्दा याच रक्तपेढीत आहेत. तरी आपणसुद्धा आपलं एक तरी अमूल्य ‘रक्तदान’ रक्तपेढीच्या नवीन इमारतीमध्ये करून आजचा ‘रक्तदान दिन’ साजरा करावा हे सर्व ऐच्छिक रक्तदात्यांना आवाहन.
जयेश पटेल: सचिव इंडियन रेड क्रॉस सोसायटी, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.