World Food Safety Day 2024: दरवर्षी जागतिक अन्न सुरक्षा दिन ७ जूनला साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना खाण्यापिण्याच्या स्वच्छतेबद्दल सांगणे आहे. हा दिवस २०१९ मध्ये संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेने सुरू केला होता. दरवर्षी अनेक लोक अशुद्ध खाद्यपदार्थ खाऊन आजारी पडतात. सध्या खाद्यपदार्थमध्ये मोठ्याप्रमाणात भेसळ होत आहे. ही भेसळ घरगुती पद्धतींनी कसे ओळखावे हे जाणून घेऊया.
रोजच्या वापरातील अनेक पदार्थांमध्ये अपायकारक गोष्टींचा वापर केला जातो, त्यामुळे पदार्थांची गुणवत्ता खालावते. भेसळ करण्यासाठी खडू, भुकटी,कृत्रिम रंग, लाकडाचा भूसा यासारख्या पदार्थांचा वापर केला जातो. असे भेसळयुक्त पदार्थ खाल्ल्याने पोटासंबंधित आजार, हृदय रोग, अॅलर्जी, मधुमेह यासारखे आजार उद्भवू शकतात.
मीठामध्ये खडूची भुकटी वापरली जाते. हे ओळखण्यासाठी एक ग्लास पाण्यात मीठ टाकावे. जर खडूची भूकटी मिक्स केली असेल तर पाणी पांढरे होईल. तसेच भेसळसाठी वापलेले इतर पदार्थ ग्लासच्या तळाशी जमा होतात.
यामध्ये वापरलेल्या चहाची पाने वापरली जातात. हे ओळखण्यासाठी एका कापडावर चहापत्ती टाकावी आणि पाणी शिपडावे.भेसळ असेल तर कापडावर डाग दिसून येईल.
जिऱ्यामध्ये काळशाने रंगविलेल्या गवतबियांची भेसळ केली जाते. हे ओळखण्यासाठी तळहातावर जिरे घेऊन चोळावे. जर हाताचा रंग काळा झाल्यास हे भेसळयुक्त जिर आहे समजावे.
हिरव्या भाज्यांना हिरवा रंग येण्यासाठी हिरव्या रंगाचा वापर केला जातो. उदा. वाटाणे किंवा हिरवी मिरची
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.