World Food Safety Day 2024 : आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे आणि सकस आहार घेणे आवश्यक आहे. आपल्या दैनंदिन जीवनात महत्वाची असणारी आणि जगण्यासाठी अत्यावश्यक असणारी बाब म्हणजे अन्न होय. अन्नाचे रोज सेवन केल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. अन्न आपल्या शरीरासाठी जितके आवश्यक आहे तितकेच त्याचे पौष्टिक मूल्य आणि शुद्ध सेवन देखील तितकेच महत्वाचे आहे.
जगभरात दरवर्षी ७ जूनला ‘जागतिक अन्न सुरक्षा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लोकांना निरोगी आणि स्वच्छ आहारासाठी जागरूक करणे हा या दिनाचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे, आपण जो आहार घेतो तो सुरक्षित आणि शुद्ध आहे ना याची अवश्य पडताळणी करावी.
जर आपण चुकीचा आणि खराब आहार घेतला तर विविध आजारांना निमंत्रण मिळू शकते. त्यामुळे, निरोगी आणि शुद्ध आहार आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. आज जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त आपण निरोगी आणि सुरक्षित आहारासाठी कोणत्या गोष्टींकडे खास लक्ष दिले पाहिजे? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
निरोगी आरोग्यासाठी हातांची स्वच्छता फार महत्वाची आहे. जेव्हा अन्नाच्या स्वच्छतेचा विचार केला जातो, तेव्हा ही बाब अधिक महत्वाची ठरते. जर तुम्ही हात न धुता काहीही खाल्ले तर तुमच्या हातांना चिकटलेले बॅक्टेरिआ, जंतू पोटात जाऊ शकतात. ज्यामुळे, डायरिया आणि पचनाशी संबंधित इतर अनेक प्रकारच्या आजारांचा धोका वाढतो.
त्यामुळे, काही खाण्यापूर्वी किमान ३० सेकंद आधी साबणाने किंवा हॅंडवॉशच्या मदतीने तुमचे दोन्ही हात स्वच्छ धुवा. हात धुण्यासोबतच बाजारातून विकत आणलेल्या भाज्या, फळे ही स्वच्छ धुणे महत्वाचे आहे.
निरोगी आरोग्यासाठी दूषित अन्नाचे सेवन करणे टाळा. कारण, दूषित अन्नाचे सेवन केल्याने आपल्याला आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. कारण, या दूषित अन्नामध्ये बॅक्टेरिआसोबतच इतर प्रकारचे जीवजंतू असू शकतात. ज्यामुळे, तुम्हाला टायफॉईड, डायरिया आणि पचनाशी संबंधित आजार होऊ शकतात.
दूषित अन्नासोबतच, शिळे अन्न खाणे किंवा अन्नावर माशा बसलेल्या अन्नाचे सेवन करणे यामुळे, आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. या गोष्टी टाळण्यासाठी अन्न व्यवस्थित हाताळा, अन्न तयार करण्यापूर्वी आणि खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. अन्न सुरक्षितपणे आणि पूर्णपणे शिजवा मगच खा.
अन्नाचे योग्य पचन होण्यासाठी ते चांगले शिजवलेले असणे फार महत्वाचे आहे. कमी शिजवलेले अन्न बॅक्टेरिया आणि इतर जंतूंचा धोका कमी करते. खास करून मांस, मासे इत्यादींबाबत हे लक्षात ठेवा. त्यामुळे, अर्धवट शिजवलेल अन्न अजिबात खाऊ नका. कमी शिजवलेल्या किंवा अर्धवट शिजवलेल्या गोष्टींचे सेवन केल्याने अतिसार आणि पोटाच्य समस्या वाढू शकतात.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.