World Blood Donor Day 2024 Sakal
लाइफस्टाइल

World Blood Donor Day 2024: गैरसमज बाजूला सारा अन् स्वेच्छेने रक्तदान करा

World Blood Donor Day 2024: समाजात रक्तदानाशी निगडित मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत. या गैरसमजामुळेच रक्तदान हे उत्तम असते हे माहीत असूनही ते करायला अनेकजण पुढे येत नाही.

सकाळ वृत्तसेवा

World Blood Donor Day 2024: निस्वार्थीपणानं केलेले दान हे सर्वश्रेष्ठ असते. यामुळेच रक्तदान हे निःस्वार्थी दानापैकी एक समजले जाते. जीव वाचविणाऱ्या रक्तदानाला सामाजिक दृष्टिकोनातून फार महत्त्व आहे. मात्र समाजात रक्तदानाशी निगडित मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत. या गैरसमजामुळेच रक्तदान हे उत्तम असते हे माहीत असूनही ते करायला अनेकजण पुढे येत नाही. मात्र स्वेच्छा रक्तदानाचा टक्का वाढावा यासाठी तज्ज्ञ म्हणतात की इतरांच्या फायद्यासाठी प्रत्येक सुदृढ व्यक्तीने रक्तदान हे करायलाच हवे.

रक्तदानाच्या प्रक्रियेत शरीरातील एकूण ५ लिटर रक्तापैकी केवळ ३५० मिली एवढेच रक्त घेतले जाते. हे रक्तही २४ तासाच्या आत शरीरात पुन्हा तयार होते. त्यामुळे रक्तदान केल्याने अशक्तपणा येत नाही. मात्र रक्तदान केल्यानंतर पूर्ण आराम करावा लागतो. तसेच कोणताही सुदृढ व्यक्ती वर्षातून तीन महिन्याच्या अंतराने ४ वेळा रक्तदान करू शकतात. रक्तदान केल्याने रक्तदाबाची समस्या निर्माण होत नाही. रक्तदान केल्याने डोके दुखत नाही आणि उलट्याही होत नाही. रक्तदानानं रोगप्रतिकारशक्ती कमी होते हा केवळ गैरसमज आहे.

रक्तदानासाठी पात्रता

वय १८ ते ६० वर्षे असावे

वजन ४५ किलोग्रॅमपेक्षा जास्त असावे

रक्तदाता संपूर्ण निरोगी असणे आवश्यक आहे

पुरुष दर ३ महिन्यांनंतर रक्तदानास देण्यास पात्र

महिला दर ४ महिन्यानंतर रक्तदानास पात्र

नाडीचे ठोके दर मिनिटाला ७२ हवेत

शरीराचे तापमान सामान्य हवे

रक्तदानासाठी अपात्र

रक्तदानानंतर तीन महिन्याच्या आत पुन्हा रक्त देणारी व्यक्ती

अमली पदार्थांचे इंजेक्शन घेतले असलेले व्यक्ती

हिपॅटायटीस-बी आणि सी असलेले व्यक्ती

क्षयरोग, एचआयव्ही बाधित व्यक्ती

संशयित तसेच कुष्ठरोग असलेले व्यक्ती

कॅन्सरग्रस्त असलेले व्यक्ती

१५ दिवस आधी कॉलरा, टायफॉईडची लस घेतलेली व्यक्ती

वर्षभरापूर्वी रेबीजची लस घेतलेली व्यक्ती

महिलांनी बाळाच्या जन्मानंतर किमान ९ महिने आणि बाळाने स्तनपान सोडल्या नंतर ३ महिने

रक्तदात्याला मागील ३ महिन्यांत मलेरिया झाला असल्यास

रक्तदात्याला मागील एका वर्षात विषमज्वर, कावीळ झाल्यास

उपाशी पोटी किंवा खाल्ल्यावर अर्धा-तासा पर्यंत दान करू नये

रक्तदान हे महादान आहे. पुरुष असो की महिला दोघांनाही रक्तदानाचा धर्म निभावता येतो. केवळ काही वैद्यकीय टप्पे समजून घ्यावे लागतात. महिलांचे हिमोग्लोबिन १२ ग्रॅम टक्क्यांच्या वरच असेल तर महिला रक्तदानासाठी पात्र समजल्या जातात. महिनाभराच्या आत अंगावर टॅटू केलेले असल्यास महिलांनी रक्तदान करू नये. तसेच नुकतेच लसीकरण झालेले असल्यास रक्तदान करू नये. अलीकडे रक्तदाना महिलांचाही टक्का वाढताना दिसतो.

-डॉ. बळवंत कोवे, पॅथॉलॉजी विभाग प्रमुख, मेयो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

"जितकं तू बोलतोस तितका चांगला माणूस तू अजिबात नाहीस" ; जवान फेम अभिनेत्री नयनताराचा धनुषवर खळबळजनक आरोप

Ranji Trophy 2024-25: Ayush Badoni चं दमदार द्विशतक; दिल्लीला आघाडीही मिळाली, पण सामना राहिला ड्रॉ

Vastu Tips: कामधेनूची मूर्ती ऑफिसमध्ये कोणत्या दिशेला ठेवावी? वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

Farmer : हिरव्या मिरचीने आणले डोळ्यांत पाणी...तोडणी बारा तर विक्रीसाठी पंचवीस रुपये; पीकांच्या लागवडीचाही खर्च निघेना

SCROLL FOR NEXT